आषाढी एकादशी माहिती 2024 |Aashadhi Ekadashi Mahiti 2024 |Ashadhi Ekadashi Information 2024
हिंदू महिन्यात दोन पंढरवडे येतात ज्यामध्ये दोन तिथी येतात,एक शुद्ध तिथी आणि दुसरी वद्य तिथी त्यात येणारी एकादशी ही अतिशय पवित्र मानली जाते. एकादशी ही भगवान विष्णुला समर्पित केली जाते.
आषाढी एकादशी तिथी
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील अकराव्या दिवशी येणाऱ्या तिथीला आषाढी एकादशी असे म्हणतात.या काळात देवांची रात्र असते त्यामुळे सर्व देव झोपी जातात. म्हणूनच ह्या दिवसाला देवशयनी एकादशी असेही महणतात. धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात. देवतांसाठी ही अहोरात्र म्हणून ओळखली जाते.अशी मान्यता आहे की या काळात असुर प्रबळ होतात त्यामुळे त्यांच्या शक्तिपासून सुरक्षित राहण्यासाठी या दिवशी भगवान विष्णु ची उपासना केली जाते. उपास केला जातो,आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. असे मानले जाते की हे व्रत केल्याने मोक्ष प्राप्त होतो.
आषाढी एकादशीच्या दिवशी लाखों भाविक वारकरी पंढरपूर मध्ये विठ्ठल दर्शनासाठी येतात. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजयांच्या अभंगगात तल्लीन होऊन लाखों भाविक पालखी घेऊन पंढरपूरच्या वाटेने निघतात आणि आषाढी एकादशी च्या दिवशी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठल दर्शन घेतात .
आषाढी एकादशी कथा
म्रुदुमान्य राक्षसाने भगवान शंकराची उपासना करुन त्यांना प्रसन्न केले. भगवान शंकराने म्रुदुमान्य रक्षसाला वरदान दिले की कोणत्याही प्राण्याकडून तुला मरण प्राप्त होणार नाही, झालेच तर स्त्रीच्या हातून मरण येईल. वरदान मिळाल्यावर म्रुदुमान्य राक्षसाने सर्व देवांचा पराभव करुन त्यांना बंदिस्त केले. भगवान विष्णूंना जिंकण्यासाठी वैकुंठाला जाऊन त्यांचाही पराभव केला. भगवान शंकरही आपल्या वरदानामुळे हताश झाला होता. त्यानंतर ब्रह्मा, विष्णू, महेशसह सर्व देवी-देवता एका पर्वताच्या गुहेत लपून राहिले. काही दिवसांनी ब्रह्मा-विष्णू-महेश या तीघांच्या श्वासातून एका देवीची उत्पत्ती झाली. तिने सर्व देवातांना अभय देऊन म्रुदुमान्याला मरण दिले. तिला एकादशी देवी म्हणून ओळखू लागले. देवीने सांगितले एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने ब्रह्मा-विष्णू-महेश तुमची सर्व पापांपासून मुक्ती होईल.
आषाढी एकादशी व्रत
आषाढी एकादशीनिमित्त अनेक ठिकाणी पालखी निघते. सर्व भक्त विठ्ठल दर्शन घेतात आणि उपवास करतात. आशाढ महिना हा पावसाळ्याच्या दिवसात सुरू होतो. त्यानंतर चातुर्मास लागतो व सर्व सण व्रत वैकले सुरू होतात. चतुर्मासत अनेक भाविक मांसाहारी पदार्थ वर्ज्य करतात .
आषाढी एकादशी कधी आहे?
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील अकराव्या दिवशी येणाऱ्या तिथीला आषाढी एकादशी असते. यंदा बुधवार दिनांक १७ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशी आहे.
आषाढी एकादशीला काय करावे ?
आषाढी एकादशी ल लवकर उठून स्नान करून विठ्ठालाचे दर्शन घ्यावे. उपवास करावा .
आषाढी एकादशीला काय दान करावे ?
आषाढी एकादशीला हा दिवस दानधर्म करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो.