हरतालिका व्रताची कहाणी | Hartalika Vrat Khani

हरतालिका व्रताची कहाणी | Hartalika Vrat Khani

हरतालिका हिंदू महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक व्रत आहे. भाद्रपद शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी देवी पर्वतीने हे व्रत केले होते. हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या अखंड सौभगयसाठी तर कुमारिका चांगला वर मिळण्यासाठी हे व्रत करतात. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी हे व्रत करतात. ह्या दिवशी महिला उपास करून हरतालिकेची पूजा करतात व दुसऱ्या दिवशी उपास सोडतात. ह्या दिवशी शिव पार्वतीची पूजा केली जाते. (हरतालिका व्रताची कहाणी) पार्वतीने  शिवप्राप्तीसाठी  तपश्चर्ये केली  म्हणून पार्वतीला ‘हरितालिका’ असे म्हणतात. हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे.

हरतालिक पूजा विधी : 

कुमारिका आणि विवाहित महिला ह्या हरतालिकेची पूजा करतात. भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत या वर्षी शुक्रवार 6 सेप्टेंबर 2024 रोजी केले जाईल. ह्या दिवशी स्त्रिया लवकर उठून स्नान करून नवीन वस्त्र परिधान करतात. साज शृंगार करतात. पूजा करताना  चौरंगावर केळ्याच्या पानांचा मांडव करून त्यात वाळूची शिवपिंडी करतात.रात्री जागरण करून महिला खेळ खेळतात, गाणी म्हणतात किंवा भजन किर्तन करतात. शेवटी कथा ऐकली जाते आणि आरती म्हणतात.ह्या दिवशी उपास करून दुस-या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटता आणि नंतर महिला आपला उपवास सोडतात.

आणखी वाचा : मंगळागौरीची कहाणी | manglagaurichi kahani

हरतालिका व्रताची कहाणी :

एके दिवशी भगवान शंकर व देवी  पार्वती कैलाश पर्वतावर बसले होते. पर्वतीने शंकरांना विचारल “भगवान सर्व व्रतांमधले सगळ्यात चांगले व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ ,असे कोणते व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याइने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा ” तेव्हा भगवान शंकर म्हणले “जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णु श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो.” हेच व्रत तू पूर्वजन्मी केलंस आणि त्याच पुण्याइने तू मला प्राप्त झालीस हे ऐक.

हे व्रत भाद्रपद महिन्यातील तृतीयेला करावे. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून खूप मोठे तप केलेस. चौसष्ठ वर्ष तर झाडाची पिकलेली पान खाऊन तू राहिलीस. थंडी,पाऊस,ऊन सर्व सहन केलेस. तुझे हे शर्म पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले ‘अशी कन्या कोणाला द्यावी ‘ अशी चिंता त्यांना लागली. इतक्यात तिकडे नारदमुनी आले. हिमालयानी त्यांची पूजा केली व येण्याच कारण विचारल. तेव्हा ते म्हणले “तुझी कन्या उपवर झाली,ती विष्णूला द्यावी मी तिचा हात मागायला आलो आहे “. हिमालयाला ते ऐकून आनंद झाला. त्यांनी ते मान्य केले.

त्यानंतर नारदमुनी विष्णुकडे गेले,त्यांना ही हकीकत कळवली व दुसरीकडे निघून गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीन एक घोर अरण्यात नेले. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केल्यास. तिथ माझी लिंग पर्वतीसह स्थापलीस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद तृतीयेचा होता. रात्री जागरण केलस. त्या पुण्यान माझ इथल आसन हालल,नंतर मी तिथे आलो,तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. तू म्हणलीस “तुम्ही माझे पाती व्हा,दुसरी काही इच्छा नाही. ” नंतर मी गोष्ट मान्य केली आणि गुप्त झालो.

दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याच पर्ण केलस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. तू त्यांना झालेली सर्व हकीहत संगीतलीस. पुढे त्यांनी तुला मला देण्याचे वचन दिले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला ‘हरितालिका व्रत’ असं म्हणतात. याचा विधी असा आहे.

ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साता जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात. दळिद्रं येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.

हरतालिका व्रताचे नियम :

  • हरतालिका व्रत निर्जल केल्यास त्याचे महत्व आहे.
  • एकदा हरतालिका व्रत केल्यास ते कायम करावे.
  • हरतालिका तीज दरम्यान तुमची मासिक पाळी आली तर काळजी करू नका; तुम्हाला अजूनही उपवास ठेवण्याची परवानगी आहे परंतु मूर्तींना स्पर्श न करता पूजा पूर्ण करणे आवश्यक आहे .
  • काही महिला निर्जळी उपवास करतात, उपवास सोडताना शक्यतो आरोग्याला चालतील अश्या पदार्थांचे सेवन करावे, ज्यामुळे दिवसभराचा थकवा आणि अशक्तपणा दूर होईल. तुम्ही उपवास सोडण्यासाठी दह्याचे सेवन करू शकता.

 आणखी वाचा : Ganesh chaturthi 2024 | गणेश चतुर्थी माहिती मराठी