ट्रॅफिक लाईट लाल पिवळा आणि हिरवाच का असतो?
जगाच्या पाठीवर कुठेही जा, ट्राफिक लाइट चे रंग बदलत नाहीत. त्या ठिकाणी बोलणारी भाषा कितीही वेगळी असो तिथे राहणारे लोक,त्यांची संस्कृती कुठलीही असली तरी वाहतूक दिवे म्हणजेच ट्राफिक लाइट हे लाल पिवळा आणि हिरव्याच रंगाचे असतात. चालत वाहन थांबण्यासाठी सिग्नल लाल रंगाचा तर थांबलेल्या वाहनाला जाण्यासाठी हिरवा रंग हे समीकरण जगात सगळीकडे सारखेच असते. पण आपण कधी हा विचार केला आहे का की असे का बर ? हेच रंग का वापरले गेले असतील ? ह्या लेकी आपण त्याबद्दलच माहिती घेणार आहोत.
माणसाने एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषेचा शोध लावला. विचार करा जर भाषाच नसती तर आपण एकमेकांशी संवाद कसा केला असता ? संवाद साधण्याचे बाकी काही मार्ग सुद्धा आहे जसे की हातवारे करून आपण आपले म्हणणे दुसऱ्यापर्यन्त पोहचवू शकतो. किंवा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारतीय नृत्य प्रकार हे डोळ्यातून संवाद साधण्यासाठी ओळखले जातात.तसेच रंग हे सुद्धा संवाद साधण्याचे एक माध्यम आहे. कोणता रंग कोणता संदेश देतो ,हे थोडाफार संस्कृतीवर अवलंबवून असले तरी विशिष्ट रंग मनात भावना उत्पन्न करतात हे आता संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे.
आणखी वाचा : आपल्याला भूक का लागते ?
वाहतुकीचे रंग हे जसे की लाल,हिरवा आणि पिवळा हे आपल्या नजरेला कोणते रंग अधिक स्पष्ट दिसतात यावरून ठरवले गेले असावेत,असा समज आहे.आज सगळ्या शहरांमध्ये ट्राफिक लाइट साठी हे रंग वापरत असले तरी त्यांची पहिली सुरवात लोहमार्गा वरील वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी झाली होती.एकाच रुळावरून असंख्य गाड्या जात असतात . त्यामुळे पुढचा मार्ग मोकळा आहे,हा संदेश इंजिनचालकाला देण्यासाठी जेव्हा सिग्नल वापरायला सुरवात झाली तेव्हा या रंगांची निवड झाली. तीच पुढे रस्त्याच्या वाहतुकीसाठी सुद्धा वापरण्यात येऊ लागली.
पुढे जाणे धोक्याचे आहे,गाडी थांबवा,असा संदेश देण्यासाठी लाल रंगाची निवड करण्यात आली कारण लाल रंग रक्ताचा असल्यामुळे. अगदी पूर्वीपासून लाल रंग आणि धोका असे एक समीकरण झाले आहे. हा रंग पहिला की मानवी मेंदू मध्ये उत्तेजना निर्माण होते असे पाहण्यात आले आहे. माणसाची उत्तजना वाढली की नाडी वेगात धावू लागते,रक्तदाब वाढतो. त्यामुळे ‘थांबा’ हा संदेश देण्यासाठी लाल रंगाची निवड झाली.तसेच आपण शाळेत शिकलो तसे प्रकाश काही अंतरावर गेल्यानंतर पसरतो आणि आपल्या डोळ्याला पसरलेली इमेज किंवा चित्र दिसते. सगळ्या रंगांमध्ये लाल रंग हा असा आहे जो कमी पसरतो त्यामुळे सुद्धा आपल्याला लांबून लाल रंगाचा सिग्नल अगदी ठळक दिसतो. त्यामुळे लाल रंगाची निवड ही थांबा हा संदेश देण्यासाठी झाली
तुम्हाला माहीत आहे का पहिले लाल,पांढरा आणि हिरवा असे ट्रॅफिक लाइट ठरवण्यात आले होते ,लाल रंगानंतर धोका टळला आहे हे सांगायला पांढरा रंग ठेवण्यात आला,परंतु तीव्र सूर्यप्रकाशात तो रंग न दिसल्याने नंतर तो बदलून पिवळा रंग निवडण्यात आला.पिवळा रंगाची निवड दक्षतेसाठी करण्यात आली. त्यानंतर आता पुढे जाण्यास हरकत नाही असे सांगायला हिरवा रंग ठरला कारण हिरवा रंग शांततेशी संबंधित आहे. तो रंग पहिला की मनात शांत भाव निर्माण होतात,म्हणून त्याची निवड करण्यात आली.तसेच हिरवा रंग हा पिवळा आणि लाल पासून पूर्णपणे वेगळा असल्याने चालकांचा गोंधळ उडू नये ह्यासाठी सुद्धा हिरवा रंग निवडण्यात आला.
जेव्हा आपण रस्त्यावर चालेल जातो तेव्हा सुद्धा चालत जणाऱ्यांसाठी लाल आणि हिरवे सिग्नल असतात. वाहतुकीचे नियम पाळणे हे अत्यंत आवश्यक आहे.