अक्षय तृतीया माहिती मराठी 2025 | Akshay Tritiya 2025
अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक मोठा सण मानला जातो. हिंदू धर्माप्रमाणे अक्षय तृतीया ही वैशाख शुद्ध तृतीया ह्या दिवशी येते. अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो.2025 मध्ये हा दिवस 30 एप्रिल रोजी आला आहे’अक्षय’ ह्या शब्दाचा अर्थ कधीही न संपणारा असा आहे त्यामुळे असे महणले जाते की ह्या दिवशी जे काही शुभ कार्य केले जाते त्याचा परिणाम कायम म्हणजेच अक्षय राहतो. ह्या दिवशी दान धर्म केल्याने पुण्याची प्राप्ती होते. ह्या दिवशी कोणतेही शुभ कार्य सुरू केले जाते जसेकी लग्नाचे मुंज मुहूर्त तसेच गृहप्रवेश. ह्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. हिंदू लोकांप्रमानेच जैन लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात अक्षय तृतीया साजरी करतात. जैन धर्मामध्ये ह्या दिवसाला ‘आखा तिज’ असेही म्हणतात.(अक्षय तृतीया माहिती मराठी)
अक्षय तृतीयेचे महत्व :
अक्षय तृतीया हा हिंदू लोकांसाठी अतिशय पवित्र सण मानला जातो. हा सण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
- महाराष्ट्रात हिंदू स्त्रिया चैत्रागौरीची स्थापना करून पूजा करतात.महाराष्ट्रात ही देवी चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात तृतीयेपासून बसविली जाते. बायका चैत्र महिन्यातील एखाद्या दिवशी बायकांना घरी बोलवून घरी आंब्याची डाळ, पन्हे असे करून हळदी कुंकू देतात. अक्षय तृतीया हा चैत्र गौरीचा शेवटचा दिवस असतो.
- असे मानले जाते की भगवान परशुराम जे हिंदू धर्मातील भगवान विष्णु ह्यांचा सहावा अवतार आहेत त्यांचे अवतरण ह्याच दिवशी झाले होते. त्यामुळे भगवान परशूरमांची पूजा अक्षय तृतीयेला केली जाते.
- असेही म्हणले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी महर्षि व्यास ह्यांनी ‘महाभारत‘ हा प्राचीन ग्रंथ भगवान गणपती कडून लिहून घेण्यास सुरवात केली.अक्षय्य तृतीयेला दुशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता. द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली.
- अजून एका मान्यतेनुसार हिंदू धर्मात ज्या नदीला खूप महत्व आहे अशी गंगा नदी ह्याच दिवशी पृथ्वीवर अवतरली. अक्षय तृतीयेला गंगेत स्नान केल्यात पुण्य प्राप्त होते असे म्हणले जाते.
- अक्षय तृतीयेला अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते,त्या निमित्ताने वर्षभर घरातील समृद्धी टिकून राहावी अशी प्रार्थना केली जाते.
- असे महणले जाते की भगवान कुबेर नी अक्षय तृतीयेला मत पार्वतीची आराधना करून प्रसन्न केले आणि वरदान म्हणून भगवान कुबेराला देवांचा खजिनदार केले गेले.
- भारतातील उत्तराखंड मधील भगवान बद्रीनाथांचे मंदिर अक्षय तृतीयेला उघडतात व दिवाळीच्या भाऊबीजेला मंदिराचे दरवाजे बंद करतात.
- अशी एक पौराणिक कथा आहे की ह्याच दिवशी भगवान कृष्ण ह्यांचा मित्र सुदामा त्यांना भेटायला आला परंतु त्याच्याकडे भकृष्णाला द्यायला काहीच नव्हते. सुदमाने आपल्याकडील दही पोहे कृष्णाला दिले. कृष्णाने आपल्या मित्राची व्यथा समजून कृष्णाने आपल्या मित्राचे दारिद्र्य दूर केले व त्या दिवसापासून अक्षय तृतीयेला दान करण्याचे महत्व पटवून दिले.
- पश्चिम बंगाल मध्ये हा दिवस हलकटा नावाने साजरा करतात
अक्षय तृतीयेला काय करावे ?
अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णु आणि लक्ष्मी च्या पूजेचे महत्व आहे. लक्ष्मी आणि विष्णु चा फोटो समोर ठेवून त्याला फुले फळे ह्यांचा नैवैदय दाखवावा. असे केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी राहते. अक्षय तृतीयेच्या दिवशी तांदळाची खीर,पन्हे,आंब्याची डाळ,पापड ई. केले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी दानाचे महत्व सांगितले असल्याने ह्या दिवशी गरजूंना शिधा महणजेच डाळ ,तांदूळ,तेल,मीठ,तूप,साखर असे दान दिले जाते. त्यांनी आपल्याला पुण्य मिळते असे म्हणतात.
आणखी वाचा : आषाढी एकादशी माहिती
अक्षय तृतीय कथा :