झटपट किचन टिप्स | kitchen tips part 2 in Marathi
स्वयंपाक करणे ही एक कला आहे जी प्रत्येकानि आत्मसात केली पाहिजे. किचन हा घराचा आरसा असतो.(झटपट किचन टिप्स )जर आपले किचन स्वच्छ नीटनेटके असेल तर आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते. आजकाल स्वयंपाक ही फक्त महिलेची जबाबदारी नसून घरातील सगळयांनी मदत करणे हरजेचे आहे. अश्या वेळेला ह्या काही किचन टिप्स तुमच्या नक्कीच कमाला येतील.
- स्वयंपाक करण्यापूर्वी स्वयंपाकाची तयारी करणे अतिशय आवश्यक आहे,तयारी म्हणजेच आपल्याला काय काय लागणार आहे ते सर्वे साहित्य,भाजीपाला आपल्याजवळ असणे गरजेचे आहे. तसेच स्वयंपाक बनवण्यासाठी पुरेसे मसाले, धान्य आहे का नाही हे बघावे. अशी पूर्व तयारी केल्याने आपली आयत्या वेळेस ची गडबड वाचते.
- शक्यतो आठवडाभर आपण साधारण काय काय पदार्थ करणार आहोत त्याचे एक वेळापत्रक करून ठेवावे. वषेश करून नोकरी करणाऱ्या महिलांनी असे वेळापत्रक केल्यास आयत्या वेळेसची धावपळ वाचते. त्याप्रमाणे सामान,भाजी आणून ठेवू शकतो.
- भाजीसाठी लागणारे वाटण आधीच बनवून ठेवा तसेच लसूण ,आले ची पेस्ट करून ठेवू शकता.
- शेंगदाणे भाजून कूट करून ठेवावे.
- खोबरे खवून ते फ्रीजर मध्ये ठेवावे असे केल्याने कुठल्याही रस्सा भाजीत ते पटकन घालू शकतो.
- पोळ्या करताना जर शक्यतो लोखंडी तवा वापरावा. तवा वापरण्यापूर्वी त्याला सगळीकडे तेलाचा हात लावावा.
- भाजीमद्धे मीठ जास्त झाले तर त्यात थोडे बेसन मिसळावे.
- भाज्या कधीही चिरल्यानंतर पाण्यात टाकू नये नाहीतर त्यातील सगळी पोशक तत्वे पाण्यात विरघळून जातात.
- भाज्या चिरताना आपल्या जवळ एखादे प्लॅस्टिक चे भांडे नाहीतर डब्बा ठेवावा,भाज्या चिरताना जो काही कचरा होतो तो त्या भांड्यात गोल करून एकदम कचरा पेटीत टाकावा. असे केल्याने सारखा सारखा ओटा पुसायला लागत नाही.
- आपल्याला रोज लागणारे मसाले जसे की जिरे,मोहरी,हळद,हिंग,मीठ आपल्याला सोईस्कर ठिकाणी कोरड्या जागेत ठेवावा.
- दही लावताना दूध थोडे कोमट करून घ्यावे,आपले बोट घालून बोटाला सोसेल एवढेच गरम करावे व मगच विरजण घालून चांगले मिसळून घ्यावे. थंडीच्या दिवसात ऊब अश्या ठिकाणी ते भांडे ठेवावे . थंडीच्या दिवसांत गरम राहणाऱ्या भांड्यात किंवा कूकर मध्ये सुद्धा दही लावायला ठेवू शकता.
- भाज्या दीर्घकाळ फ्रीज मध्ये ठेवणार असणार तर त्या एखाद्या कॉटन च्या पिशवीत ठेवाव्या असे केल्याने भाज्यांमध्ये असणारे एक्स्ट्रा पाणी शोषून घेतले जाते व भाज्या टिकून राहतात.
- भेंडीची भजी करताना कधीही आधी मीठ घालू नये. तसे केल्याने भाजीला पाणी सुटून अजून चिकट होते.
- वांग्याची भजी करताना वांगी धुवून ती चिरल्यावर थोडा वेळ पाण्यात घालावी तसे केल्याने आतल्या भागात काही किडे असतील तर ते पाण्यात वर येतात.
