दिवाळीसाठी काही उपयुक्त टिप्स | Diwali 2024
दिवाळीला आता फक्त काही दिवसच उरले आहेत. सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.सगळीकडे दिवाळीची तयारी सुरू झाली आहे,लहान मुलांपासून ते मोठ्यानपर्यंत सगळे ह्या सणाची वाट बघत असतात.घरोघरी साफसफाई,दिव्यांची रोषणाई,सजावट हे करण्यात सगळे मोठ्या उत्साहाने भाग घेतात. लहान मुले किल्ले करण्यात दंग होतात. महिला घरातील स्वच्छता आणि फराळाच्या गडबडीत असतात. ह्यावर्षी दिवाळी 28 ऑक्टोबर ला सुरू होते आहे. (दिवळीसाठी काही उपयुक्त टिप्स )
फराळचे पदार्थ करताना स्त्रियांचा खूप वेळ जातो त्यामुळे त्याचे नियोजन करणे फार गरजेचे आहे.घरातील कामे आणि फराळ ह्याचे गणित मांडताना स्त्रियांची गडबड होते. ते टाळण्यासाठी खालील काही टिप्स तुम्हाला नक्की फायदेशीर ठरतील.
दिवळीसाठी काही उपयुक्त टिप्स
साफसफाईसाठी टिप्स :
- दिवाळी म्हणले की फराळाची यादी करून आपण त्यातील कुठले पदार्थ करणार आहोत त्याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे वांणसामानाची यादी करावी. जसे की भाजणीसाठी लागणारे धान्य,तेल,तूप,मैदा,साखर व दिवाळीत बाकी पक्वान्न करायची असल्यास लागणारे समान हे आधीच आणून ठेवावे.
- चकलीची भाजणी,लाडू करायला लागणारे डाळीचे पीठ हे सगळे दळून आणावे.
- खोबऱ्याचे काप , वेलडोद्याची पूड, ड्रायफ्रूट चे तुकडे ही सर्व तयारी आधी करून ठेवल्यास बराच वेळ वाचतो.
- दिवाळीचा फराळ ठेवण्यासाठीचे डबे आधीच धुवून स्वच्छ करून ठेवावे म्हणजे आयत्या वेळेस डबे शोधत बसावे लागणार नाही.
- दिवाळीच्या आधी रोज थोडा वेळ काढून घरातील नको असलेले सामान अवरल्यास कामे वेळेत पूर्ण होतात.
- सगळ्यात शेवटी किचन ची स्वच्छता करावी म्हणजे फराळ करताना तळणीचे काम झाल्यावर झालेले चिकट डाग स्वच्छ होतील.
- घरातील पडदे ,बेडशीट,सोफा कवर्स ,अभ्रे 10 दिवस आधी धुवून ठेवावे म्हणजे सणाला त्या वापरता येतात.
- पणत्या जर नवीन असतील तर ठीक पण मागील वर्षीच्या पणत्या काढून त्या परत पाणी घालून ठेवाव्या व नंतत्र कोरड्या कराव्या असे केल्याने तेलकट पणा जातो.
- घरातील खिडक्यांच्या काचा,फॅन,आरसे स्वच्छ पुसून ठेवावे.
- रंगोली काढण्यासाठी आणलेले रंग एका डब्यात ठेवावे.
- घराचे तोरण काढून स्वच्छ धुवून ठेवावे.
- सगळ्यांचे सणाला घालायचे कपडे आधीच इस्त्री करून ठेवावे.
आणखी वाचा : 33 Amazing human body facts in marathi
फराळासाठी टिप्स :
दिवाळीत सगळ्यांची आवडती गोष्ट आहे ती म्हणजे दिवाळी फराळ ! त्यासाठीच्या काही टिप्स :
- चकली : चकली करताना जर काळजी घेतली नाही तर आपली चकली मऊ पादू शकते तसे होऊ नये ह्यासाठी भाजणी करताना सर्व साहित्य चांगले नीट भाजून घ्यावे. तसेच चकलीची उकड काढताना त्यात तेलाचे मोहन घालावे. चकली तळताना जर आपण गॅस कमी ठेवला तर चकली मऊ पडण्याची शक्यता असते. म्हणून चकली करताना प्रथम गॅस मोठा ठेवून तेल चांगले तापवून घ्यावे. त्यानंतर चकली तेलात सोडल्यावर मंद आचेवर चकली तळून घ्यावी.चकलीचे पीठ मळताना कोमट पाण्याने मळावे.तसेच चकलीचे पीठ मळताना ते फार सैल ठेवू नये असे झाल्यास थोडे कोरडे पीठ घालून घ्यावे.चकल्या पाडताना जर त्या पडत असल्या तर समजावे की आपले पीठ घट्ट झाले आहे असे झाल्यास थोडा गरम पाण्याचा हात लावून पीठ परत मळून घ्यावे.ह्या टिप्स वापरुन बघा तुमची चकली नक्की चांगली होईल.
