Moral Strories For Kids| कपिला कोणाची
एका गावात एक साधा भोळा गरीब शेतकरी रहात होता. त्याची कपिला नावाची भरपूर दूध सेनारी गाय होती. एके दिवशी हा गरीब शेतकरी आपल्या गाईला चरण्यासाठी जंगलात घेऊन जात असताना त्याला वाटेत त्याच्या गावातील एक श्रीमंत पुढारी भेटला. बरेच अंतर ते दोघे गप्पा गोष्टी मारत बरोबरच चालत गेले. गावबाहेरील नदीकाठावर गाईला पाणी पाजल्यावर श्रीमंत पुढऱ्याने गाईचा दोर आपल्या हातात घेतला व सरळ बाजाराचे दिशेने निघाला. गरीब शेतकऱ्याने त्याला अडवून विचारले “माझी गरिबाची गाय घेऊन तुम्ही कुठे निघाला?” त्यावर तो पुढारी म्हणाला,”ही तर माझी गाय आहे व मी हिला खाटकाकडे नेऊन विकणार आहे. ” गरीब शेतकऱ्याने त्याला थांबवण्याचे पुष्कळ प्रयत्न केला पण श्रीमंत पुढऱ्याने त्याला धक्का मारून ढकलून दिले व तो गाय घेऊन निघून गेला.(moral stories for kids )
त्याच रस्त्यावरून बिरबल घोड्यावरून जात होता. गरीब शेतकरी कपाळाला हात लावून अश्रु ढाळताना पाहून बिरबळने घोडा थांबवला व त्याची विचारपूस केली. शेतकऱ्याने आपली गाय पुढऱ्याने जबरदस्तीने नेल्याचे सांगितले. बिरबलाने पुढे जाऊन त्या श्रीमंत पुढऱ्याला अडविले व त्याला गाय घेऊन दरबारात बोलवले. गरीब शेतकरी व श्रीमंत पुढारी बिरबलासमोर हजर झाले. पुढारी म्हणाला,’ही गाय माझी आहे म्हणून ती विकायचा मला हक्क आहे.’ शेतकरी म्हणत होता की ही गाय माझी आहे. आता नीवाडा कसा करायचा ?(moral stories for kids )
आणखी वाचा : श्रेष्ठता | Moral Stories For Kids |लहान मुलांच्या गोष्टी
बिरबलाने दोघांनाही दूरवर दोन दिशांना जाऊन उभे राहण्यास सांगितले. प्रथम श्रीमंताला गाईला हाक मारण्यास सांगितले तेव्हा त्याने वारंवार हाक मारूनही गाय जागची हलली नाही. पण शेतकऱ्याने आपल्या आर्त आवाजात हाक मारतच गाय धावतच त्याचे जवळ गेली व त्याच्या अंगाला आपले अंग घासू लागली. त्याबरोबर श्रीमंत पुढऱ्याचा चेहरा उतरला व आता आपल्याला चोरी केल्याबद्दल फटके मारण्याची शिक्षा होणार हे ओळखून त्याने शेतकऱ्याची व बिरबलची माफी मागितली बिरबलाने त्याला फटक्याची शिक्षा माफ करून गाईच्या एक वर्षाच्या चाऱ्याची किंमत शेतकऱ्यास देण्याचा हुकूम दिला.(moral stories for kids )
आणखी वाचा : कोल्हा आणि कोंबडा |Moral Stories For Kids