सणांमद्धे अशी घ्या आरोग्याची काळजी | Health During Festivals
भारतात विविध भागात विविध सण साजरे केले जातात.भारतात प्रत्येक सणांचे विशेष महत्व आहे.श्रावण महिन्यापासून सुरू झालेले सण दिवाळीपर्यन्त चालू असतात. गौरी गणपती,नवरात्र ,दिवाळी,दसरा असे अनेक सण भारतभर साजरे केले जातात. ह्या सर्व सणांमद्धे खाद्यपदार्थांची रेलचेल असते. गणपतीमध्ये मोदक,नवरात्रीत पुराण पोळ्या तसेच उपवासाचे पदार्थ ,दिवाळीत लाडू,चकली,शंकरपाळे ,शेव ,चिवडा,चिरोटे, असे चविष्ट फराळाचे पदार्थ तसेच विविध प्रकारच्या मिठाई असे सगळे पदार्थ आपल्या खाण्यात येतात. सण म्हणले की कुटुंबातील सगळे लोक एकत्र येतात मग सगळे उत्साहाने खाणे पिणे शॉपिंग ई करतात त्यामुळे सणांचे महत्व वाढते. (सणांमद्धे अशी घ्या आरोग्याची काळजी)
परंतु ह्या संगळ्यामद्धे आपण सगळ्यात जास्त आपल्या तब्येतीकडे आपण सगळ्यात जास्त दुर्लक्ष करतो. सण साजरा करण्यासाठी आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाही परंतु असे केल्याने नंतर आपल्याला त्याचे गंभीर परिणाम भोगायला लागू शकतात. कारण भारतीय संस्कृतीत सर्व पदार्थांमध्ये तेल,तूप,साखर ह्याचे प्रमाण जास्त असते. तसेच सणांमद्धे रात्री उशिरा झोपणे ,वेळेवर न खाणे मैदा,साखर असेलेले पदार्थ जास्त खाणे त्यामुळे पचन नीट होत नाही तसेच अॅसिडिटी होणे ,रोगप्रतिकरक शक्ति कमी होते ह्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.ह्या सगळ्यांचा परिणाम रक्तदाब वाढणे, रक्तातील साखर वाढणे ह्यावर होतो.
पुढील काही टिप्स वापरुन आपण सणांमद्धे आपल्या आरोग्याची उत्तम काळजी घेऊ शकतो . (Health During Festivals)
-
संतुलित आहार :
सणाच्या दिवशी वेगवेगळे पदार्थ बनविले जातात,त्यात सुद्धा भारतीय आहारात तेलकट साखरयुक्त पदार्थ जास्त केले जातात,अश्या वेळेला किमान एक वेळच्या जेवणात तरी भाज्या फळे असतील असे बघावे. संतुलित आहार म्हणजे आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक पदार्थ असतात,म्हणजेच त्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर हे योग्य प्रमाणात असते.पदार्थ शिजवताना उकडणे,वाफवणे,बेक करणे,भाजणे ह्या गोष्टीचा वापर करावा. नैवेद्य दाखवताना शक्यतो फळे,सुकामेवा असे पदार्थ ठेवावे. जेवताना शांतपणे जेवावे.
असा आहार घेतल्याने आपल्या शरीराचे योग्य वजन राखण्यास मदत होते तसेच शरीराचे योग्य पोषण होऊन आपल्या शरीरातील ऊर्जा वाढते. पचनसंस्थेचे कार्य नीट राहण्यास मदत होते.
आणखी वाचा : तणाव कमी करण्यासाठी 5 टिप्स | 5 stress management tips
-
पाण्याची पातळी योग्य राखणे :
पाण्याचे आपल्या आहारातील महत्व आपल्या संगळ्यांना माहीत आहे.सणांच्या दिवसांत आपण तेलकट पदार्थ बरेच खातो तसेच पिष्टमय पदार्थनचे सुद्धा प्रमाण बरेच असते. अश्या वेळेस आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य नसेल तर अन्न पचण्यास कठीण होते व आपल्याला अॅसिडिटी होणे ,जळजळ होणे असे त्रास होतात.पाणी पिण्यावर आपल्या शरीरातील बऱ्याच गोष्टी अवलंबवून असतात.तसेच पाणी आपल्या शरीरातील पोषक तत्व व ऑक्सिजन सगळ्या पेशींपर्यंत पोहचवण्याचे काम करते. जर आपल्या शरीरातील पाणी कमी झाले तर ऑक्सिजन चा पुरवठा नीट न झाल्याने आपल्याला थकवा येऊ शकतो. सणासुदीच्या काळात आपल्या जवळ सतत एक पाण्याची बाटली ठेवावी म्हणजे थोड्या थोड्या वेळाने आपल्याला पाणी पिता येऊ शकेल.(सणांमद्धे अशी घ्या आरोग्याची काळजी)
-
नियमित व्यायाम करणे :
सण आले की सगळे कुटुंबीय एकत्र येऊन धमाल मस्ती करतात त्या नादात रात्री उशिरा झोपणे व सकाळी उशिरा उठणे होते पण तसे न करता प्रत्येकाने व्यायामासाठी वेळ काढणे अतिशय महत्वाचे आहे. नियमित व्यायाम केल्याने आपली प्रतिकार शक्ति वाढते. आपल्याला उत्साही वाटते.नैराश्याचे प्रमाण कमी होते. तसेच अन्नाचे नीट पचन होते. रक्तदाब,मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.सणाच्या दिवशी चालणे,योगासने ह्यासारखे व्यायाम आपण करू शकतो.
-
मानसिक आरोग्य :
सणांमद्धे मानसिक आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. सणांच्या धावपळीत आपल्यावर अतिरिक्त ताण येतो. घरातले सण,बाहेरची कामे,ऑफिसची कामे ह्यासगळ्यात आपल्या मनावर ताण येतो. नियमित ध्यान धारणा करण्याने मन शांत होण्यास मदत होते तसेच रात्री शांत झोप लागण्यास मदत होते.शांत व नियमित झोप मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहे,त्यासाठी रात्रीची जागरणे टाळावी.
-
ताजे व नैसर्गिक पदार्थ :
सणांमद्धे आपले बाहेरचे पदार्थ खायचे प्रमाण खूप वाढते मग ते मिठाई असो किंवा हॉटेल मधील तेलकट पदार्थ. सणाच्या काळात बाहेरचे खाण्यापेक्षा घरात करून ते पदार्थ खावेत. बाहेरच्या पदार्थांमध्ये अतिरिक्त तेल असते जे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी घटक असते.प्रोसेस्ड केलेले प्रीझरवेटीव असलेले पदार्थ खाऊ नये. ताज्या भाज्या,फळे,फळांचे रस,वेगवेगळी सॅलड हे आहारात असू द्यावे .
-
अल्कोहोल :
जर तुम्ही अल्कोहोल पित असाल तर त्याचे प्रमाण कमी ठेवावे. अल्कोहोलच्या अति सेवनाने आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो.
सणामध्ये आपला आहार कसा असावा ह्याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो.संतुलित आहार ,नियमित व्यायाम,ताजे अन्न ,संयमित खाण्याची पद्धत अवलांबवल्याने आपले सण हे अधिक आरोग्यापूर्ण होऊ शकतात,तसेच आपले आरोग्य चांगले राहिल्याने आपण सगळे सण आपल्या कुटुंबासोबत एकत्रितपणे मजेत घालवू शकतो.(सणांमद्धे अशी घ्या आरोग्याची काळजी)
आणखी वाचा : kitchen tips and tricks | किचन टिप्स इन मराठी |kitchen tips and tricks Marathi