नीवाडा | Moral stories in Marathi

नीवाडा | Moral stories in Marathi

एकदा राजा कृष्णदेवराय आणि राणीसाहेब दोघांच्यात वाद झाला. राजाचे म्हणणे होते की आंब्यासारख फळ जगात दुसरे कुठलेही नाही. आंबा अत्यंत चविष्ट आणि लज्जतदार असतो म्हणून त्याला ‘फळांचा राजा’ म्हणतात. राणीला ते काही पटेना. त्यांच्या मते द्राक्षासारखे दुसरे कुठले फळ नसते. दोघात एकमत होत नव्हते. शेवटी त्यांनी ठरवले की हा प्रश्न दरबारात विचारायचा. त्याप्रमाणे राजाने दरबारात प्रश्न विचारला की “आंबा श्रेष्ठ की द्राक्ष “?. दरबारातील लोक आता पेचात पडले की राणीची बाजू घ्यावी की राजाची . कारण राणीची बाजू घेतली तर राजा नाराज होणार आणि राजाची बाजू घेतली तर राणी. त्यामुळे कोणी काहीच बोलेना. तेवढ्यात कोणीतरी राजाला सुचवले की हा प्रश्नाचे उत्तर तेनालिरामच देऊ शकतो. दरबारातील सर्वांनी त्याला दुजोरा दिला. संगळ्यांनी आपल्यावरचे संकट तेनालिरामवर ढकलले.

अता हे सर्व ण समजण्याइतका तेनालिराम वेडा नव्हता. तो उठून राजाला म्हणाला “महाराज, मला कल्पनेनी नीवाडा करता येणार नाही. मला आधी दोन्ही फळे नीट खाऊन बघावी लागतील”.राजाने ते ऐकून एका नोकराबरोबर ताबडतोब आंब्याची टोपली मागवली. ते सगळे आंबे तेनालिरामाने शांतपणे बसून खाल्ले. मग म्हणाला “किती स्वादिष्ट आहेत हे आंबे कितीतरी दिवसांनी मी असे आंबे खाल्ले”. त्याचे ते बोलणे ऐकून राजा म्हणाला “म्हणजे तेनालि तुझ्यामते आंबच सर्वश्रेष्ठ फळ आहे ना?” तेनालि म्हणाला “पण महाराज द्राक्ष खाऊन बघितल्याशीवाय कसे कळणार की कुठले फळ श्रेष्ठ आहे.” त्याचे ही बोलणे ऐक्यावर राणी खुश होऊन म्हणली “मी पण तर तेच म्हणते आहे. पण आत्ता द्राक्षाचा हंगाम नाही त्यामुळे द्राक्ष काशी काय मिळणार ?” त्यामुळे द्राक्षाचा हंगाम सुरू होईपर्यंत वाट बघणे भाग होते.

आणखी वाचा : ट्रॅफिक लाईट लाल पिवळा आणि हिरवाच का असतो? 

महाराज ह्यावर काहीच बोलू शकले नाहीत. व जे दरबारातील लोक अता तेनालिची फजिती होईल म्हणून बसले होते त्यांची पण निराशा झाली. पण तेनालिची चैन झाली. त्यानंतर थोडे दिवस गेल्यावर द्राक्षाचा हंगाम जेंव्हा सुरूझाला तेव्हा राणीसाहेबांना परत आठवण झाली. त्यांनी परत तो वाद सुरू केला.राजा सुद्धा अता हट्टाला पेटला होता. त्याने तेनालिला परत बोलवून टोपलिभर द्राक्ष खायला दिली. टेनालिराम खुश झाला. त्याने ती सगळी द्राक्ष फस्त केली. अता राणी म्हणाली “तेनालि अता खरे सांग द्राक्षच श्रेष्ठ आहेत ना ?” चेहरा मिश्किल ठेवत तेनालि म्हणाला “महाराज राणीसाहेब खरतर आंब्याच्या दिवसांत आंबे तर द्राक्षाच्या हंगामात द्राक्ष स्वादिष्ट असतात त्यामुळे तसे पहिले तर दोन्ही फळे आपल्या आपल्या हंगामात श्रेष्ठच आहेत . ”

त्याचे ते बोलणे ऐकून राजा राणीला हसू आले,कुणालाही ण दुखवता त्याने केलेला नीवाडा बघून राजाने त्याला खास इनाम दिला.

आणखी वाचा : चतुर चांभाराची गोष्ट | Moral Stories in Marathi