उन्हाळ्यात आरोग्य कसे जपावे? जाणून घ्या सोप्या टिप्स! | summer health tips

उन्हाळ्यात आरोग्य कसे जपावे? जाणून घ्या सोप्या टिप्स! | summer health tips

सध्या भारतात सगळीकडेच उन्हाळा सुरू झाला आहे. बऱ्याच भागात तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे.उन्हाळा महणले की संगळ्याना पहिले आठवते ती रणरणती दुपार सगळीकडे कोरडे शुष्क वातावरण डोंगर ,नद्या सगळे कोरडे आणि ओसाड पण मजा असते ती कैरी,आंबा,फणस ह्यांची.मुलांना सुट्टी लागलेली असते सगळीकडे गावाला कुठे जायचे ह्याची चर्चा रंगलेली असते. प्रत्येक ऋतूचे आपल्या शरीरावर चांगले तसेच वाईट परिणाम होत असतात.उन्हाळा असा ऋतु आहे ज्यामध्ये सूर्याची किरणे अतिशय तीव्र असतात. अश्यावेळी शरीरावर आणि मनावर ताण येतो. कोरडी त्वचा,डिहायड्रेशन , थकवा, चिडचिडेपणा ह्या सगळ्याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे असते. खाली दिलेल्या टिप्स वापरुन नक्कीच तुमच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घेता येईल(उन्हाळ्यात आरोग्य कसे जपावे ?)

आणखी वाचा : ट्रॅफिक लाईट लाल पिवळा आणि हिरवाच का असतो? 

उन्हाळ्यासाठी खास टिप्स :

