कोल्हा आणि कोंबडा |Moral Stories For Kids
कोल्हा आणि कोंबडा
एका जंगलात एक कोल्हा राहत होता. एक दिवस तो एका वडाच्या झाडांखालून जात असताना त्याला फांदीवर बसलेला कोंबडा दिसला. कोंबड्याला पाहून कोल्हयाच्या तोंडाला पाणी सुटले. परंतु त्याला उंचीवर चढता येत नव्हते. तेव्हा काहीतरी युक्ति करून कोंबड्यालाच खाली बोलवावे असा विचार करून कोल्हा कोंबड्याला मधुर स्वरात म्हणला,”अरे माझ्या मित्रा , मी तुला एक चांगली बातमी द्यायला आलो आहे. मघाशी जंगलात मी आकाशवाणी ऐकली. देव स्वर्गातून जंगलातील सर्व प्राण्याना सांगत होता की ‘जंगलातील कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला आता घाबरायच कारण नाही. कारण आता देवच प्रत्येकाच्या खाण्यापिण्याची वेगळी व्यवस्था करणार आहे. त्यामुळे कोणीच शिकार करण्याची गरज नाही’ तेव्हा हे कोंबड्या तू झाडावरुन खाली उतर . आपण जंगलातील सर्व प्राण्यांना ही माहिती देऊ.” त्याच्या सांगण्यावर कोंबडा म्हणाला “अरे वा , बातमी तर खूपच चांगली आहे पण ही बातमी अजून एका मित्राला कळलेली दिसतेय, मागे पहा तो शिकारी कुत्रा तुझ्याकडेच येत आहे. ” (बोधकथा )शिकारी कुत्र्याला पाहून कोल्हा फारच घाबरला. ते पाहून कोंबडा म्हणाला ” हे कोल्हा तू शिकारी कुत्र्याला पाहून का घाबरतो आहेस आपण सर्व मित्र आहोत ना !”त्यावर कोल्हा म्हणाला “पण कुत्र्याला अजून आकशवाणीबद्दल काहीच माहिती नाहीये.” एवढ बोलून कुत्र्यानी तेथून पळ काढला . (Moral stories for kids)
तात्पर्य : लबाड लोकांपासून नेहमी सावध रहावे.
आणखी वाचा : Moral Stories in Marathi |अमर बनवणारे फळ
समाधानी माणूस (Moral stories for kids)
एक राजा होता. तो आपल्या प्रजेची अतिशय काळजी घेत असे. आपल्या राज्यातला एकही माणूस असमाधानी असू नये असे त्याला वाटत असे. राज्यातील कुठलिही व्यक्ती काही अडचणीत आहे असे कळल्यावर राजा स्वतः जाऊन त्याला मदत करत असे. असा हा राजा प्रजेवर लक्ष रहाव म्हणून राज्यात नेहमी फेरफटका मारत असे. एक दिवस फेरफटका मारत असताना एक वृद्ध व्यक्ति त्याला शेतात खड्डे खणत असताना दिसला. खड्डा खणल्यावर तो त्यात वृक्षांचे बी पेरताना दिसला. या वयात काम करताना बघून राजाला त्या माणसाचे कौतूक वाटले. राजाने त्याला विचारले “बाबा तुम्हाला काही त्रास आहे का ? या वयात तुम्ही शेतीची कामे का करताय ? काही कमी असेल तर मला सांगा.” राजाच्या प्रश्नावर तो वयस्कर माणूस म्हणाला “हे राजा , तुझ्या राज्यातील प्रजेप्रमाणे मी पूर्णपणे सुखी आहे. हे शेत माझ्या पूर्वजांनी माझ्यासाठी ठेवले आहे. त्यांनी लावलेल्या शेतापासून मला उत्पन्न मिळते. त्यातून माझा सगळं खर्च भागतो. ” “मग तरीही तुम्ही आत्ता का काम करताय असे राजाने विचारले.” तेव्हा तो माणूस म्हणला “जसे माझ्या पूर्वजांनी लावलेल्या शेतीतून आज माझा खर्च निघतो आहे तसेच माझे हे काम नाही का की माझ्या मुलांना आणि नातवंडांना हेच सुख मी द्याव. म्हणून मी हे शेताचे काम करतो आहे.” हे ऐकून राजाला खूप आनंद झाला. पुढच्या पिढीची काळजी करणाऱ्या त्या गृहस्थाला राजाने बक्षीस देऊन सत्कार केला. (Moral stories for kids)
तात्पर्य : आपले काम नेहमीच प्रामाणिक पणे करावे.
आणखी वाचा : घुबडाची युक्ती | Moral Stories in Marathi