तणाव कमी करण्यासाठी 5 टिप्स | 5 stress management tips
“जगी सर्व सुखी असा कोण आहे
विचारी मना तूची शोधूनी पाहे ”
समर्थ रामदास स्वामींनी खूप पूर्वीच आपल्याला हे मनाचे श्लोक मधून सांगितलेले आहे. जगात सर्व सुखी असे कोणीच नसते ही मोठी शिकवण त्यांनी दिली आहे. जशी जशी मानवाची प्रगती झाली तसेच मानवाच्या समस्या पण वाढत गेल्या. आजकाल असा कोणी नाही ज्याला stress हा शब्द माहीत नाही. अगदी लहान मुलांपासून मोठ्यानपर्यंत संगळ्यांच ताणावाला सामोरे जावे लागते. ह्या ताणावाचे गंभीर परिणाम आपल्या शारीरिक व मानसिक परिस्थिति वर होतात तसेच तणावामुळे आपल्या नातेसंबंधांवर पण परिणाम होताना दिसतो. हाच ताणाव कमी कण्यासाठी खालील टिप्स नक्की उपयोगी पडतील. (stress management tips)
तणाव कमी करण्यासाठी 5 टिप्स | 5 stress management tips :
-
तणावाची कारणे शोधा :
आपल्याला नक्की कुठल्या गोष्टीचा स्ट्रैस किंवा तणाव येतो आहे ते लक्षात येणे फार गरजेचे आहे. उदा. काही लोकांना लोक काय म्हणतील ह्या गोष्टीचा ताण येतो किंवा ऑफिस मध्ये माझा परफॉर्मेंस कसं असेल ह्यासाठी लोक चिंता करतात किंवा माझ्या मुलांच कस होइल ही चिंता सगळ्या आई वडिलांना असते .असे अनेक प्रकारचे तणाव आपण रोज बाळगत असतो. त्यातून आपल्याला खरंच कुठल्या गोष्टीचा ताण जास्त येतो आहे हे लक्षात आले तर आपण जास्त चांगल्या प्रकारे त्या गोष्टीला सांभाळू शकतो. असे म्हणले जाते की जास्त करून तणाव हा एखाद्या परिस्थितीचा नसून आपण ती परिस्थिति चांगल्या प्रकारे सांभाळू न शकल्याने जो त्रास होतो त्यांनी येतो. एकदा का आपल्याला करणे लक्षात आली की आपल्याला हे लक्षात यायला मदत होते की खरच एवढी मोठी गोष्ट होती का ज्यासाठी मी एवढा stess घेतला का फक्त माझ्या आळसमुळे ती गोष्ट करण्यात मी कंटाळा करत होते. काहीवेळा येणारा ताण हा तात्पुरता असू शकतो जो आपण सहज मॅनेज करू शकतो. अश्या वेळेस आपल्याला येणार ताण किंवा स्ट्रैस हीसाठी दुसरे जबाबदार नसून आपणच असतो. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कार्याची जबाबदारी घेत नाही तोपर्यन्त तुम्हाला ताण तणावाचे व्यवस्थापन जमणार नाही.
-
स्ट्रैस जर्नल (stress journal ) :
स्ट्रैस जर्नल म्हणजे काय तर तुम्ही तुमचे विचार जे काहीही असतील सकारात्मक किंवा नकारात्मक लिहून काढणे. जेव्हा तुम्ही तुमचे विचार लिहायला सुरवात करता तेव्हा आपोआप तुम्हाला कळत जाते की नक्की काय आहे ज्याचा मला त्रास होतो आहे आणि तो होणारा त्रास कमी करण्यासाठी मी काय केले.आपल्याला होणारा त्रास कमी करण्यासाठी मी कुठल्या चुकीच्या गोष्टी तर नाही ना करते हे सुद्धा तुम्हाला लक्षात येते. त्याबरोबरच आपले विचारांना वाट मिळाल्याने मनावर येणारा ताण कमी होतो.
