पावसाळ्यात आहार कसा असावा? Monsoon Diet and Lifestyle

पावसाळ्यात आहार कसा असावा?

पावसाळ्यात आपल्या शरीरातील अग्नि मंदावल्याने आपली पचनशक्ती कमी होते.यामुळे शरीरातील प्रतिकरशक्ती कमी होते. ह्या काळात वात शरीरात वाढल्याने पचनाचे आजार बळावतात. वात वाढल्याने संधिवात,मणक्याचे आजार,ज्वर अश्या आजारांना आमंत्रण मिळते. तसेच दूषित पाण्याने कावीळ,मलेरिया,अतिसार असे विकार होतात. त्यामुळे ह्या ऋतुत आहारचे काही नियम पाळणे गरजेचे आहे.पावसाळ्यात विटीमिन सी तसेच antioxidant चे सेवन करावे.

पावसाळ्यात आहार कसा असावा :

  • कडधान्यांचा समावेश आहारात करावा. कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आणि भरपूर जीवनसत्व,खनिजे असतात जे शरीराला अनेक रोगांपासून वाचवतात.
  • या ऋतूमध्ये आहार गरम आणि ताजा असावा.
  • आहात पंचण्यास हलक्या व ताज्या पदार्थांचा समावेश असावा. गहू तसेच विविध डाळी भाजून त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवावे.
  • ह्या ऋतूमध्ये मांसाहार करणे टाळावे कारण मांसाहार पचायला जड असल्याने त्याचे सेवन टाळावे.
  • मसल्यांमद्धे हिंग ,जिरे,धने,काळी मिरी ,लवंग ह्या मासल्यांचा वापर करावा. तसेच कोथिंबीर,पुदिना,आले,लिंबू हे पाण्यात घालून ते पाणी प्यायल्याने शरीरातील गॅस कमी होण्यात मदत होते.
  • पावसाळ्यात गाईचे दूध ,ताक, दही आणि देशी तुपाचे सेवन करावे .
  • तेलकट व मसालेदार पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन करावे.
  • पावसाळ्यात येणाऱ्या भाज्या जसे की दुधी,दोडका,कारले अश्या सर्व वेली प्रकारांत मोडणाऱ्या भाज्या खाव्या.
  •  घरात धूप ,कपूर हे संध्याकाळी जाळावे.
  • मधाचे सेवन केल्याने शरीरातील वात कमी होण्यास मदत होते .
  • बाहेरचे तळलेले पदार्थ शक्यतो टाळावे.
  • लासुनाचा आहारात समावेश करावा त्याने श्वसन विकार होण्यास प्रतिबंध होतो.

 पावसाळ्यातील राहणीमान 

  • या ऋतुत जास्त पावसात जाणे टाळावे. डोके भिजल्यास कोरडे करावे.
  • हवेत दमटपणा असल्याने कपडे पटकन वळत नाहीत अश्या वेळेस कपडे पूर्ण कोरडे झाल्याशिवाय वापरू नये कारण असे दमट कपडे वापरल्याने त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते .
  • आंघोळीला जायच्या आधी खोबरेल तेल लावावे.
  • अपरिचित ठिकाणी जायच्या आधी त्या परिसराची पूर्ण माहिती काढून घ्यावी. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अचानक वाढून अनेक अपघात होण्याची शक्यता असते.

आणखी वाचा : https://marathipravah.com/आपल्याला-भूक-का-लागते