- बेसन लाडू :बेसन लाडू करताना डाळ जरा जाडसर दळून आणावी म्हणजे लाडू चयन दाणेदार होतात. तसेच डाळ दळायला देण्याआधी ती छान भाजून घ्यावी.बेसन लाडू करताना घ्यावयाची काळजी म्हणजे लाडू नीट भाजणे गरजेचे आहे. बेसन पीठ भाजताना मंद आचेवर भाजावे. तसेच तुपाचे व साखरेचे प्रमाण मोजून घ्यावे. जर आपण बेसन पीठ मोठ्या गॅस वर भाजले तर पीठाचा नुसता रंग बदलतो परंतु ते आतून कच्चे राहते. पिठाचा चयन खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यावे.साखर घालताना शक्यतो पिठी साखर घालावी म्हणजे ती पटकन विरघळली जाते.(दिवळीसाठी काही उपयुक्त टिप्स )
- रवा लाडू : रव्याचे लाडू करताना शक्यतो बारीक रवा वापरावा. रवा तुपावर मंद आचेवर खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यावा. रवा भाजताना गॅस मोठा करू नका नाहीतर रवा करपतो आणि लाडू चांगले लागत नाहीत. रव्याच्या लाडवासाठी एकतारी पाक करावा.
- अनारसे : अनारसे करताना कधीही नवीन तांदूळ वापरू नये,तसेच इंद्रायणी तांदूळ सुद्धा वापरू नये. तांदूळ भिजवताना 3 दिवस भिजवलेले पाणी बदलून नवीन पाणी घालावे असे केल्याने आपल्या पिठाला घाण वास येत नाही.पीठ करताना तांदूळ फार कोरडे केलेले नसावे. तेल तपवताना मध्यम असावे म्हणजे अनारसे त्यात विरघळत नाहीत.
- करंजी : लक्ष्मीपूजन नैवेद्याला आपण आवर्जून करंजी कहा नैवेद्य दाखवतो. करंजी करताना जर सारण नीट भरले गेले नाही तर तेलात तळताना करंजी फुटू शकते. असे होऊ नये म्हणून करंजी करताना रव्यात थोडे तांदळाचे पीठ घालावे त्यामुळे करंजी जास्त दिवस खुटखुटीत राहते,तसेच त्यामध्ये तुपाचे मोहन घालावे. करंजी तळताना प्रथम तेल चांगले गरम करून मग करंजी त्यात सोडावी व हलका रंग येईपर्यंत टाळून घ्यावी.
आणखी वाचा : उत्सवाच्या तयारीसाठी टिप्स | Tips for Festival Preparations
- शंकरपाळे : शंकरपाळी मस्त पदर सुटलेली खुसखुशीत असावी. शंकरपाळी करताना तूप आणि मैद्याचे प्रमाण अचूक असावे लागते. प्रथम तूप आणि साखर चांगले फेसून घेतले तर शंकरपाळी तेलात टाकल्यावर त्याचे पदर सुटू लागतात. शंकरपाळी तळताना तेल योग्य गरम नसेल तर शंकरपाळी तेलात विरघळू शकते.
- पोहे चिवडा : चिवडा करताना पोहे आधी थोडे थोडे करून भाजून घ्यावे,असे केल्याने चिवडा छान कुरकुरीत होतो.
वरील सर्व टिप्स नक्की वापरुन बघा.दिवाळीचा सण हा आनंद ,उत्साह देणार सण आहे. अंधारकडून प्रकाशकडे नेणारा हा सण तुम्हा संगळ्यांना भरभराटीचा जाओ !
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !