15 August Mahiti in Marathi | 15 ऑगस्ट माहिती
भारत माझा देश आहे,असे जेव्हा आपण महणतो तेव्हा प्रत्येक भारतीयाची मान गर्वानी उंचावते. हा दिवस सर्व भारतीय मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात.ह्या वर्षी म्हणजेच 15 ऑगस्ट 2024 ला आपण आपला 77 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत.(15 ऑगस्ट माहिती)
पण तुम्हाला माहीत आहे का की आपण का हा दिवस एवढ्या आनंदात साजरा करतो?
15 ऑगस्ट 1947 ह्या दिवशी भारताला 150 वर्षाहून अधिक काळ इंग्रजांच्या जाचात असलेल्या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले.15 ऑगस्ट 1947 ह्याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 च्या तरतुदी लागू होऊन भारतीय संविधान सभेला वैधानिक सार्वभौमत्व प्राप्त झाले होते.भारताचे प्रजासत्ताक देशात रूपांतर होईपर्यंत राज्याचे प्रमुख म्हणून किंग जॉर्ज सहावे हे कारभार पाहत होते.26 जानेवारी 1950 रोजी (प्रजासत्ताक दिन) भारताने राज्यघटना स्वीकारली आणि देशाचा सार्वभौम कायदा असलेले भारतीय संविधान लागू झाले व देश प्रजासत्ताक झाला.
स्वातंत्र्यानंतर धार्मिक आधारावर भारताची फाळणी झाली,ज्यामध्ये ब्रिटिश भारत हा भारत आणि पाकिस्तान मध्ये विभागला गेला.त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 भारताच्या स्वातंत्र्य दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांनी दिल्लीच्या लाल किल्यावरील लाहोरी गेट वर तिरंगा फडकवला.त्यानंतर प्रत्येक स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वज फडकवतात आणि राष्ट्राला संबोधित करतात.
भारतभर स्वातंत्र्य दिन हा ध्वजारोहण समारंभ, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा केला जातो. ह्या दिवशी संपूर्ण भारतभर सुट्टी दिली जाते
स्वातंत्र्य दिनाचा उत्सव :
स्वातंत्र्य दिन हा तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी असतो. स्वातंत्र्य दिवसाच्या आदल्या दिवशी भारताचे राष्ट्रपति राष्ट्राला संबोधित करतात.15 ऑगस्ट ला भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजरोहण करतात.राष्ट्रगान “जन गण मन “ म्हणले जाते, त्यानंतर पंतप्रधान आपल्या भाषणात वर्षातील कामगिरीवर प्रकाश टाकतात. तसेच येण्याऱ्या वर्षात होणाऱ्या कामाचा आढावा सांगतात. त्यादिवशी पंतप्रधानांच्या भाषणानंतर भारतीय सशस्त्र दल आणि भारतीय निमलष्करी दलाच्या तुकड्या ह्यांचा मार्च पास्ट होतो. 15 ऑगस्ट दिवशी होणाऱ्या परेड व स्पर्धांमध्ये स्वातंत्र्यलढ्यामधले देखावे सादर केले जातात.
भारताच्या सर्व राज्य व केंद्रसाशीत प्रदेशात सुद्धा मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करतात. सर्व राज्यातील मुख्यमंत्री ध्वज फडकवतात व त्यानंतर परेड व स्पर्धा होतात. सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी असली तरी सकाळी सर्व विद्यार्थ्याना व शिक्षकाना बोलवून ध्वज फडकवला जातो.सरकारी कार्यालयांमध्येसुद्धा 15 ऑगस्ट साजरा केला जातो. सरकारी कार्यालयात आकर्षक रोश णाई केली जाते भिंतींवर फुगे लावले जातात व सर्व कर्मचारी एकत्र येऊन राष्ट्रगान “जन गण मन “ म्हणतात.देशात सगळीकडे निष्ठेचे प्रतीक म्हणून राष्ट्रध्वज मुबलक प्रमाणात वापरले जातात.
आणखी वाचा : पावसाळ्यात आहार कसा असावा? Monsoon Diet and Lifestyle
स्वातंत्र्य चळवळ :
भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शेकडो लोकानी आपले प्राण गमावले आहेत. स्वातंत्र्याच्या लढाईत रविंद्रनाथ टागोर,सुब्रमण्यम भारती,बंकिमचंद्र चटोपाध्याय ह्यासारख्या विचारवंतांनी देशभक्तीची भावना लोकांमध्ये पसरवली. तर सरोजिनी नायडू,कस्तुरबा गांधी यांसारख्या महिला नेत्यानी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील वंचित घटकांना मदत केली.काही नेत्यानी सशस्त्र क्रांतीच्या अवलंब केला,त्यामुळे चंद्रशेखर आझाद,भगतसिंग राजगुरू,सुखदेव ह्यासारखे क्रांतिकारकांचा समावेश होता,ज्यांनी हसत हसत आपल्या देशासाठी फाशीची शिक्षा स्वीकारली. इ.स.१९४२ साली तेव्हाच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ब्रिटिशांकडे भारताच्या स्वातंत्र्याची जोरदार मागणी करायला सुरुवात केली. छोडो भारत असे या आंदोलनाचे नाव होते. यामध्ये संपूर्ण भारतातून मोठ्या प्रमाणावर उत्सफूरतपणे लोकांनी सहभाग नोंदविला.भारतीयांचा संघर्ष ब्रिटिश सत्ता दडपून शकली नाही आणि क्रांतीकारकांच्या बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळण्याची चिन्हे दिसू लागली.
महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामतील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते. त्यांनी अहिंसक आंदोलनाचा वापर ब्रिटिशांपासून भारताला मुक्ती मिळवण्यासाठी केला . ब्रिटिश सत्तेचा भारतातिल राजवट मोडून काढणीसाठी पद्धतशीर आणि नियोजनपूर्वक चळवळ आखली गेली. महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली मिठाचा सत्याग्रह केला गेला. ह्या सत्याग्रहात नागरिक स्वतःच्या प्रेरणेने सहभागी झाले.मिठाचा सत्याग्रह किंवा ब्रिटिश राजवटीशी असहकार चळवळ या चळवळी त्यांच्या नेतृत्वाने झाल्या.या चळवळींमुळे देशातील नागरिकांमद्धे स्वातंत्र्याची जाणीव वाढविण्यात यश आले
स्वातंत्र्यदिनाबद्दल काही रोचक तथ्य :
- जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपले राष्ट्रगीत “जन गण मन ” लिहिले गेले नव्हते.
- महात्मा गांधीना भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिवस सोहळ्यात येता आले नाही.
- 14 सेप्टेंबर रोजी हिन्दी ही आपली राष्ट्रभाषा म्हणून घोषित झाली.
भारतात हा दिवस पाहण्यासाठी वीर सावरकरांसारखे विचार असलेल्या अनेक स्वातंत्रसैनिकांनी आपले प्राण गमावले आहेत . स्वातंत्र्याचा हा संघर्ष बराच काळ सुरू होता. आजही आपल्या देशाचं डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या सैनिकांची आजही देशासाठी बलिदान देण्याची तयार आहे.अश्या ह्या अभूतपूर्व स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा !
आपले राष्ट्रगीत :
जन गण मन अधिनायक जय हे ,भारत भाग्य विधाता
पंजाब सिंध गुजराथ मराठा ,द्रविड उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधी तरंग.
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे.
गाहे तव जयगाथा.
जनगणमंगलदायक जय हे, भारतभाग्यविधाता.
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे.
भारत माता की जय