Benefits of eating Rice| भात खाण्याचे फायदे

Benefits of eating Rice| भात खाण्याचे फायदे

भात(राइस ) हा भारतातील सगळ्यात लोकप्रिय प्रकार आहे.(भात खाण्याचे फायदे) भारतातल्या अनेक भागात तांदूळ हा त्यांच्या आहारातील महत्वाचा घटक आहे. मुख्यतः समुद्रकिनारी भागात भात आणि त्यापासून बणणारे पदार्थ ह्यांचा खूप प्रमाणात आहारात समाविष्ट केला जातो. आजकाल लोक वजन वाढते म्हणून भात खाण्याचे प्रमाण कमी करतात. पण तसे करणे काही वेळ शरीरासाठी घटक ठरू शकते.भाताचे बरेच प्रकार भारतात आहेत जसे की आंबेमोहोर,कोलंम ,इंद्रायणी,बासमती,सोना मसूरी,ताम साळ ई. भारतातल्या विविध भागात वेगवेगळ्या प्रकारच्या भाताच्या जाती प्रसिद्ध आहेत.1970 पर्यंत, भारतात तांदळाच्या सुमारे 110,000 जाती होत्या.भाताचे विविध प्रकार जसे की खिचडी,वरण भात ,मऊ भात,मसाले भात,दही भात ,नारळी भात,बिर्याणी  हे प्रकार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.दक्षिण भारतात सांबर भात,लेमन राइस,बीसी भेल अन्न ,रसम भात ई प्रसिद्ध आहे. उत्तर भारतात कढी चावल,राजमा राइस,जिरा राइस,बिर्याणीचे प्रकार हे प्रसिद्ध आहे.

भात खण्याचे काही फायदे आपण ह्या लेखात बघूया : 

 

  • तांदूळ किंवा भात हा कार्बोहायडरेट चा उत्तम सोर्स आहे.कार्बोहायडरेट हे आपल्या शारीरिक क्रियांसाठी अतिशय गरजेचे असते.
  • त्यामुळे आपल्याला दैनदीन कामे करण्यासाठी लागणारी एनर्जि मिळते.
  • ब्राऊन राइस किंवा व्हाइट राइस हा gluten फ्री असतो.
  • तसेच राइस (भात ) पचायला हलका असतो. त्यामुळे आपले पोट जर बिघडले असले तर आपल्याला भात खायचा सल्ला दिला जातो.
  • रोजच्या आहारात जर आपण प्रमाणात भात खाल्ला तर आपली रक्तातील पातळी नियंत्रित ठेवता येते.
  • भात पचायला हलका असल्याने रात्री  भात खाल्यास पचन नीट होऊन आपल्याला झोप लागेल मदत होते.
  • व्हाइट राइस (भातामद्धे) 4 ग्राम प्रोटीन तर ब्राऊन राइस मध्ये 5 ग्राम प्रोटीन असते.
  • नवीन आलेल्या रिसर्च नुसार भातात असलेल्या विटामीन b मुळे ते आपली मज्जासंस्थेचे कार्य सुधारण्यात सुद्धा मदत करतात.
  • भातात फायबर चे प्रमाण जास्त असल्याने ते पचन सुधारण्यात तसेच ब्लड प्रेशर कमी करण्यात सुद्धा मदत करतात ज्याने आपले शरीर निरोगी राहण्यात मदत होंते.
  • पचन सुधारल्याने आपल्या शरीरातील विषारी द्रव्य (toxins) बाहेर पडतात,त्यामुळे कॉलॉन कॅन्सर चा धोका पण कमी होतो.
  • अनेक जण वजन कमी करताना पहिलं भात सोडतात,तसे करणे योग्य नाही. भातात सोडियम,फॅटस व कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी असल्याने ते उलट  वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत करते.
  • जय लोकाना हाय ब्लड प्रेशर ची समस्या आहे त्यांनी सुद्धा भात खने इष्ट ठरते. कारण भातात असलेले सोडियम ची कमी प्रमाण. सोडियम कमी असल्याने रक्तवाहिनी आणि धमणी (arteries and veins) ह्यावर येणारे प्रेशर कमी होऊन हृदयाचे कार्य सुधारते.
  • राइस किंवा भात हा तुमच्या स्कीन आणि केसांच्या साथी सुद्धा अतिशय फायदेशीर आहे.
  • राइस वॉटर आजकाल बऱ्याच बाजारात मिळणाऱ्या सीरम मध्ये मुख्य घटक म्हणून वापरतात.
  • केसांसाठी सुद्धा भात शिजवलेले पाणी टोनर म्हणून वापरतात.
  • भातात असलेले अॅंटी ऑक्सीडेन्ट त्वचेवरील सूज कमी करण्यात मदत करतात.

आणखी वाचा : तणाव कमी करण्यासाठी 5 टिप्स | 5 stress management tips

असा हा बहुगुणकारी राइस सगळ्यांनी आवर्जून आपल्या आहारात समाविष्ट करावा.