6 healthy habits to adopt this year

How to create healthy habits | निरोगी आयुष्यासाठीच्या ‘या ‘6 सवयी 

आपल्या सगळ्यानाच वर्षाच्या सुरवातीला काही resolutions करायची सवय असते. आपण सगळेच बहुतेक जानेवारीच्या पहिल्या दिवशी आपल्या आरोग्य कसे निरोगी राहील ह्या साठी काही resolutions बनवतो.पण बहुतेक जण जानेवारीच्या शेवटपर्यंत देखील ते पाळू शकत नाहीत.

ह्याचे प्रामुख्याने कारण हे असते की आपण आपल्यासाठी जे गोल्स सेट केलेले असतात ते  काही realistic महणजेच वास्तववादी नसतात. त्यामुळे आपण आपले गोल्स मिळवण्यात असमर्थ ठरतो. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी लागणारा वेळ आपण द्यायला तयार नसतो.पण ते महणतात ना “Better late than never ” हे लक्षात घेऊन आपण कधीही आपले लक्ष्य गाठण्यासाठी प्रतन्य करू शकतो. ह्या लेखात आपण पाहूया अश्या 6 सवयी ज्यांनी तुमचे आयुष्य निरोगी करण्याचे लक्ष्य तुम्ही सहज गाठू शकाल.

निरोगी आयुष्यासाठीच्या ‘या ‘6 सवयी : healthy habits to adopt this year 

1 . पुरेशी झोप घेणे : 

झोप ही शरीराची पुनुरावर्ती अवस्था.आता बऱ्याच संशोधनातून हे सिद्ध झाल आहे की झोप ही मानवाच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा घटक आहे. एक्स्पर्ट्स च्या मते झोप ही व्यायाम आणि आहार (diet) ह्यापेक्षा ही महत्वाची आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीराचे कार्य चालू असते.सलग 6-8 तासांची झोप ही आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालवण्यासाठी पुरेशी असते. पुरेशी झोप घेतल्याने आपल्याला ताजेतवाने वाटते ,आपण आपल्या कार्यात चांगल्या प्रकारे लक्ष्य केंद्रित करू शकतो,आपली प्रतिकरशक्ती वाढते,आपले पचन सुधारते.जर जपली झोप नीट झाली नाही तर आपल्याला विश्रांती ना मिळून आपली चिडचिड होऊ शकते,पचनाच्या समस्या होऊ शकतात. थोडक्यात सांगायचे तर तुम्ही झोप नीट घेत नसाल तर तुम्ही निरोगी नाही.

झोप ही अतिशय साधी पण  महत्वाची आहे. आणि ती फ्री महणजेच फुकट असल्याने आपल्याला त्याची कींमत  कळत नाही. वेळेवर झोपणे हा अतिशय सिम्पल आणि सोपा बदल आपण केल्याने आपल्या आयुष्यात नक्कीच बदल होऊ शकतो. झोप नीट लागण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता:

  • जेवण वेळेवर करणे : आपल्यापैकी बरेच लोक रात्री खूप उशिरा जेवतात त्यामुळे जेवण आणि झोप ह्यातले अंतर कमी होते व आपल्याला शांत झोप लागत नाही.त्यामुळे जेवण आणि झोप ह्यामध्ये किमान 2 तासाचे अंतर असावे .
  • झोपायची जागा :  आपल्या झोपायची जागा ही शांत व शक्यतो अंधार केलेली असावी. त्यामुळे झोप लगायला मदत होते. शिवाय झोपेच्या अशी कुठलाही प्रकारे ब्ल्यु लाइट अर्थात मोबाइल , टीव्ही बघू नये. असे संशोधनात लक्षात आले आहे की मोबाइल मधून निघणाऱ्या ब्ल्यु लाइट मुळे मेंदूला उत्तेजित करणारे किरणे असतात त्यामुळे रात्री झोपेच्या आधी मोबाइल पहिल्याने मेंदू उत्तेजित होऊन झोप लागेल अडथळा निर्माण होतो.
  • मेडीटेशन किंवा  पुस्तक वाचने : झोपेच्या आधी बरेच लोक मेडिटेशन ,रेकी करतात त्यांनी नक्कीच मेंदूवरचा ताण kमी होऊन शांत झोप लागायला मदत होते.

