Ganesh chaturthi 2024 | गणेश चतुर्थी माहिती मराठी

Table of Contents

Ganesh Chaturthi 2024 | गणेश चतुर्थी माहिती मराठी 

गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मियांचा भारतातील एक मोठा सण आहे. हा सण भारतात अतिशय उत्साहात साजरा केला जातो. दर वर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते.(गणेश चतुर्थी माहिती ) गणेश चतुर्थी हा भगवान गणेशचा जन्मदिवस म्हणून संपूर्ण देशभरात दरवर्षी साजरा केला जाणार उत्सव आहे. गणेश चतुर्थीचा सण चतुर्मासात येतो,हयादीवशी गणेश मूर्तीची स्थापना केली जाते व अनंत चतुर्थीला गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. गणपतीचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे पुराणात सांगितले आहे . गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी असेही म्हणले जाते.असे मानले जाते की, गणपतीला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. ह्यावर्षी गणेश चतुर्थी 7 सप्टेंबेर 2024 शनिवार ह्या दिवशी येतो आहे.(Ganesh chaturthi 2024) व 17 सेप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी म्हणजेच गणपती विसर्जन आहे.श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून गणपतीचे  पूजेन केल्यावर आरती केली जाते. त्यानंतर शाडूच्या माती पासूनच बनवलेल्या गणेश मूर्तिचे पूजन केले जाते.(गणेश चतुर्थी माहिती मराठी )

सार्वजनिक गणेशोत्सवाची  सुरवात कोणी केली ? 

गणपती ही संघटनेची देवता आहे. भारतीयांना एकत्र आणण्यासाठी व संघटित करण्यासाठी तसेच स्वातंत्र्य लढयाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी बाळ गंगाधर टिळकांनी 1894 साली  सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली. ह्याकाळात गणपतीच्या मूर्तीसमोर अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रम केले जातात.सगळ्यात पहिल्यांदा लोकमान्य टिळकांनी 1894 रोजी पुण्यातील विंचुरकर वाड्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली.

गणेशचतुर्थी कथा : (Ganesh chaturthi 2024)

शिवपूराणमध्ये सांगितल्यानुसार भगवान गणेश हे शिव व पार्वती ह्यांचे पुत्र आहेत. एकदा कैलाश पर्वतावर शंकर नसताना पार्वती देवीला आंघोळीला जायचे होते परंतु कोणी पहारेकरी नसल्याने पार्वती देवीने उबटनापासून एका सुंदर मुलाची मूर्ती बनवली. व मूर्तीचे  नाव गणपती ठेवले .मंत्र शक्तीने देवीने त्या मूर्तीला  जीवंत केले.आणि पहारेकरी बनवले आणि सांगितले की “मी कक्षात आंघोळीला जाणार आहे त्यामुळे कोणालाही आत येऊ देऊ नको” असे सांगून पर्वतीदेवी  आंघोळीला गेली. काही वेळाने शंकर कैलास पर्वतावर आले आणि देवीच्या कक्षाकडे जाऊ लागले. तेव्हा त्यांना गणपती ने आडवले व म्हणला “माझी आई आत अंघोळीसाठी गेली आहे तुम्ही आत जाऊ शकत नाही ” हे ऐकल्यावर भगवान शंकर खूप चिडले आणि त्यांनी त्रिशूळाने वार करत गणपतीचे शीर धडापासून वेगळे केले. जेव्हा माता पार्वती तिथे आली. तिला गणपतीचे मस्तक कापलेले  पाहून खूप दुःख झाले. तिने खूप आक्रोश केला,जेव्हा तिच्या लक्षात आले की गणपतीचे शिर हे भगवान शंकरांनीच कापले आहे तेव्हा पार्वती देवी खूप क्रोधित झाली. तिने भगवान शंकरांना जाब विचारला की तो माझा मुलगा होता त्याला तुम्ही का दंड दिला,तो माझ्या आज्ञेचे पालन करत होत असे पार्वती म्हणाली. तिने शंकरांना गणपतीचे शिर परत आणायला सांगितले. भगवान शंकरांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण देवी पार्वती काही ऐकायला तयार नव्हती. त्यानंतर भगवान शंकरांनी आपल्या गणला आदेश दिला व सांगितले की पृथ्वीवर जो  पहिला प्राणी दिसेल त्याचे शीर कापून घेऊन ये,गण बाहेर पडल्यावर त्याला पहिला हत्ती दिसला. त्याने हत्तीचे शीर कापून आणले. भगवान शंकरांनी ते शीर धडाला लावले. व मूर्ती जीवंत केली. हे पाहिल्यावर देवी पार्वती प्रसन्न झाली. भगवान शंकरांनी गणपतीला वर दिला की तो  शक्ति आणि बुद्धीचा दाता म्हणून गणपतीची  पूजा केली जाईल. ह्यामुळेच गणपतीला  “गजमुख ” असे सुद्धा म्हणले जाते.

आणखी वाचा : 12 ज्योतिर्लिंग माहिती

गणेश चतुर्थी पूजा :

श्री गणेश चतुर्थी हे मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.घरोघरी विशेष आरास करून गणपतीच्या आगमनाची तयारी केली जाते.”गणपती बाप्पा मोरया ,मंगलमूर्ती मोरया ” अश्या जयघोशात गणपतीचे स्वागत केले जाते. व मूर्तीची पूजा करून  प्राणप्रतिष्ठा केली जाते.

