घुबडाची युक्ती | Moral Stories in Marathi

घुबडाची युक्ती | Moral Stories in Marathi

दुपारची वेळ होती. एक घुबड झाडाच्या ढोलीत शांतपणे झोपले होते. त्याच वेळी त्या झाडाच्या एका फांदीवर एक नाकतोडा येऊन बसला आणि त्याने गेला सुरवात केली. घुबड नकतोड्याला म्हणले  “अरे नकतोड्या तुझ्या गण्यान माझी झोपमोड होत आहे ,कृपा करून तू तुझ गाण म्हणणे बंद कर नाहीतर तू दुसऱ्या झाडावर बसून गा”. नाकतोडा म्हणाला “तुझ्या झोपायच असेल तर खुशाल झोप कोण नाही म्हणते आहे , पण मी गाण म्हणणे बंद करणार नाही. “(घुबडाची युक्ती | Moral Stories in Marathi )

घुबडाला दिवस नीट दिसत नाही ही गोष्ट नकतोड्याला चांगलीच माहीत होती.त्यामुळे घुबड आपल्याला पकडू शकणार नाही हे नकतोड्याला माहीत होते. त्याने आपले गाणे चालूच ठेवले. घुबडणे विचार केला हा नाकतोडा सरळ सांगून ऐकणार नाही,ह्याला काहीतरी जालीम उपाय केला पाहिजे.थोड्यावेळाने घुबड नकतोड्याला म्हणाला,”अरे नाकतोड्या तू एवढा छान गातोस हे मला माहीतच नव्हते. तुझ्या आवाज फारच गोड आहे,आता तर मला असे वाटत आहे झोपण्यापेक्षा तुझेच गाणे ऐकत राहावे. मला आजपर्यंत अस वाटायच की कोकिळाच फार चांगल गाते. अशी माझी समजूत होती.”

नाकतोडा घुबडाचे बोलणे ऐकून फारच खुश झाला. त्याची छाती गर्वाने फुलून गेली. तो म्हणाला “अरे घुबडा , तुला तरी स्वरातला फरक कळायला लागला हे माझ नशीब ! तू जरा नीट लक्षपूर्वक ऐक. खरंतर माझा गळा कोरडा पडला आहे पण हरकत नाही. तुला माझे गाणे आवडले तर मी तुझ्यासाठी नक्की गाईन. तू माझ गाण आनंदाने ऐक .”

मूर्तीकाराची गोष्ट मराठी | Moral stories in Marathi

घुबड म्हणले “असे गोड गाणे ऐकायची संधी मला आयुष्यात पहिल्यांदाच मिळाली आहे. माझ्या दरी येऊन तुझ्यासारखा महान गायक इतके सुंदर गाणे मला ऐकवतो आहे हे माझ भाग्यच आहे. आणि तू म्हणलास ना की तुझा घसा कोरडा पडला आहे,तर तू काळजी करू नकोस एथे माझ्या ढोलीत तुझ्यासाठी भरपूर पाणी आहे. तुझं गाणे संपल्यावर तू एथे येऊन हवे तेवढे पाणी पिऊ शकतोस. ”

नकतोड्याने परत मोठ्यामोठ्याने गायला सुरवात केली. गाऊन त्याचा घसा फारच कोरडा पडला होता. त्याने विचार केला आता ह्या घुबडाला आपले गाणे आवडले आहे म्हणजे तो आपल्याला काही इजा करणार नाही. आपण त्याच्या ढोलीत जाऊन पाणी पिऊया. तेवढ्यात घुबड सुद्धा नकतोड्याला म्हणले “अरे तू गाण गाऊन थकला असशील तू माझ्या ढोलीत येऊन पाणी पी म्हणजे तुला गाण गायला अजून उत्साह येईल.”

नाकतोडा उडी मारून घुबडच्या ढोलीत गेला. घुबड ह्याच संधीची वाट पाहत होते. घुबडाने त्या नकतोड्याला चोचीत पकडले आणि पटकन गिळून टाकले. बिचारा नाकतोडा पाणी प्यायला गेला आणि जीव गमवून बसला.

तात्पर्य : स्वार्थासाठी कोणी आपली प्रशंसा करत असेल,तर त्याच्या जाळ्यात फसता कामा नये.

आणखी वाचा : चतुर चांभाराची गोष्ट | Moral Stories in Marathi