2. शारीरिक हालचाल किंवा व्यायाम :

आपले शरीर हे काम करण्यासाठी बनले आहे. जर आपण शारीरिक हालचाल केली नाही तर आपल्या शरीरात निरनिराळ्या व्याधी निर्माण होऊन आपले शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडून जाते. आयुर्वेदानुसार जेव्हा आपण कुठलीही शारीरिक हालचाल जसे की धावणे,पाळणे ,पोहणे, किंवा एखादा आवडीचा खेळ खेळणे,योग,सूर्यनमस्कार असे प्रकार करतो तेव्हा आपल्या शरीरातील रक्त पुरवठा वाढून आपल्या हृदयाचे कार्य सुधारते.

आपल्या शारीरिक क्षमते नुसार व्यायाम केल्याने आपल्याला ताजेतवाने वाटते. ऑक्सिजन चे प्रमाण वाढून आपल्याला दिवसभर पुरेल एवढी ऊर्जा मिळते. मानसिक आरोग्य सुधारते.

आणखी वाचा :  किचन टिप्स इन मराठी

3. पुरेसा आहार :

ते महणतात ना “सरेकाही पोटासाठी “.आपण आपल्या आयुष्यातील बऱ्याच वेळ आणि कष्ट हे पोटाची भूक भागवण्यासाठी घालवतो. आपण जर पुरेसे आणि पौष्टिक अन्न घेतले नाही तर आपल्या शरीराचे नीट पोषण हॉट नाही. आपल्या जेवणात प्रोटीन,फॅटस आणि काऱ्बोहाय डरेतस पुरेशा प्रमाणात गेले पाहिजेत. फळ ,भाज्या धान्य हे पुरेशा प्रमाणात घेतले पाहिजे. आपल्या आहाराच्या सवयीचा आपल्या शारीरिक व मानसिक आयुष्यावर खोल परिणाम होतो. जर आपण आपल्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींनीच ठरवून आपल्या आहारच्या सवयी बदलल्या तर आपण सगळेच हार्ट अटॅक,मधुमेह,कॅन्सर या सारख्या अनेक आजारपासून स्वतःचे व आपल्या परिवाराचे संरक्षण करू शकतो. आहारात साखरेचे आणि प्रक्रिया केलेले पदार्थ वर्ज्य करावे.विटामीन सी मिळतील असे पदार्थ आहारात घ्यावे.

4 . पाणी पिणे  :

आपले शरीर हे 70% पाण्याने बनलेले आहे, हे आपल्याला शाळेतच शिकवले गेले आहे. एक वेळ माणूस ण जेवता राहू शकतो पण पाणी ण पिता माणूस राहू शकत नाही. पाणी हे आपल्या शरीरातील घाण बाहेर टाकण्यास मदत करते. शरीराचे तापमान समतोल राखण्यात मदत करते. रक्तपरवाह सुरळीत करण्यात सुद्धा मदत करते. त्यामुळे सगळ्याच वयोगटातील लोकानी आपल्या शरीरक गरजेनुसार पाणी पिणे आवश्यक आहे.

5. स्ट्रेस (stress ) कमी करणे  :

आजकालच्या जीवनात असा एकही माणूस सापडणार नाही ज्याला काही स्ट्रेस किंवा चिंता नाही ,अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच आजकाल स्ट्रेस आहे.योग ध्यान हे आपल्याला शांतीचा अनुभव घेण्यास मदत करतात. हे आपले मानसिक आरोग्य सुधारते आणि ताणतणाव कमी करण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही दीर्घ काळ ताणतणावात असता तेव्हा तुम्हाला ब्लड प्रेशर,हार्ट अटॅक,ओबेसिटी होण्याचे प्रमाण वाढते. ताणतणाव कमी करण्यासाठी प्राणायाम ध्यानधारणा ह्या बरोबरच आपले छंद जोपासणे, लोकांमध्ये मिसळणे,आपल्या आवडीच्या ठिकणी प्रवासाला जाणे,पुरेसा सूर्यप्रकाशात जाणे असे काही उपाय आपण करू शकतो ज्याने आपल्या मानसिक आरोग्यात सुधार होईल.

6. सकारात्मकता :

सकारात्मक विचारांनी जीवन समृद्ध होते आणि आलेल्या परिस्थितीचा सामना करायची ताकद मिळते. सकारात्मक विचार आपल्याला सर्व परिस्थितीत आपले ध्येय साध्य करायची शक्ति देतात. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल समाधान ठेवल्याने नक्कीच आपले मालोबल उंचावते.

या 6 महिन्यांत या 6 सवयींचा अवलंब नक्की करा.यामुळे नक्कीच तुम्हाला एक आरोग्यपूर्ण आयुष्य अनुभवता येईल.