Deep Amavasya mahiti | दीप अमावस्या माहिती मराठी
“तमासो मा ज्योतिर्गमय” असा संदेश देणारी आषाढी अमावस्या म्हणजेच ‘दीप अमावस्या’ (Deep Amavasya) म्हणजेच मंगलमय दिवस. दीप अमावास्येलाच आषाढी अमावस्या कीव जीला दीप अमावस्या असेही म्हणतात. विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये दीप अमावस्या उत्साहानी साजरी करतात.
दीप आमवास्येचे महत्व : दीप अमावस्या माहिती मराठी
दीप आमवास्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात व त्यांची पूजा केली जाते.आघाडा,दूर्वा,बेल तुळस,फुले घालून पूजा केली जाते.उकडलेल्या बाजरीच्या किंवा कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी ह्या दिवशी दुर्गा देवी आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते.
दीप अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होत असल्याने श्रावण महिन्याचे स्वागत दीप लावून केले जाते. दिवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे,अज्ञानाच्या अंधकाराचा नाश होऊन ज्ञानाच्या सूर्याकडे घेऊन जाणार आधार म्हणजे दीप. भरपूर पाऊस व अंधारून येणे हे श्रावण महिन्याचे वैशिष्ट आहे. त्यामुळे घरातील सर्व दिवे स्वच्छ करून अंधारून आल्यास त्याचा वापर करावा अशी मान्यता होती.
आजही जगात हजारो इलेक्ट्रिक दिवे असताना ही आपण तेलाचा कीव तुपाचा दिव्य लावतो कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो. आणि नजरेलाही पवित्र वाटते.
आणखी वाचा : उत्सवाच्या तयारीसाठी टिप्स | Tips for Festival Preparations
दिवा तेलाचा का तुपाचा ?
अग्नि पुरणानुसार गाईच्या तुपाचा दिव्य लावल्याने आजूबाजूच्या वातावरणातील जंतु नाहीसे होतात. वातावरणात शीतलता आणि पवित्रता निर्माण होते.तिळाच्या तेलाची ज्योत संथपणे तेवते व त्यातून बाहेर पडणाऱ्या लहरीनि आजूबाजूचे वातावरण व हवा शुद्ध होते.
दिव्याची पूजा कशी करावी?
घरतील सर्व दिवे स्वच्छ धुवावे,गरम पाण्यामध्ये घालून पुसावे. देवासमोर एक पाट मांडून त्या भोवती छान रंगोळी काढावी. पाटावर सर्व दिवे मांडून हळद,कुंकू,फुले घालून त्यांची पूजा करावी. सर्व दिवे पेटवून त्यांना नमस्कार करावा. आणि नैवेद्य दाखवावा.
दीप अमावस्या कहाणी :Deep Amavasya mahiti
तमिळ प्रांतात पशुपति शेट्टी नावाच्या माणसाला विनीत आणि गौरी नावाची मुले होती. त्या मुलांनी लहानपणीच आपल्या होणाऱ्या मुलांचे विवाह परस्परांच्या मुलांशी लावायचे ठरवले. पुढे गौरीला तीन मुली झाल्या त्यापैकी धाकट्या मुलीचे नाव ‘सगुणा ‘ होते. गौरी बऱ्यापैकी श्रीमंती अनुभवत होती,परंतु काही कारणाने तिला अचानक दारिद्र आले. त्यामुळे तिने लहानपणी भावाला दिलेले वचन मोडून आपल्या मोठ्या दोन्ही मुलीची लग्न श्रीमंत घराण्यात करून दिली. परंतु सगुण ला हे आवडले नाही. तिने आपल्या मामाच्या धाकट्या मुलाशी लग्न केले आणि ती आनंदाने संसार करू लागले. गौरी आणि तिच्या नवऱ्याने तिच्याशी ह्या कारणाने संबंध तोडून टाकले.
पुढे एकदा एक राजा त्याठिकाणी नदीवर स्नानाला गेला. स्नानाच्या वेळी त्याने आपली बहुमूल्य अंगठी काठावर काढून ठेवली. घारीने ती अंगठी खायची समजून उचलून नेली परंतु ते खाणे नाही हे लक्षात येताच तिने ती अंगठी टाकून दिली. ती अंगठी सगुणच्या छतावर पडली तिला ती अंगठी सापडताच तिने चौकशी केल्यावर तिला ती राजाची आहे हे कळले. तिने ती अंगठी राजाला प्रामाणिकपणे परत केली. राजा तिच्यावर खुश झाला व तिला बक्षीश दिले आणि अजून काही हवे असल्यास मग म्हणला. तेव्हा सगुणाने मागितले की येत्या शुक्रवारी फक्त माझ्या घरी दिवे असतील बाकी कुठल्याही घरात अंधार असेल.राजाने ते मान्य केले.
राजाने दवंडी दिली त्याप्रमाणे त्या शुक्रवारी बाकी सर्वांच्या घरात अंधार होता फक्त सगुणचे घर दिव्यानि उजळत होते,तो दिवस आषाढी आमवास्येचा होता.
एकडे सगुणाने आपल्या एका दिराला दारापाशी उभे केले व त्याला सांगितले की तिन्हीसांजेला जी कोणी सवाषण बाई घरी येईल,तिच्याकडून मी परत कधीही जाणार नाही असे वचन घ्या आणि मग आत येऊ द्या असे सांगितले. त्याप्रमाणे संध्याकाळी सर्वत्र अंधार असल्याने लक्ष्मी माता सगुणकडे आली,तिच्या दिराने तिच्याकडून वचन घेऊनच तिला अंत सोडले. त्यादिवसापासून सगुणचे घर अखंड समृद्धीने भरून गेले.
त्यामुळे दीप अमावास्येला दीप लावून जय घरात पूजा केली जाते तिथे लक्ष्मीचा चिरकाल वाय राहतो अशी मान्यता आहे.