पितृ पक्ष माहिती मराठी | pitrupaksh mahiti in marathi
भारतात अनेक सण साजरे केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार अनंत चतुर्दशी नंतर येणारे 15 दिवस म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून ते आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या हे दिवस पितृ पक्ष मानले जातात.ह्या दिवसांत पितर व पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी श्राद्ध,पिंडदान असे विधी केले जातात. ह्या 15 दिवसांमध्ये पितरांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते म्हणून याला पितृपक्ष किंवा श्रद्धपक्ष असे म्हणले जाते.आपल्या पूर्वजांचे स्मरण ह्या पूर्ण दिवसात केले जाते व त्यांचे आशीर्वाद घेतले जातात अशी पुराणात माहिती आहे. ह्या वर्षी पितृ पक्ष 18 सेप्टेंबर 2024 ला सुरू होऊन 2 ऑक्टोबर 2024 पर्यन्त आहे.
पूर्वजांमद्धे देवतांप्रमाणे शाप व वरदान देण्याची शक्ति आहे असे गरुड पुराणात सांगितले आहे म्हणून ह्या दिवसांत त्यांचे पूजन करून आशीर्वाद घ्यावे असे म्हणतात. असेही मानले जाते की ह्या 15 दिवसांत आपले पूर्वज पृथ्वीलोकवर येतात त्यामुळे हे 15 दिवस हिंदू धर्मात महत्वाचे मानले आहेत. पितृ पक्षात श्राद्ध,पिंडदान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळून त्यांचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते,रामायण महाभारतामद्धे सुद्धा श्राद्ध,पिंडदान तर्पण विधी केल्याचे समजते. असे महणले जाते की श्रीरामांनी राजा दशरथांच्या नावाने श्राद्ध केले होते तसेच महाभारतामद्धे कौरव व कर्ण ह्यांच्या नावाचा तर्पण विधी केल्याचा उल्लेख आहे.
पितृपक्षाचा विधी सर्वप्रथम कोणी केला?
असे म्हणतात की महरुषी अत्री ह्यांनी सर्वप्रथम श्राद्धाचा विधी केला होता. पुराणांमद्धे असे सांगितले आहे की महाभारताच्या शिस्त पर्वात हा विधी प्रथम केला गेला. अत्री ऋषींनी महर्षि निमि ह्यांना श्राद्ध विधिबद्दल माहिती दिली.त्यानुसार महर्षि निमि ह्यांनी तो विधी केला. महर्षि निमिनी केलेला विधी पाहून अन्य ऋषींनी आपापल्या पूर्वजांना अन्न आणि पाणी अर्पण केले. दरवर्षी केल्या जाणाऱ्या ह्या विधीमुळे देवता आणि पूर्वज तृप्त झाले असे सांगण्यात येते.
आणखी वाचा : उत्सवाच्या तयारीसाठी टिप्स | Tips for Festival Preparations
पितृपक्षातले महत्वाचे दिवस :
पितरांविषयी आदर बाळगणे,त्यांना संतुष्ट करणे व त्यांचे आशीर्वाद घेणे हे ह्या दिवसांत महत्वाचे असते. पितृपक्षातील प्रत्येक दिवसाचे महत्व असले तरी भरणी श्राद्ध,नवमी श्राद्ध आणि सर्वपित्री अमावस्या ह्या तिथी सगळ्यात महत्वाच्या आहेत.
भरणी श्राद्ध :
कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर प्रथम वर्ष पूर्ण होण्याच्या आधी पितृपक्षात भरणी श्राद्ध केले जाते. भाद्रपद वद्य चतुर्थी ला भरणी नक्षत्रावर भरणी श्राद्ध केले जाते.पूर्वीच्या काळी पूर्ण पितरपक्षात रोज श्राद्ध केले जाई. परंतु आजकालच्या धावपळीच्या काळात जय तिथीला आपले पूर्वज गेले आहेत त्या तिथीला श्राद्ध केले जाते. दानाला पितृपक्षात अतिशय महत्व आहे. ह्या दिवशी श्रद्धाचा स्वयंपाक बनवून पिंड बनवून दुपारी 12 नंतर कावळ्याला घास ठेवण्याची प्रथा आहे. ह्या वर्षी 21 सेप्टेंबर 2024 ह्या दिवशी भरणी श्राद्ध येते आहे.
