उत्सवाच्या तयारीसाठी टिप्स | Tips for Festival Preparations

उत्सवाच्या तयारीसाठी टिप्स | Tips for Festival Preparations

भारतात चातुर्मास म्हणले की सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असते. श्रावण महिन्यापासून सुरू होणारे सण (festivals) दिवाळी नंतर संपतात. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे सण साजरे केले जातात. प्रत्येक प्रांतात सण साजरे करण्याची पद्धत पण वेगवेगळी असते.आता महाराष्ट्रात मोठा येणार सण म्हणजे गणेश चतुर्थी.ह्या सणाची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. त्यानंतर येणार सण म्हणजे नवरात्र,दसरा आणि  मग दिवाळी ह्या सगळ्याच सणांच महत्व आहे. ह्या सणांसाठी लागणारी तयारी  करताना खालील टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी येतील.

 

साफ सफाई साठी टिप्स : (cleaning tips for festival preparation)

कुठलाही सण आला की आपण घरातील साफसफाई पासून त्याच्या तयारीला लागतो,तुमचे घर ह्या सणांमद्धे स्वच्छ आणि नीटनेटके दिसावे ह्यासाठी काही टिप्स :

  • जेव्हा आपण साफ सफाई कहा विचार करतो आपण सर्वप्रथम किचन पासून सुरवात करावी कारण किचन मध्ये खूप गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची असते.किचन मध्ये आपल्या ट्रॉलिज काढून बघ्याव्या त्याखालील घाण काढून सर्व स्वच्छ पुसून घ्यावे. 
  • किचन मधील सर्व ट्रॉलीज पुसण्यासाठी आपण बेकिंग सोडा,पाणी ,वीनेगर,आणि कपडे धुवायचा साबण ह्याचे मिश्रण करून ठेवावे व ते जिथे जिथे चिकट दाग असतील त्या ठिकाणी थोडावेळ स्प्रे करून ठेवावे व पुसून घ्यावे. सगळे चिकट काळे डाग जाऊन ती जागा स्वच्छ होईल. 
  • किचन मध्ये आपण बरेच वेळा न लागणारे समान गोळा करून ठेवलेले असते. ते बघावे जे लागणार नसेल ते काढून टाकावे. बऱ्याच वेळा आपण न लागणारे डबे बाटल्या पुढे लागतील हयाविचाराने गोळा  करून ठेवतो ते काढून टाकावे. 
  • किचन मधील सर्व भांडी जशी जमतील तशी काढून धूवून ठेवावी म्हणजे जेव्हा आपण वांण समान आणू तेव्हा स्वच्छ डब्यात भरून ठेवता येते. 
  • नवीन कुठलेही समान आणायच्या आधी घरातला साठवणीचा डब्बा बघून मगच आणायच्या सामानाची लिस्ट करावी. 
  • इलेक्ट्रोनिक उपकरणे जसे की मिक्सर,मायक्रोव्हेव स्वच्छ पुसून घ्यावे.
  • आपल्या घरातील फर्निचर,कपाटे,आरसे खिडक्या,दारे,पंखे  हे सुद्धा स्वच्छ करून घ्यावे. 
  • घरतील जळमटे काढावी. सोफा कोवर्स ,पडदे स्वच्छ धूवून ठेवावे. 
  • बेडशीट,कुशन कवर्स बदलावी. 
  • बाथरूम,बेसिन स्वच्छ करून ठेवावे.
  • कुटुंबातील प्रत्येकानि आपले कपड्याचे कपाट आवरुन ठेवावे. असे केल्याने बरेच वेळा आपल्या लक्षात येते की आपण बरेच कपडे न वापरताच तसेच ठेवले आहेत. जे तुम्हाला सणांसाठी वापरता येतील किंवा आपल्याला नको असतील तर जे गरजू आहेत अश्या लोकांना देता येतील.  
  • आपल्या घरातील फ्रीज मधील सर्व समान काढून बघावे जे खराब झाले असेल ते टाकून द्यावे. सगळा फ्रीज बेकिंग सोडा,पाणी ,वीनेगर ह्यांचे मिश्रण करून स्वच्छ पुसून काढावा. फ्रीज मध्ये कधीही बाजारात मिळतात ते केमिकल असणारे स्प्रे वापरू नयेत. 

आणखी वाचा  : श्रावण महिना माहिती

सजावटीसाठी काही टिप्स : (decoration tips for festivals)

सण म्हणले की घर सजावट आलीच. सजावटी काही टिप्स:

  • कुठल्याही सणाच्या सजावटीची सुरवात करताना आपण आधी आपल्या घरातील साठवून ठेवलेल्या गोष्टी चेक कराव्या. बऱ्याच वेळा माळ्यावर किंवा एखाद्या बॉक्स मध्ये आपण मागच्या वर्षी केलेल्या सजावटीसाठी आणलेल्या गोष्टी ठेवलेल्या असतात. त्याचा ह्यावर्षी काही उपयोग होतो आहे का ते बघावे. आणि मगच नवीन काही लागणार असेल तर आणावे. 
  • त्यानंतर आपल्या डेकोरेशन ची थीम ठरवावी. शक्य असेल तर त्याचे रफ चित्र काढावे असे केल्याने नंतर होणारे गोंधळ आणि अनावश्यक खर्च टाळता येतात.
  • गणपती डेकोरेशन साठी बाजारपेठेत आजकाल बऱ्याच प्रकारचे सजावटीचे साहित्य उपलब्ध असते जसे की प्लॅस्टिक ची वेगवेगळ्या आकाराची फुले,माळा ,पुष्पगुच्छ,तोरणे हयापैकी तुम्ही तुमच्या डेकोरेशन साठी वापरू शकता. तसेच आजाकल ऑनलाइन शॉपिंग साठी वापरला जाणारा पुठ्ठा सुद्धा तुम्ही डेकोरेशन साठी वापरू शकता. 
  • त्याशिवाय घरात असणाऱ्या जुन्या बेडशीट, साड्या,ओढण्या  ह्यांचा सुद्धा वापर करू शकता.  
  • सजावटीसाठी लागणारे टेबल स्वच्छ पुसून ठेवावे. 
  • गौरी गणपती किंवा नवरात्र ह्यामध्ये गौरींना सजवण्यासाठी लागणारे दागिने तुम्ही घरच्या घरी मोती,कुंदन,आरसे लावून बनवू शकता.
  •  दिव्याच्या माळा,पणत्या,वेगवेगळे प्रकारचे आकर्षक दिवे ह्यांचा सजावटीसाठी वापर करू शकता.

पूजेसाठी काही टिप्स :

  • पूजेसाठी लागणारे साहित्य जसे की हळद, कुंकू, बुक्का, अक्षता , समईच्या वाती, तुपाच्या वाती, तेल, फुले, हार, नारळ, रांगोळी ,अष्टगंध , दूर्वा, 5 फळे ,देवी देवतांच्या मूर्ती ई. हे सर्व आहे की नाही ते बघावे.
  • पूजेसाठी लागणाऱ्या देवतांच्या चांदीच्या मूर्ती घासून ठेवाव्या. 
  • नेवैद्या साठी लागणाऱ्या पदार्थनपैकी जी कोरडे पदार्थ असतील ते तयार करून ठेवावे. 
  • पंचामृता साठी लागणारे दही ,दूध,मध ,साखर,तूप आहे का नाही ते बघावे. 

कुठलाही सण म्हणाले की त्यासाठी लागणारी पूर्वतयारी ही अतिशय महत्वाची असते. सण हे एकतेचे प्रतीक असतात. त्यामुळे घरातील सगळ्यांनी मिळून सणाची तयारी केली तर नक्कीच सणाचा आनंद द्विगुणित होतो.

आणखी वाचा  :: तणाव कमी करण्यासाठी 5 टिप्स | 5 stress management tips