-
मेडिटेशन आणि योग :
आपल्याकडे प्राचीन काळापासून मिळालेले वरदान म्हणजे ‘योग’ आहे. योगासनांचे आपल्या जीवनात अतिशय महत्वाचे स्थान असले पाहिजे.योग करण्याचे काही खालील फायदे :
- anxiety आणि ताणाव कमी होण्यास मदत होते.
- झोपेचे आरोग्य सुधारते.
- आपल्या शरीरात कॉरटीसॉल नावाचे संप्रेरक असते जे आपला मूड चांगला ठेवायला मदत करते म्हणून त्याला हॅप्पी हॉरमोन असेही म्हणतात. योग व मेडिटेशन नियमित केल्याने ह्या हॉरमोन किंवा संप्रेरकाचे कार्य सुधारते. ज्यामुळे आपण आनंदी राहतो.
- आपले मन शांत होण्यास मदत होते.
- कुठलेही काम करताना आपली एकाग्रता वाढते.
- आपली तब्येत सुधारण्यास मदत होते.
- आपली शारीरिक व मानसिक लवचिकता वाढते.
- कुठल्याही परिस्थितीला शांतपणे तोंड देण्याची ताकद मिळते.
असे असंख्य फायदे आपल्याला योगासन व मेडिटेशन केल्याने होतात.
आणखी वाचा : 6 healthy habits to adopt this year
-
संतुलित आहार व झोप :
संतुलित आहाराचे जसे शारीरिक फायदे आहेत तसेच ते मानसिक फायदे सुद्धा आहेत. जेव्हा आपल्यावर अतिरिक्त ताण असतो तेव्हा जर आपण पहिले तर आपल्या खण्यावर पण त्याचा परिणाम होतो. जेव्हा आपल्याला ताण असतो तेव्हा शरीरात कॉर्टिसॉल नावाचे एक हार्मोन स्त्रवते ज शरीराला स्वतःचे संरक्षण करण्यास मदत करते . तथापि,जर कॉर्टिसोलची पातळी दीर्घकाळापर्यंत वाढली असेल, जसे की वारंवार आणि सतत तणावामुळे, यामुळे अन्नाचा वापर वाढू शकतो, चरबीचा साठा आणि वजन वाढू शकते.संतुलित आहार घेतल्याने आपल्या शरीराला आवश्यक ती सर्व पोषाकतत्वे मिळतात. ज्यामुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राहते. तसेच रोज थोडावेळ सूर्यप्रकाशात गेल्याने आपल्याला विटामीन ड मिळते जे आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी अतिशय गरजेचे आहे. झोप ही आपल्यासाठी अतिशय गरजेची आहे. माणसाला कीमान 7-8 तास शांत झोपेची गरज असते. जर आपल्याला पुरेशी झोप मिळाली नाही तर मेंदू अधिक प्रमाणात शिणतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.रात्रीची चांगली झोप ही तुम्हाला ताणाशी सामना करण्यास सक्षम बनवते,जेव्हा आपली झोप झालेली नसते तेव्हा आपल्यात चिडचिडेपणा वाढुन आपली कार्यक्षमता कमी होते.
-
व्यायाम :
व्यायामाचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे.व्यायाम केल्याने आपल्याला ताजेतवाने वाटते. आपल्या शरीरातील रक्तपुरवठा सुधारतो. आपल्या हृदयाचे कार्य सुधारते. संशोधनानुसार व्यायाम आणि इतर शारीरिक हालचालींमुळे मेंदूतील एंडोर्फिन नावाचे संप्रेरक स्त्रवते. एंडोर्फिन हे नैसर्गिक वेदनाशामकाचे काम करते आणि झोप सुद्धा सुधारते ज्याने ताण कमी होतो. व्यायामामुळे तुमचे एकंदरीत आरोग्य सुधारते. जेव्हा आपण खूप ताणताणावत असतो तेव्हा फक्त 30 मिनटे चालून आल्याने सुद्धा आपल्याला बरे वाटते.आपला मूड सुधारायला मदत होते.
ताणाचे व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला एक आनंदी व उत्साही जीवन जगता येईल.
आणखी वाचा : आपल्याला भूक का लागते ?
हे बघा : https://www.youtube.com/watch?v=XdqVRtpf28k