Moral Stories in Marathi |अमर बनवणारे फळ
विजयनगर एक समृद्ध राज्य होते. तेथील व्यापारी पोर्तुगाल,चीन,श्रीलंका आणि मध्य आशियातील इतर देशांशी व्यापार करत होते. त्यांचा व्यापार दूरवर पोहोचला होता. राज्यात पैशांची कमतरता नव्हती. महाराज आणि इतर देशातील राजांमद्धे मौल्यवान भेटवस्तूंची देवाण-घेवाण व्हायची.(Moral Stories In Marathi)
एकदा चीनच्या सम्राटकडून फळांच्या अनेक पेट्या महाराज कृष्णदेवराय यांना भेट म्हणून पाठवण्यात आल्या. ही फळे विजयनगरमद्धे पिकत नव्हती.चीनच्या सम्राटाने आपल्या संदेशात सांगितले होते की ही फळे दुर्मिळ गुणांनी युक्त आहेत. ही अमरत्व देणारी फळे आहेत.
महाराजांसामोर एका पेटीतून फळे काढण्यात आली. ती फळे बघून सर्वांच्या तोंडाला पाणी सुटले. ती फळे बघताच कळत होते की ती कीती स्वादिष्ट असतील. सर्वांना त्या फळांचा स्वाद घ्यायचा होता,परंतु हे शक्य नव्हते. ती फळे महाराजांसाठी भेट म्हणून आली होती.जोपर्यंत महाराज त्यातली काही फळे खात नाहीत,तोपर्यन्त कोणीही त्यांना हात लावू शकत नव्हते.तेनालिरामची नजर सुद्धा त्या फळांवर पडली. त्याला फळे खाण्याची एवढी इच्छा झाली की, तो विसरला की फळे आधी महाराज खातील.तेनालिरामने पुढे येऊन एक फळ उचलून खाल्ले. फळे अत्यंत चविष्ट होती. दरबारी चकित होऊन तेनालीकडे बघत होते. महाराजांना हे बघून खूप राग आला होता. आता सर्वांची खात्री पटली की तेनालिराम मोठ्या संकटात सापडणार आहे.(Moral Stories In Marathi)
आणखी वाचा : घुबडाची युक्ती | Moral Stories in Marathi
“तेनालिराम !” महाराज कृष्णदेवराय यांचा मोठा आवाज ऐकून तेनालिरामला समजले की त्याने काय केले आहे. त्याच्या या चुकीला माफी मिळणार नव्हती.ती फळे महाराजांसाठी भेट म्हणून आली होती. तेनालिरामने महाराजांच्या आधी ती फळे खाल्ली. एवढेच नाही तर ती फळे खाण्याआधी त्याने महाराजांची परवानगी सुद्धा घेतली नव्हती. तेनालिराम खरच मोठ्या संकटात अडकला होता.
तेनालिराम शरमेने आपली मान खाली घालून गुपचुप उभा राहिला. महाराज अत्यंत क्रोधित होऊन म्हणले,”तेनालिराम ! माझ्या भेटवस्तूला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली?”असे वागल्यामुळे मी तुला कधीही क्षमा करू शकत नाही. सैनिकांनो ! याला इथून घेऊन जा आणि मृत्युदंडाची शिक्षा द्या.”सैनिकांनी लगेचच तेनालिरामला बंदी बनवले. तेनालिला आपला जीव वाचवण्यासाठी लगेच काहीतरी करणे आवश्यक होते. तो जोरजोरात रडू लागला आणि म्हणाला “चीनचे सम्राट खोटे बोलले. त्यांनी संदेशात लिहिले होते की ही फळे खाऊन दीर्घायुष्य लाभते. मी याचा एक तुकडा काय खाल्ला आणि मला मृत्युदंडाची शिक्षा मिळाली. महाराज ! मी आपल्याला विनंती करतो की आपण ही फळे अजिबात खाऊ नका.” हे ऐकून महाराजांना हसू आले. त्यांनी सैनिकांना तेनालिरामला सोडण्याचा आदेश दिला.
तेनालिराम आदराने म्हणाला “महाराज ! त्या फळांचा सुगंध छान आहे की मी स्वतःला रोखू शकलो नाही. मला दरबारातील सर्व नियम आणि कायदे माहिती आहेत. मी महाराजांचा अपमान करण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. परंतु आज ही फळे बघून माझा संयम सुटला आणि मी अशी चूक करून बसलो. या फळांवर आपला अधिकार आहे यात शंकाच नाही. आम्ही सर्व सामान्य माणसे आहोत. अशा दुर्मिळ फळांचा आस्वाद घेणे आमच्या भाग्यत नसते.”
आणखी वाचा : मूर्तीकाराची गोष्ट मराठी | Moral Stories in Marathi
तेनालिरामनचे बोलणे ऐकून महाराजांना आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी आपली चूक सुधारायचे ठरवले. व म्हणले “तेनालि आमच्यासारखा टू सुद्धा खासच आहेस. आपण सर्व मिळून या फळांचा आस्वाद घेऊयात.” यानंतर महाराजांनी सर्व मंत्री आणि दरबारातील लोकांसोबत फळांचा आस्वाद घेतला.
आणखी वाचा : ट्रॅफिक लाईट लाल पिवळा आणि हिरवाच का असतो?