चतुर चांभाराची गोष्ट | Moral Stories in Marathi
एका गावात एक चांभार राहत होता,तो खूप गरीब होता. त्याला गावात फारसे काम मिळत नसे. काही दिवसांनी त्याच्याकडे घरातले धान्य घेण्यासाठीसुद्धा पैसे राहिले नाहीत. एक दिवस त्याची बायको त्याला म्हणली “ह्या गावात तुम्हाला काही काम मिळेल असे मला वाटत नाही, इथे राहणे आता अवघड झाले आहे. आपण कुठल्या मोठ्या शहरात जाऊन काम मिळते का ते पाहूया का “? चांभाराने विचार केला बायको म्हणते ते बरोबर आहे आपल्याला इथे कोणीच काम देत नाही आपण शहरात गेलो तर आपल्याला नक्की काम मिळू शकेल. तो म्हणला “ठीक आहे आपण शहरात जाऊया”. ते दोघे शहरात आले. (चतुर चांभार गोष्ट )
शहरात आल्यावर चांभार एका बाजारात गेला,त्याने विचार केला एवढ्या गर्दीत कोणी ना कोणी नक्की येईल आपल्याकडे त्यांचे चपला बूट शिवायला.असा विचार करून तो त्या बाजारात एका झाडाखाली आपले सगळे साहित्य मांडून बसला. पण त्यादिवशी त्याच्याकडे कोणीच चपला बूट शिवायला आले नाही. दुसऱ्या दिवशी त्याने विचार केला की एका जागी बसून राहण्यापेक्षा आपणच जर रस्त्यावर ओरडत गेलो तर नक्कीच आपल्याकडे गिर्हाइक येईल. असा विचार करून तो गल्लीत जाऊन जोरात ओरडायला लागला “चपला बूट शिवून घ्या ,बूट पॉलिश करून घ्या “. त्याचा आवाज ऐकून एक बाई आपल्या घराबाहेर आली व म्हणली “माझी ही चप्पल तुटली आहे ही दुरुस्त करून द्याल का ?” चांभार म्हणला “हो देतो ना “. त्याने आपल्या पेटीतून समान काढले व त्या बाईची चप्पल दुरुस्त करून दिली. ते पाहून त्या ती बाई खुश झाली. व म्हणली “किती पैसे झाले?” चांभार म्हणला “एक सोन्याचे नाणे “. त्या बाई ने त्याला ते दिले व चांभार पुढे गेला. पुढच्या गल्लीत सुद्धा त्याला असेच एक घरातले चप्पल बूट शिवायचे काम मिळाले. त्याचे पैसे घेऊन तो घरी आला. त्याने ते पैसे बायकोला दाखवले ती पण खुश झाली. त्यानंतर तो रोज असा बाहेर जाऊन पैसे कमवून आणू लागला. थोडेच दिवसात त्याच्याकडे काही पैसे जमा झाले. त्याने विचार केला मी ह्या पैश्यांनी एक गाढव विकत घेतो. त्यांनी गाढव विकत घेतले. आणि तो जमवलेले पैसे घेऊन बायकोबरोबर गावाला जाऊ लागला.
गावाला जाताना त्याला एक जंगल लागले,त्या जंगलात पुढे गेल्यावर त्याला काही डाकू दिसले,त्यांना पाहून चांभार घाबरला. पण त्याने काही विचार करून आपल्याकडील एक सोन्याचे नाणे त्या गाढवाच्या गळ्याशी बांधले. ते डाकू त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणले “तुझ्याकडे जे पैसे असतील ते आम्हाला दे.” तो चांभार त्यांना म्हणला मी गरीब चांभार आहे,माझ्याकडे पैसे नाहीत,हे गाढव आहे फक्त. मी माझ्या गावाला जातोय मला जाउद्या.”डाकू काही ते ऐकायला तयार नव्हते. तेवढ्यात ते गाढव जोरात ओरडले,ते ओरडताच त्याच्या गळ्याशी बांधलेले सोन्याचे नाणे खाली पडले. ते नाणे पाहून डाकू त्या चांभाराला म्हणले “तुझ्याकडे तर पैसे नव्हते ना मग हे कुठून आले?” चांभार त्यांना म्हणला “हे जादुई गाढव आहे,ते ओरडले की त्याच्या तोंडातून सोन्याचे नाणे पडते “. डाकू त्याला म्हणले “मग हा गाढव आम्हाला दे”. चांभार त्यांना म्हणला “ते तुम्हाला दिले तर माझ्याकडे काहीच राहणार नाही “. डाकूनी त्याला 50 सोन्याच्या मोहरा दिल्या व ते गाढव त्याच्याकडून घेतले. चांभार खुश होऊन आपल्या गावाला गेला.
