12 ज्योतिर्लिंग माहिती इन मराठी | 12 jyotirling mahiti in marathi |how many jyotirlinga in maharashtra
भारतात भगवान शंकराची एकूण 12 प्रमुख मंदिरे आहेत. त्यांना 12 ज्योतिर्लिंगे असे म्हणतात.ज्योति ह्या शब्दाचा अर्थ तेज आणि लिंग म्हणजे शंकराचे प्रतीक. तेव्हा ज्योतिर्लिंग ह्या शब्दचा अर्थ होतो तेजनिधी शंकराचे प्रतीक.
धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा :
सोमनाथं ,मल्लिकार्जुन,म्महाकालेश्वर,वैद्यनाथं,भीमशंकरम्,रामेश्वर , नागेश्वर, विश्वेशर ,त्र्यम्बकेश्वर ,केदारनाथ,घृष्णेश्वर
हिंदू धर्मात ह्या ज्योतिर्लिंगांना अतिशय महत्व आहे,एवढेच नाही तर जो ह्या 12 ज्योतिर्लिंगांनचे दर्शन घेतो त्याला मोठे भाग्य प्राप्त होते असे महणतात. हिंदू धर्मानुसार अस म्हणल जात की जी व्यक्ति “वरील बारा ज्योर्तिलिंगाचे नावानुरूप मंत्र” जर दररोज पहाटे व सायंकाळी जपन केला तर सात जन्मातील झालेला पाप ज्योर्तिलिंगाच्या स्मरणामुळे / जप केल्यामुळे सर्व पापांचा विनाश होतो.
आणखी वाचा : Maharashtra Information In Marathi | महाराष्ट्र माहिती मराठी
12 ज्योतिर्लिंगे कोणती ? व ती कुठे आहेत ?
- सोमनाथ ज्योतिर्लिंग ( Somnath jyotirling) ( गुजराथ – गीर सोमनाथ / जिल्हा वेलावळ ) :
सोरठी सोमनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांन पैकी एक मंदिर आहे. हे भारतातील गुजराथ मध्ये वेरावळ येते स्थित एक मंदिर आहे. सोमनाथ म्हणजे “सोमचा देव” किंवा “चंद्र”.या जागेला प्रभासा (“वैभवाचे स्थान”) असेही म्हणतात. प्राचीन सोमनाथ मंदिरात “बानस्तंभ” नावाचे एक रहस्य आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूस, समुद्राच्या कडेला, “बानस्तंभ” नावाचा स्तंभ आहे. खांबाच्या वरच्या बाजूला एक बाण बांधला आहे, जो समुद्राकडे निर्देशित करतो.सोमनाथळ 17 वेळ लुटले गेले,परंतु ते परत मजबूत करण्यात आले. सोमनाथ येथे त्रिवेणी संगम (कपिला ,हिरण आणि सरस्वती ह्या नद्यांचा ) असल्याने हे ठिकाण प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्र आहे. सोमनाथला भेट देण्याचा उत्तम कल महणजे नोव्हेंबेर ते फेब्रुवारी कारण त्या दरम्यान हवा थंड असते.
- मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग (Mallikarjun jyotirling ) (आंध्र प्रदेश – श्रीशैल्य) :
मल्लिकार्जुन हे हे 12 ज्योतिर्लिंगांन पैकी एक मंदिर आहे. हैद्राबादपासून सुमारे २१० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. येथे पूर्वी असलेल्या महाकाली मंदिरात नंदी तपस्या करत होता,त्याच्या तपस्येवर प्रसन्न होऊन मल्लिकार्जुन आणि ब्रम्हरंभा रूपात शिव-पार्वती प्रकट झाले असे मानतात. असे महणले जाते की,जय दिवशी शिव कार्तिकेयला भेटायला गेले तो दिवस आमवास्येचा होता,त्यामुळे आजही अमावास्येच्या दिवशी येते शिव दर्शन होते असे म्हणतात.
- महाकालेश्वर ज्योतिर्लिंग (Mhakaleshwar jyotirling) (मध्य प्रदेश – उज्जैन):
महाकालेश्वर मंदिर हे मध्य प्रदेश मध्ये उज्जैन येथे स्थित आहे. एका आख्याइकेनुसार चंद्रसेन नावाचा राज्य उज्जैनवर राज्य करत होता आणि तो शिवभक्त होता. जेव्हा शत्रूने उज्जैनवर आक्रमण केले तेव्हा भगवान आपल्या महाकाल रूपात प्रकट झाले आणि त्यांनी शत्रूचा नाश केला. तेव्हापासून महाकाल भक्तांच्या आग्रहनुसार तेथे राहायला लागले. असे महणतात की दूसरा कुठलाच राज्य त्या नंतर तिथे राहू शकत नाही कारण महाकाल बाबाच तेथे राज्य करतात.
- ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग (Omkareshwar jyotirling ) (मध्य प्रदेश -ओंकारेश्वर ,खंडवा जिल्हा )
ओंकारेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांन पैकी एक मंदिर आहे.हे मध्य प्रदेशमधील खंडवा जिल्हा येथे आहे. हे नर्मदा नदीमध्ये मांधता अथवा शिवपुरी नामक बेटावर वसलेले आहे. राजा मांधाताने येथे नर्मदा किनाऱ्यालगतच्या पर्वतावर तपस्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले आणि त्याच्याकडून येथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले. तेव्हा पासून ही तीर्थ नगरी ओंकार-मान्धाता या नावानेही ओळखली जाऊ लागली.देवी अहिल्याबाई होळकर यांच्या काळापासून येते एक विशिष्ट दिवशी मातीची 18 हजार शिवलिंगे तयार करून पूजा करून नर्मदेत वाहण्याची प्रथा आहे.ओंकारेश्वर येथे एकूण ६८ तीर्थ आहेत. याशिवाय २ ज्योतिस्वरूप लिंगांसहित १०८ प्रभावशाली शिवलिंगे आहेत. मध्यप्रदेशात प्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगांपैकी २ ज्योतिर्लिंगे आहेत. एक महाकाल नावाचे उज्जैन मध्ये, व दुसरे अमलेश्वर नावाचे ओंकारेश्वर येथे आहे.
- वैजनाथ ज्योतिर्लिंग (Vaijnath jyotirling) (महाराष्ट्र – बीड जिल्हा ):
परळी वैजनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांन पैकी एक मंदिर आहे.हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांन पैकी परळी वैजनाथ हे सर्वात जागृत ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते.
- भीमाशंकर ज्योतिर्लिंग (Bhimashankar jyotirling) (महाराष्ट्र – भीमाशंकर ,पुणे जिल्हा ) :
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे.भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांन पैकी एक मंदिर आहे.या ज्योतिर्लिंगमधून महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे भीमाशंकर हे महाराष्ट्रातील हे पर्यटनस्थळ आहे. हेमांडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे 1200-1400 वर्षापूर्वीचे आहे. मंदिराच्या छतावर,खांबावर सुंदर नक्षीकाम आहे. असे महणले जाते की येथे येऊन तुम्ही जी इच्छा मनोभावे मागाल ती पूर्ण होते. दरवर्षी भारतातून मोठ्या प्रमाणात नागरिक येथे येतात.
- रामेश्वरम ज्योतिर्लिंग मंदिर (Rameshwar jyotirling) (तमिळनाडू : रामेश्वर )
रामनाथस्वामी मंदिर हे भारतातील तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटावर स्थित हिंदू देव शिवाला समर्पित एक हिंदू मंदिर आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे .रामनाथस्वामी मंदिर त्याच्या आकर्षक रचना, भव्य मनोरे, गुंतागुंतीच्या शिल्पकला आणि कॉरिडॉरसाठी ओळखले जाते, ज्यामुळे ते एक वास्तुशिल्प चमत्कार बनते. मंदिरात पूजा केली जाणारी मुख्य देवता लिंगाच्या रूपात आहे.
- नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर (Nageshwar nagnath ) (महाराष्ट्र ):
- विश्वेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर (Vishveshwar Jyotirling) ( उत्तर प्रदेश – वाराणसी )
विश्वेश्वर मंदिर हे भारतातील काशी येते असून, हे 12 ज्योतिर्लिंगांन पैकी एक मंदिर आहे.विश्वनाथ ज्योतिर्लिंगाव्यतिरिक्त, हे मंदिर विश्वेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून देखील ओळखले जाते, ज्याचा अर्थ जगाचा शासक अर्थात भगवान शिव स्वतः आहे.
- त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर (Trimbkeshwar Jyotirling) (महाराष्ट्र – नाशिक )
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे महाराष्ट्रातील नाशिक येते स्थित आहे, हे 12 ज्योतिर्लिंगांन पैकी एक मंदिर आहे. त्र्यंबकेश्वरला ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशी तीन छोटी शिवलिंगे आहेत. या ठिकाणी दर्शन घेतल्याने भाविकांना सौभाग्य प्राप्त होते, आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.
- केदारनाथ ज्योतिर्लिंग मंदिर (kedarnath Jyotirling) (उत्तराखंड -केदारनाथ )
केदारनाथ हे भगवान शिवयांचे मंदिर उत्तराखंड मध्ये केदारनाथ येथे स्थित आहे. हे मंदिर मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. हे मंदिर अक्षय तृतीय ते कार्तिक पौर्णिमा ह्या काळातच खुले असते,हिवाळ्यामध्ये येथील देवांच्या मूर्ती उखीमठ येते आणून पूजा केली जाते.
- घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर (Ghrushneshwar Jyotirling) (महाराष्ट्र – वेरूळ)
घृणेश्वर किंवा धुष्मेश्वर मंदिर म्हणूनही ओळखले जाणारे, औरंगाबादमधील हे ज्योतिर्लिंग भगवान शिवाला समर्पित आहे आणि एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते . घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात लहान आहे आणि भारतातील शेवटचे किंवा 12 वे ज्योतिर्लिंग मानले जाते.