प्राणप्रतिष्ठा करताना प्रथम गणपतीचे आवाहन केले जाते. नंतर स्नान,अभिषेक झाल्यावर वस्त्र घालून ,चंदन,फुले,पत्री वाहिले जाते .व नंतर गपतीला नैवेद्य दाखविला जातो. गणपतीला 21 प्रकारच्या पत्री अर्पण केल्या जातात. गणपती बाप्पा ला मोदक खूप आवडत असल्याने मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो,त्याचप्रमाणे जास्वंदीचे फूल,दूर्वा,शमी पत्री हे गणपतीला खूप आवडतात असे मानतात. पुराणात असे सांगितले आहे की  गणपतीने अलनासुर नावाच्या रक्षसाला गिळले,त्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड आग पडली. कश्यप ऋषींनी उपाय म्हणून गणपतीला दुर्वांचा रस प्यायला दिला त्यामुळे गणपतीच्या पोटातील आग थांबली. म्हणून गणपतीला दूर्वा प्रिय आहेत असे म्हणतात.गणपती बसल्यावर रोज गणपतीची आरती म्हणली जाते.अथर्वशीर्ष व गणपतीचा जागर सुद्धा केला जातो . मूर्ती विसर्जनाच्या आधी उत्तरपूजा केली जाते. त्यानंतर गणपती चे वाहत्या जलाशयात विसर्जन केले जाते.प्रत्येक कुटुंब पद्धतीप्रमाणे घरोघरी गणेश पूजा केली जाते,काही ठिकाणी दीड दिवस तर काही ठिकाणी पाच  तर काही ठिकाणी दहा  दिवसचा गणपती बसविला जातो.

हरतालिका पूजन :

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिका पूजन केले जाते. हे व्रत हिंदू धर्मातील कुमारिका आणि महिलांसाठी सांगितलेले आहे. हे व्रत पार्वतीने शंकरांसाठी केले होते. कुमारिका चांगला वर मिळवा म्हणून हे व्रत करतात.  शिव पार्वतीची पूजा करून दिवसभर उपास केला जातो . हरतालिकेची पूजा करून दुसऱ्या दिवशी तिचे विसर्जन केले जाते,आणि उपास सोडला जातो.

गणपतीची बारा नावे :

संकटनाशन स्तोत्रत सांगितलेली बारा नावे व त्यांचे सध्यस्थान :

  1. वक्रतुंड : मद्रास राज्यातील काननूर जवळ 
  2. एकदंत : पश्चिम बंगालमध्ये कलकत्ताजवळ 
  3. कृष्णपिड्गाक् : मद्रास राज्यात कन्याकुमारीजवळ 
  4. गजवक्र : ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे 
  5. लंबोदर : रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे 
  6. विकट : हिमालयाच्या पायथ्याशी हृषीकेश येथे 
  7.  विघ्नराजेंद्र : कुरुक्षेत्र येथे 
  8.  धूम्रवर्ण : केरळ राज्यात कालीकत येथे 
  9. भालचंद्र : रामेश्वर जवळ धानिशकोडी येथे 
  10. विनायक : काशिक्षेत्रातील धुंडीराज गणेश  
  11. गणपती : श्री गोकर्ण महाबळेश्वर येथे 
  12. गजानन : हिमालयातील शवटचे तीर्थस्थान मटकुंडा गणेश  

आणखी वाचा  : उत्सवाच्या तयारीसाठी टिप्स | Tips for Festival Preparations

गौरी आणि गणपतीचे काय नाते आहे?

महाराष्ट्राच्या बहूतेक भागात गणपतीबरोबरच गौरींचे पण आगमन होते. पाच दिवसाच्या गणपती बरोबर गौरींचे  विसर्जन केले जाते. गौरी हे पार्वतीचे रूप आणि गणपती हा गौरीचा मुलगा. काही ठिकाणी गौरीला गणपतीची बहीण म्हणले जाते पण तसे नसून ती आई आहे. घरातील प्रथेनुसार गौरींची सुद्धा पूजा केली जाते. गणपती आल्यापासून साधारण तिसऱ्या दिवशी गौरींचे आगमन होते व त्याच्या दुसऱ्या दिवशी गौरीजेवण करतात . ३-४ दिवस आधी आलेल्या आपल्या बाळाला घेऊन जाण्यासाठी गौरी माहेरी येते.काही ठिकाणी गौरी आगमनाला महालक्ष्मीचे आगमन देखील म्हटले जाते. गौरी आवाहनच्या पहिल्या दिवशी देवीला भाजीभाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. तर गौरी पूजनाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखला जातो.

गणेशोउत्सव हा भक्ति आणि सांस्कृतिक उत्सव आहे.10 दिवस चालणाऱ्या ह्या उत्सवात घरातले सगळे  सहभाग घेतात व ह्या उत्सवाची मजा वाढवतात.भगवान शंकरांनी गणेशाला सामर्थ्य आणि शक्तीचं वरदान देत आराध्य दैवत बनवलं. याच कारणामुळे आपण  कोणत्याही शुभ कार्याआधी गणपतीची पूजा करतो.

गणपतीची आरती