गावाला जाऊन त्याने एक घर घेतले व छोटे शेत घेतले व तो शेती करू लागला. इकडे ते डाकू गाढवाला घेऊन आपल्या गुहेत गेले. त्या डकुनपैकी जो सरदार होता तो बाकीच्याना म्हणला हे गाढव माझ्याकडे आजची रात्र राहील आणि त्यानंतर तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता. बाकी डाकू त्याला तयार झाले.सर्वांनी ते गाढव आपल्याकडे ठेवून पहिले पण गाढवाने सोन्याचे नाणे काही दिले नाही. ते पाहून त्या डाकू सरदाराला कळले की चांभाराने आपल्याला मूर्ख बनवले. तो त्या चांभारकडे जायला निघाला. ते सगळे डाकू जेव्हा चांभारकडे पोहचले तेव्हा चांभार त्याच्या शेतात काम करत होता. त्याने दुरूनच त्या संगळ्यांना येताना पहिले व तो पटकन घरात गेला. त्याने बायको ला सांगितले की मी आपल्या शेतात काम करतो,ते डाकू आल्यावर आपल्या ‘मायलो ‘ कुत्र्याला मला बोलवायला पाठव. ते डाकू तिथे आले व त्या बायकोला म्हणले की कुठे आहे तुझा नवरा त्याने आम्हाला मूर्ख बनवले. त्याला बोलव. असे म्हणल्यावर बायको नी मायलो कुत्र्याला त्या चांभारला बोलवायला पाठवले.ते पाहून त्या डाकू सरदाराला नवल वाटले की हा कुत्रा कसं काय त्याला बोलवून आणेल. एवढ्यात तिथे तो चांभार आला. तो आल्यावर डाकू त्याला म्हणले “आम्हाला तू मूर्ख बनवले आहेस. आमच्यापैकी कोणाही डाकुला सोन्याचे नाणे मिळाले नाही.”ते ऐकून चांभार म्हणला “तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो आहे,माझ्याकडे आज जे काही आहे ते त्या गाढवमुळेच आहे”. ते ऐकून डाकू म्हणले ठीक आहे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो पण अता हा कुत्रा पण आम्हाला पाहिजे. ते ऐकल्यावर चांभार म्हणतो नाही मी तुम्हाला हा कुत्रा देऊ शकत नाही.डाकू त्याला चाळीस सोन्याची नाणी देतात व चांभार तो कुत्रा त्यांना देतो. पण तो कुत्रा रोज त्या चांभारकडे पळून येई. हे पाहून तो डाकू सरदार खूप रागवतो व ते सर्व डाकू त्या चांभारकडे परत येतात.
आणखी वाचा : मूर्तीकाराची गोष्ट मराठी | Moral Stories in Marathi
तिथे आल्यावर ते त्या चांभाराच काही ऐकता त्याला एका पोत्यात बांधतात आणि घेऊन जाऊ लागतात. रस्त्यात त्यांना एक जंगल लागते. ते खूप थकलेले असतात म्हणून ते त्या पोत्याला एक झाडाखाली ठेवून समोरच्या मंदिरात जाऊन आराम करायच ठरवतात. एकडे तो चांभार कोणी येते का त्याची वाट पाहत असतो. तेवढ्यात त्याला एक माणूस येताना कहा आवाज येतो. त्याच्याकडे काही बकऱ्या असतात. जेव्हा तो माणूस त्या चांभारच्या पोत्याजवळून जातो तेव्हा तो माणूस पोत्यातून ओरडतो “नाही मला हे नाही करायच. ” त्या शेजारी असलेल्या माणसाला काही कळत नाही. तो म्हणतो तुला काय नाही करायच. चांभार म्हणतो “मला हे लोक पोत्यात घालून राजकुमारीशी लग्न करायला नेत आहेत ते मला नाही करायच.”ते ऐकल्यावर तो माणूस म्हणतो “अरे काय वेडा आहेस ! असा चान्स का सोडतोस. मला असा कोणी चान्स दिल तर मी लगेच जाईन.” हे ऐकून चांभार म्हणतो “मग तू ह्या पोत्यात बस मी तुला बांधतो आणि तू जाऊन राजकुमारीशी लग्न कर.” त्या माणसाला ते खरं वाटते व तो पोत्यात जाऊन बसतो. थोड्यावेळाने ते डाकू त्या माणसाला चांभार समजून घेऊन जाऊ लागतात तेव्हा अचानक समोर तो चांभार येतो. त्या डकुना काळात नाही की हा कुठून आला. तेव्हा तो चांभार म्हणतो की तुम्ही ज्या तळ्याच्या जवळ मला ठेवले होंते ते जादुई होते तिथे खाली सोन्याचे हांडे आहेत. तिथूनच मी आलो. हे ऐकून ते डाकू म्हणतात “की आम्हाला पण पाहिजेत ते हांडे”. तो चांभार त्या डकुना म्हणतो तुम्ही पोत्यात स्वतःला बांधून घ्या मी तुम्हाला त्या तळ्यात टाकतो. असे म्हणल्यावर ते डाकू तयार होतात.व तो चांभार त्यांना त्या तळ्यात ढकलुन देतो.
तात्पर्य : कुठल्याही कठीण प्रसंगात आपण न घाबरता मार्ग काढला पाहिजे.
आणखी वाचा : Moral Story for kids