नवमी श्राद्ध :
नवमी श्राद्ध हे ज्या स्त्रिया सौभाग्यासह वैकुंठाला गेल्या असतील अश्या स्त्रियांचे श्राद्ध हे पितृपक्षातील नवमी तिथीला म्हणजेच नवमी श्रद्धादीवशी केले जाते. भाग्यवती स्त्री गेल्यानंतर वर्षांनंतर जो पितृपक्ष असतो त्या पितृपक्षात नवमी श्राद्ध किंवा अविधवा नवमी केले जाते. हयादीवशी सुद्धा लवकर उठून श्राद्ध विधी उरकून पिंड दान करावे. ह्या वर्षी 25 सेप्टेंबर 2025 रोजी नवमी श्राद्ध येते आहे.
सर्वपित्री अमावास्या :
भाद्रपद अमावास्येच्या दिवशी मातामह श्राद्ध म्हणजेच आईच्या वडिलांचे श्राद्ध असतेच आणि या दिवशी ज्यांचा मृत्युदिवस किंवा तिथी नक्की माहीत नाही त्या सर्वच पितरांचे श्राद्ध करण्याचीही पद्धत आहे तसेच पितृपक्षातील विशिष्ट तिथींना करण्यात येणारे श्राद्ध कोणत्याही कारणाने किंवा अडचणीमुळे राहिले असेल तर ते या दिवशी करता येते.ह्या दिवशी पिंडदान केल्याने सर्व पितर संतुष्ट होतात असे म्हणतात.
श्राद्ध म्हणजे भक्तिभावाने आपल्या पितरांसाठी केलेला विधी. परंतू ह्या श्रद्धाचे काही नियम असतात ते बघूया
- पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठीचा महिना आहे.
- ह्या काळात दानधर्म करण्याचे खूप महत्व हिंदू संस्कृतीत सांगितले आहे.
- ह्या काळात गाई दानाचे सुद्धा महत्व खूप आहे.
- पितृपक्षात शक्यतो मांसाहार,तसेच कांदा लसूण कहू नये मद्यपान करू नये.
- नवीन कुठलीही गोष्ट जसे की घर,गाडी ,कपडे,दागिने किंवा कुठल्याही महत्वाच्या गोष्टी ह्या काळात घेऊ नये.
- कुठलेही शुभ कार्य करण्यास हा काळ हिंदू धर्मात योग्य मानला जात नाही.
- पितृ पक्षात पिंड दानाचे महत्व खूप आहे.
- ह्या काळात श्रद्धाचा स्वयंपाक करून गाईला किंवा कुत्र्याला देण्याची प्रथा आहे.
- ह्या दिवसांत घरातील वडीलधाऱ्यांचा अपमान करू नये.
Frequently Asked Questions :
- 2024 मध्ये पितृपक्षाची सुरवात कधी होते?
2024 मध्ये पितृ पक्ष १७ सप्टेंबर पासून सुरू हॉट आहे व २ ऑक्टोबर रोजी सर्व सर्वपित्री अमावस्येला संपेल.
- पितृपक्षात देवाला जावे का?
पितृ पक्षात नेहमीप्रमाणे देवांची पूजा करावी तसेच मंदिरात जाण्यास काही मनाई नाही.
- मुलगी श्राद्ध करू शकते का?
जर मृत व्यक्तीचे कोणी उपस्थित नसेल तर सपिंड श्राद्ध करू शकतात. जावई आणि मुलगी यांनाही श्राद्ध करता येते
- पितृपक्षात काय करू नये?
नवीन कुठलीही गोष्ट जसे की घर,गाडी ,कपडे,दागिने किंवा कुठल्याही महत्वाच्या गोष्टी ह्या काळात घेऊ नये.कुठलेही शुभ कार्य करण्यास हा काळ हिंदू धर्मात योग्य मानला जात नाही.
आणखी वाचा : Deep Amavasya mahiti | दीप अमावस्या माहिती मराठी