आपल्याला भूक का लागते ?

आपल्याला भूक का लागते ? Why we feel hungry ?

मानवी शरीर हे एक अधभूत रसायन आहे. मानवाच्या 3 मूलभूत गरजा आहेत. अन्न ,वस्त्र ,निवारा. हयापैकी आज आपण भूक का लागते ह्या विषयी माहिती घेणार आहोत.

आपल शरीर सतत काम करत असतं. जेव्हा आपण विश्रांती घेतो किंवा झोपतो तेव्हा सुद्धा रक्ताभिसरण,श्वसन यासारख्या प्रक्रिया चालू असतात. त्यामुळे शरीराला सतत ऊर्जेची गरज असते. तिचा पुरवठा अखंड असण्यासाठी शरीराला वेळोवेळी पोषण मिळणे गरजेचे असतं. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा ही पोषण मिळतं. ते साठवून ठेवल जाते. पण तो साठा संपला की परत पोशक पदार्थ शरीराला मिळणे आवश्यक असते.याचीच जाणीव आपल्याला करून देण्यासाठी भूक लागण्याची भावना निर्माण होते.

आपल्या मेंदुमद्धे hypothalamus या अवयवामद्धे भुकेवर नियंत्रण ठेवणारे केंद्र असतं. त्याला संदेश मिळाला की ते कार्यरत होते आणि आपल्याला भुकेची जाणीव होते. शरीराला ऊर्जा मिळते ती ग्लुकोजच्या ज्वलनातून. त्यामुळे रक्तातले ग्लुकोज चे प्रमाण एक निर्धारीत पातळीवर नेहमी राहील याची काळजी घेतलेली असते पण ती पातळी कमी झाली की मग आपल्याला भुकेची जाणीव होते.रक्तताल ग्लुकोजची पातळी जर जास्त वाढली तर ते आरोग्याला घातक असल्यानं इंसुलिन या संप्रेरकाचा पाझर सुरू होतो. ते संप्रेरक ग्लुकोजची पातळी योग्य राखण्यात मदत करत. तसंच काही प्रमाणात पोट भरलेल राहील हेही बघितले जाते,पोट जर रिकामे झाले तर आकुंचन पाऊन त्याच आकारमान घटत.भुकेच केंद्र जागृत करायला तोही एक संदेश पुरतो. आशा वेळी पाणी पिऊन आकारमान वाढवल तरीही भूक भागल्याची भावना निर्माण होते.

थंडीमद्धे आपल्याला जास्त भुक लागते कारण शरीराचे कमी झालेले तापमान. थंडीत तापमान कमी झाल्याने शरीराचे तापमान कमी होऊन शरीर तापमान वाढवण्याचे काम सुरू करते ज्यासाठी आपल्याला जास्त ऊर्जेची गरज लागते आणि ती ऊर्जा अन्नातून मिळते. जेव्हा आपल्याला थंडी वाजते शरीर  उष्णता निर्माण करण्यासाठी शरीरआहारसेवनाची इच्छा वाढते अर्थात भूक वाढते, आणि त्यातसुद्धा लगेच ऊर्जा मीलवी ह्यासाथी काऱ्बोंदके खायची इच्छा होते.