- गाईचे दूध जर फटले तर ते टाकून देऊ नये. त्यात थोडे वीनेगर किंवा लिंबाचा रस घालून गरम करावे. व घरच्या घरी पनीर तयार करावे. पनीर केल्यावर सुद्धा ते पाणी तुम्ही कणिक भिजवताना वापरू शकता.
- भाकरीचे पीठ जून झाले असल्यास भाकरी करताना त्याला चीर जातात. अश्या वेळेस गरम पाणी करून भाकरीचे पीठ मळावे व भाकरी कराव्या.
- पालकाची प्यूरी करताना पालक गरम पाण्यातून काढून बर्फ असलेल्या पाण्यात टाकावा असे केल्याने पालकचा हिरवा रंग टिकून राहतो.
- काहीवेळा भाज्या आपण जास्त आणतो अश्या वेळी त्या वापरल्या नाही गेल्या तर फ्रीज मध्ये असल्या तरी खराब होतात तर त्यावेळी भाज्या चिरून फ्रीजर मध्ये ठेवाव्या आणि वापराव्या . वाया जात नाहीत.
- इडली,डोसा पीठ घरी भिजवताना त्यात थोडे मेथी दाणे टाकावे त्यामुळे डोस्याला रंग तर छान येतोच पण पीठ आंबायला सुद्धा मदत होते.
- कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येत असेल तर कांद्याच्या फोडी करून थोडा वेळ पाण्यात टाकाव्या.
- टोमॅटो दीर्घकाळ फ्रीज मध्ये राहावे यासाठी देठाची बाजू उलटी करून ठेवावी.
- फ्रीज किंवा मायक्रोव्हेव स्वच्छ करताना कधीही केमिकल चा वापर करू नये. (झटपट मराठी टिप्स )
- पुरी,भजी किंवा कोणतेही तेलकट पदार्थ करताना तेलाचे तापमान अतिशय महत्वाचे असते तेल नीट तापल्यावरच पुरी तळायला घ्यावी.
- तसेच कुठलेही तळणीचे पदार्थ करताना त्यात तेलाचे मोहन घालावे,असे केल्याने पदार्थ कुरकुरीत होतात.
- मिरची फ्रीज मध्ये ठेवण्यापूर्वी तिची देठ काढून ठेवावी.
- खिचडीसाठी साबूदाणा भिजवताना थोडा गरम करून मग तो पाण्यात भिजवावा असे केल्याने साबूदाणा छान मोकळा भिजला जातो.
- रात्री झोपण्यापूर्वी किचन ओटा स्वच्छ पुसून ठेवावा असे केल्याने झुरळ हॉट नाहीत.
- तूप कढवताना त्यात एक विद्याचे पान टाकावे त्यामुळे तुपाला छान कणी पडते.
- हिरव्या पालेभाज्या शक्यतो लोखंडी कढई मध्ये कराव्यात त्याने लोहाचे प्रमाण वाढते.
- पोळ्या करताना जर पोळीला लाटणे चिकटत असेल तर लाटणे थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवावे व मग पोळ्या कराव्या.
- मीक्सरच्या भांड्यात थोडे खडेमीठ टाकून फिरवल्याने भांड्यात असेलेल्या ब्लेड ची धार वाढते.
- कुठल्याही भाजीत कोथिंबीर घालायची झाल्यास शेवटी टाकावी असे केल्याने कोथिंबीरीचा रंग तसाच टिकून राहतो.
- ड्रायफ्रूट बाहेर राहिले तर खराब होऊ नये म्हणून त्यात थोडी लवंग घालून ठेवावी.
- पावभाजी करताना त्यात थोडे बीट किसून घालावे त्याने रंग चयन येतो.
- उकडीचे मोदक करताना जेव्हा आपण उकड काढतो तेव्हा त्यात थोडे तेल आणि मीठ टाकावे म्हणजे उकड छान चवीची होते तसेच उकड मळताना खूप गरम असते त्यामुळे एक भांडे किंवा वाती घेऊन त्याच्या खालच्या भागने पीठ मळून घ्यावे म्हणजे हात भाजत नाहीत.
आणखी वाचा :: https://marathipravah.com/kitchen-tips-and…ips-and-tricks-m/