श्रेष्ठता | Moral Stories For Kids |लहान मुलांच्या गोष्टी
श्रेष्ठता
अकबर बादशहाच्या दरबारात येण्यापूर्वी बिरबलचे बरेच कौतुक बादशहाने ऐकले होते. त्यामुळे असा विद्वान पंडित आपल्या दरबारात कायम असावा असे बादशहाला कायम वाटे पण बिरबलची नेमणूक करण्यापूर्वी त्याची परीक्षा पहावी म्हणून बादशहाने दरबार भरवीला. जेणे करून बिरबलची विद्वत्ता सर्वांसमोर सिद्ध व्हावी. बादशहाने प्रथम दरबारातील सर्व सरदारांना तीन प्रश्न विचारले,की कुणाचा मुलगा सर्वश्रेष्ठ असतो ? कुणाचा दात सर्वश्रेष्ठ असतो ? आणि कोणता गुण सर्वश्रेष्ठ असतो ? यावर सर्व दरबारातील मंडळींनी विचार केला.(Moral Stories For Kids)
आणखी वाचा : चतुर चांभाराची गोष्ट | Moral Stories in Marathi
बादशाह आपल्या उत्तराने खुश व्हावा म्हणून कोणी बादशहाचा मुलगा सर्वश्रेष्ठ आहे,कोणी राजहत्तीचा दात सर्व दातात सर्वश्रेष्ठ आहे अशी उत्तरे दिली. ही उत्तरे ऐकून बादशहाच्या लक्षात आले की हे सर्व आपल्याला खुश करण्यासाठी असे सांगत आहेत. खरे तर उत्तरे कोणालाच माहीत नाही. मग बादशहाने ते तीन प्रश्न बिरबलाला विचारले. त्यावर बिरबल म्हणला “गाईचा मुलगा बैल हा सर्वश्रेष्ठ मुलगा आहे. कारण बैलामुळे शेत नांगरले जाते. त्यामुळे सर्वांनाच अन्नधान्य मिळते. दुसरे उत्तर म्हणजे , नांगराचा दात सर्वश्रेष्ठ दात आहे कारण त्या दातांनी शेत नांगरल्यावरच शेट पिकत आणि तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हिम्मत हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. कारण हिम्मत नसेल तर माणूस काहीच करू शकणार नाही. ” (Moral Stories For Kids)
त्याच्या ह्या तिन्ही उत्तरांवर खुश होऊन बादशहाने बिरबलची आपल्या मंत्रीपदी नेमणूक केली.
तात्पर्य : विद्वत्ता आणि हजरजबाबी गुणामूळे श्रेष्ठता प्राप्त होते.
आणखी वाचा : Moral Stories in Marathi |अमर बनवणारे फळ