  • भरपूर पाणी पिणे : उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने घामाच्या स्वरूपातून शरीरातील पाणी कमी होते परिणामी आपल्याला डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते. डिहायड्रेशनमुळे डोके दुखी,चक्कर येणे, पचन नीट ना होणे,तसेच अनेक वेळा शुद्ध हरपणे ह्यासारखे त्रास होऊ शकतात.त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यात कमीत कमी 8-10 ग्लास पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. पाणी भरपूर पिण्याने शरीरातील तापमान कमी राखण्यास मदत होते. पाण्यासोबतच लिंबू पाणी , कोकम सरबत, वाळ्याचे सरबत तसेच नारळ पाणी,ताक , फळांचे सरबत ,पन्हे ह्या सारख्या नैसर्गिक  पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करावा. तसेच उन्हाळ्यात फ्रीज चे  थंड पाणी पिण्यापेक्षा माठातील पाणी प्यावे.
  • हलक्या रंगाचे कपडे : उन्हाळ्यात शक्यतो सूती कॉटन चे हलक्या रंगाचे, सैलसर कपडे वापरावे. हलक्या रंगाचे कपडे वापरल्याने ऊनहापासून आपल्या त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते. डार्क रंगामद्धे सूर्यप्रकाश जास्त सहोशला जात असल्याने शक्यतो काळा,निळा,लाल रंगाचे कपडे घालणे टाळावे. दुपारी बाहेर जाताना छत्री,टोपी,गॉगल चा वापर करावा. त्यामुळे डोके आणि डोळे ऊनहापासून बचाव होतो. (उन्हाळ्यात आरोग्य कसे जपावे ?)
  • कमी मेकअप वापरणे : उन्हाळ्यात फार मेकअप करणे टाळावे. त्वचेला श्वास घेऊ देणे जास्त महत्वाचे असते. उन्हाळ्यात घाम खूप येत असल्याने त्वचेची रंध्रे ब्लॉक होण्याची शक्यता असते. त्यांना मोकळे ठेवण्यासाठी उत्तम प्रतीचा टोनेर वापरावा. तसेच काकडीचे काप किंवा कोरफडीचे जेल लावल्याने फायदा होतो. उन्हाळ्यात त्वचा कोरडी होत असल्याने आंघोळीनंतर आपल्या त्वचेनूसार  मॉइश्चरायझर लावणे महत्वाचे आहे. तसेच त्यानंतर बाहेर कुठेही जाताना सन स्क्रीन लावणे अतिशय गरजेचे आहे,सन स्क्रीन शक्यतो spf 50 असलेले पहावे. ओठांना सुद्धा लिप बाम लावावा. उन्हाळ्यात त्वचेची आग होत असल्यास चंदनाचा लेप लावावा.
  • उन्हाळ्यातील आहार : उन्हाळ्यात आपली पचनशक्ति मंदावत असल्याने उन्हाळ्यात हलका आहार घ्यावा. फार तेलकट जड पदार्थ तसेच मांसाहार शक्यतो टाळावा. उन्हाळ्यात पाण्यात  जिरे आणि बडीशोप घालून उकळवलेले पाणी प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो तसेच पंचनशक्ती सुद्धा सुधारते. तुळशीचे बी,सबजाचे बी पाण्यात किंवा दुधात भिजवून घ्यावे यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. उन्हाळ्यात फार गरम तसेच फार थंड पदार्थ सुद्धा टाळावे. गुलकंद खावा. उन्हाळ्यात अनेक वेळ बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने उलट्या,जुलाब ह्यासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे उघड्यावरचे पदार्थ शक्यतो टाळावे. ज्यांना  अन्नपचनाचे त्रास असतील त्यांनी दिवसातून थोडे थोडे खावे,एकदम खाल्यास पाचनसंस्थेवर ताण येतो. रोजच्या आहारात फळं, काकडी, टोमॅटो, दही, ताक, कलिंगड, खरबूज, फळांचा रस, लिंबू आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.  (summer health tips)
  • व्यायाम व विश्रांती : उन्हाळ्यात व्यायाम करताना विशेष काळजी घ्यावी. उन्हाळ्यात शरीर लवकर थकते,त्यामुळे हलक्या स्वरूपाचा व्यायाम उन्हाळ्यात करावा. व्यायाम करताना शक्यतो सकाळी करावा. सकाळच्या थंड हवेत व्यायाम केल्याने शरीराचे योग्य तापमान राखले जाते. फार मेहनतिचा व्यायाम करू नये. त्या ऐवजी चालणे,पोहणे,योगासन हे पर्याय वापरावे. उन्हाळ्यात पुरेशी झोप घेणे अतिशय गरजेचे आहे. पुरेशी झोप झाली नसेल तर चिडचिडेपणा वाढतो तसेच अन्नाचे पचन सुद्धा नीट न होऊन अॅसिडिटी चा त्रास होऊ शकतो.6-8 तासांची झोप शरीराला गरजेची असते.
  • मनाचे आरोग्य : तीव्र उन्हाळ्याने मनाला सुद्धा एक उदासीनता येते. थकवा,चिडचिड,कंटाळा वाढतो. त्यामुळे सकाळी लवकर उठून गार हवेत थोडा व्यायाम करावा. प्राणायाम,ध्यानधारणा ह्यामुळे मेंदूला आलेला शीण जाण्यास मदत होते.
  • तसेच उन्हाळ्यात साप,विंचू ह्यापासून सुद्धा सावधगिरी बाळगावी. कारण उन्हाळ्यात प्राणी बिलातून बाहेर पडतात आणि थंड जागा शोधण्यासाठी पार्क मध्ये किंवा शेतात येऊ शकतात.
  • एसीचा वापर उन्हाळ्यात खूप केला जातो परंतु तीव्र उन्हात एसी चा वापर मुख्य भागापूरता मर्यादित ठेवावा. विशेषतः तापमान जेव्हा 45-50 सेलसीयस असेल तेव्हा एसी 20-30 ठेवावे. (उन्हाळ्यात आरोग्य कसे जपावे ?)
  • तसेच गाड्यांचे टायर सुद्धा तीव्र ऊनहामुळे फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे लांबच्या प्रवासात जाताना काळजी घ्यावी टायर मध्ये हवा जास्त भरू नये. (उन्हाळ्यात आरोग्य कसे जपावे ?)

उन्हाळा जरी कठीण वाटत असला, तरी योग्य काळजी घेतली तर तो सुखद आणि आनंददायक ठरू शकतो. पाणी भरपूर प्या, आहार संतुलित ठेवा, वेळच्या वेळी विश्रांती घ्या, सूर्यप्रकाशापासून बचाव करा आणि सर्वात महत्त्वाचं – स्वतःला वेळ द्या.

“आरोग्य हीच खरी संपत्ती आहे” – हे लक्षात ठेवून उन्हाळ्यात तुमची स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी रहा!

आणखी वाचा : Indian Spices and their uses | भारतीय मसल्यांचे महत्व