दीपिका पादूकोण नी केली लोकांची तोंड बंद !

दीपिका पादुकोण ने केले pregnancy फोटोशूट | deepika padukon

 

 

बॉलीवुड मधील लोकप्रिय अभनेत्री दीपिका पादूकोण हि गेले अनेक दिवस आपल्या प्रेगनॅन्सी न्यूज मुळे चर्चेत आहे. अभिनेत्री ने 29 फेब्रुवरी 2024 ला आपण गरोदर असल्याचे आपल्या अधिकृत इनस्टाग्राम अकाऊंट वरुन सांगितले होते. त्यानंतर ती खरंच गरोदर नसून तिने सरोगसी कहा मार्ग  अवलंबवल्याची चर्चा खूप दिवसांपासून होत होती. आज अखेर त्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला.

दीपिका पाडूकोण व रणवीर सिंह ह्यांनी 2018 मध्ये एकमेकांशी लग्नाची गांठ बांधली. त्या आधी ते बरेच वर्ष एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु त्यांनी कुठलीच अधिकृत घोषणा केली नव्हती . बॉलीवुड मधील सर्वात लोकप्रिय जोडयानपैकी एक ही जोडी आहे. त्यांनी इटली मध्ये जाऊन आपला विवाहसोहळा पार पडला त्यानंतर दोघे आपल्या आपल्या कॅरियर मध्ये बिझी होते. जेव्हा पासून दीपिका ने आपल्या गरोदर राहण्याची बातमी इनस्टाग्राम सांगितली तेव्हापासून ही प्रेगनॅन्सी फेक असल्याची टीका तिच्यावर होत होती आज जेव्हा त्यांचे फोटो प्रसारमध्यमांवर आले तेव्हा सगळ्यांची तोंडे बंद झाली.हे कपल आता आपल्या होणाऱ्या बाळाची आतुरतेने वाट बघत आहेत. नव्या बाळाचे आगमन त्यांच्या बहुचर्चित नवीन घरात होणार अशी बातमी आहे. हे घर प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान ह्याच्या बंगल्याशेजारी आहे असे सांगण्यात येते.

केलेल्या फोटोशूट मध्ये दीपिका अतिशय सुंदर दिसत आहे तसेच रणवीर सिंह सुद्धा दीपिका बरोबर काही फोटो मध्ये दिसत आहे.तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे तसेच तिचे व रणवीर चे काही फोटो खूपच वायरल झाले आहेत