मंगळागौरीची कहाणी | manglagaurichi kahani

मंगळागौरीची कहाणी | manglagaurichi kahani 

एक आटपाट नगर होतं. तिथे एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी यायचा.”अल्लख ” म्हणून पुकारायचा.वाण्याची बायको भिक्षा आणि “निपुत्रकाच्या हातची भिक्षा घेत नाही “असे म्हणून गोसावी निघून जाई. तिने ही गोष्ट नवऱ्याला सांगितली. नवऱ्याने तिला एक युक्ति सांगितली.”दाराच्या मागे लपून बस अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल ” अशी भिक्षा घातली. बुवाचा नेम मोडला. बाईवर तो रागवला. मूल बाळ होणार नाही असा शाप दिला. बाईने त्यांचे पाय धरले. बुवनी उःशाप दिला. बुवा म्हणले “आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस. निळे वस्त्र परिधान कर. रानात जा. जिथे घोडा आडेल तिथे खण. देवीचे देऊळ लागेल,तिची प्रार्थना कर तिच्या कृपेने पुत्र होईल ” असे बोलून बुवा निघून गेले.

तिने आपल्या पतीला सांगितले.वाणी रानात गेला,घोडा आडला तिथे खणले,देऊळ लागले,सुवर्णाचे देऊळ लागले. हिरेजडितांचे खांब आहेत,माणकांचे कळस आहेत आत देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली,देवी त्याला प्रसन्न झाली,”वर मग “म्हणली.”घरदार आहे ,गुरढोर आहेत,धन द्रव्य आहे,पण पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे“. देवी म्हणाली “तुला संतती नाही मी प्रसन्न झाले तर तुला देते. अल्पायुषी घेतलास तर गुणी मिळेल,दीर्घायुषी घेतलास तर जन्माध होईल,कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल तर मागून घे” वाण्याने अल्पायुषी पुत्र मागितला. देवी महणली “माझ्या मागच्या बाजूस जा. तिथे एक गणपती च्यामागे आंब्याच झाड आहे,गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घेऊन बायकोला घरी नेऊन घाल तुझा कार्यभाग होईल. “असे सांगून देवी अदृश्य झाली.

 

आणखी वाचा : श्रावण महिना माहिती

वाणी देवळामागे गेला,गणपतीच्या दोंदावर पाय  दिला, पोटभर आंबे खालले,मोटभर घरी नेण्याकरिता घेतले,खाली उतरून बघतो तर एकच आंबा ,असे चार पाच वेळा झाले. गणपतीला त्रास झाला त्याने सांगितले ” तुझ्या नशिबी एकच फळ आहे. ” फळ घरी घेऊन आला. बायकोला खायला घातला. बायको गरोदर राहिली. देवसामासा गर्भ वाढू लागला. दिवस पूर्ण झाले. मुलगा झाला.दोघांना मोठा आनंद झाला आठव्या वर्षी मुंज केली,दहाव्या वर्षी ‘लग्न करा’ म्हणली.  “काशियात्रेशिवाय माझ लग्न करण नाही”असा जवाब दिला.  काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवले. मामा भाचे काशीला जाऊ लागले. मध्ये काय झाले?

वाटेत एक नगर लागले. तिथे काही मुली खेळत होत्या.त्यांचे भांडण झाले,त्यात एक गोरी भुरकी मुलगी होती ,तिला दुसरी म्हणली “काय रांड द्वाड आहे ! काय रांड द्वाड आहे “. तेव्हा ती मुलगी म्हणली “माझी आई मंगलागौरीचे व्रत करते,आमच्या कुलवंशामद्धे कोणी रांड राहणार नाही,मग मी तर तिची मुलगी आहे.” हे भाषण मामाणे ऐकले. त्याच्या मनात आले हिच्याशी भाच्याच लग्न कराव,म्हणजे तो दीर्घायुषी होईल. परंतु हे घडत कसं?

त्या दिवशी तिथेच मुक्काम केला. एकडे काय झाल,त्यादिवशी मुलीच लग्न होता,नवरा मुलगा आजारी पडला,मुलाच्या आईएबापाला चिंता पडली,वाटेत कोणी मिळाले तर बरं होईल,वेळ साजरी  करू ,म्हणून धर्मशाळा पहिली. मामा भाचे दृष्टीस पडले,मामपासून भाच्याला नेल. गोरज लग्न लावून दिले. उभयंतांना गौरीहारापाशी निजवल. दोघ झोपी गेले. मुलीला देविने दृष्टान्त दिला “अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सांप येईल,त्याला प्यायला दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव,सांप दूध पिऊन कऱ्यात शिरेल आंगच्या चोळीने तोंड बांधून टांक,सकाळी उठून आई ला ते वांण दे.” मुलीने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आले. काही वेळाने नवरा उठला भूल लागली म्हणू लागला,लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्याने आपली अंगठी तिला दिली. पहाटेच उठून ताट घेऊन मामा भाचे मार्गस्थ झाले.

दुसऱ्या दिवशी काय झाले? हिने सकाळी उठून स्नान केले,आईला वांण दिले,आईने उघडून पहिले तर आत हार निघाला. आईने मुलीच्या गळ्यात हार घातला. पुढे पहिलं नवरदेव मांडवात आला. मुलीला खेळायला आणले, मुलगी म्हणली “हा माझा नवरा नाही मी त्याच्याबरोरबर खेळत नाही“. रात्रीची अंगठी व लाडवांची खूण काही पटेना. आईएबापाला चिंता लागली,हीचा वर कसा मिळेल?नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केले. जो ब्राम्हण येईल त्याचे अंगठी घालून मुलीने पाय धुवावे. आई ने पाणी घालव आणि भावान गंध लालवा व बापाने विडा द्यावा. असा क्रम चालू केला. शेकडो लोक जेवून गेले.

इकडे मामा भाचे काशीस आलेपुष्कळ दानधर्म केला. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली,दोघांच युद्ध झाल. यमदूत पळून गेले. गौर अदृश्य झाली. भाच्याला जाग आली,त्याने मामाला स्वप्न सांगितले. मामा म्हणला “बरे झाले ,तुझ्यावरच विघ्न टळले. उद्या आपण घरी जाऊ”.परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासिनी येऊन सांगितले एथे अन्नछत्र आहे तिकडे जा.”परान्न घेत नाही “असे म्हणले. दासिने यजमानांना सांगितले. त्यांनी पालखी पाठवली.

पाय धुताना मुले नवऱ्याला ओळखले,नवऱ्यानी अंगठी ओळखली,आईबापांनी विचारले “तुझ्याकडे खूण काय आहे”. त्यांनी ताट दाखवले. सर्वाना आनंद झाला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासूने सुनेचे पाय धरले,”तुझ्यामुळे माझ्या मुलाचे प्राण वाचले “. “ही सगळी मंगलागौरीची कृपा “. मुलगी म्हणाली.सासर माहेरची माणसे एकत्र झाली आणि मंगलागौरीचे उद्यापन केले.

अशी ही धर्मराजाला  कृष्णानी सांगितलेली साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी(मंगळागौरीची कहाणी | manglagaurichi kahani)  सुफळ संपूर्ण .