Indian Spices and their uses | भारतीय मसल्यांचे महत्व
इंडियाला ‘मसाल्यांचा देश’ असे म्हणले जाते. जेवण रुचकर,स्वादिष्ट आणि सुवासिक बनवण्यासाठी जे वनस्पतींचे जे भाग वापरले जातात त्यांना ‘मसाले’ म्हणतात. झाडाच्या वळवलेल्या बिया,खोड,पाने, ह्यापासून मसाले बनतात. भारतीय जेवणात मासल्यांना अनन्यसाधारण महत्व आहे ज्यामुळे स्वाद,सुगंध आणि पौष्टिकतेत तर भर पडतेच पण जे अतिशय औषधी आणि सांस्कृतिक महत्व असणारे सुद्धा आहेत.बऱ्याच मसल्यांमद्धे रोगप्रतिकरक गुणधर्म असतात. भारतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे मसाले वापरायची पद्धत आहे.भारतीय पद्धतीनुसार मसालयांचा वापर पारंपरिक औषधे तसेच काही सौंदर्य प्रसाधननामध्ये सुद्धा केला जातो. येथे काही प्रमुख मसाले आणि त्यांचे उपयोग दिले आहेत.
केवळ औषधी मूल्येच नव्हे तर हे मसाले अन्न संरक्षक म्हणून देखील कार्य करतात. प्राचीन काळी, जेव्हा रेफ्रिजरेटर नव्हते, तेव्हा लोक अन्न दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी विविध मसाले आणि औषधी वनस्पती वापरत असत. भारतातील हवामान मुख्यतः दमट आणि कोरडे आहे आणि बहुतांशी मुसळधार पाऊस पडतो. हे वातावरण विविध मसाल्यांच्या वाढीसाठी योग्य आहे. अशा प्रकारे, भारताला असे वातावरण लाभले आहे जिथे जादुई मसाले आणि औषधी वनस्पती वाढू शकतात.
-
हळद (Turmeric ):
कुर्कुभा लाँगा ह्या वनस्पतीची वाळवलेली मुळे म्हणजे हळद होय,हळदीची लागवड प्रामुख्याने चीन,भारत,श्रीलंका व इंडोनेशिया या भागात होते.हळदीला “आदरकच्या कुतुकतील सोनेरी” असे सुद्धा म्हणले जाते. हळदीमद्धे ‘कर्कूमीन’ नावाचे एक अॅंटी ऑक्सीडेन्ट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी घटक असतो.जो सूज कमी करण्यात आणि त्वचेला चमकदार बनवण्यात मदत करतो.हळद ही त्वचा, हड्ड्यांचे संक्रमण आणि जंतूविरोधी गुणधर्मामुळे लोकप्रिय आहे. हळदीचे सेवन रोज केल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्ताचे शुद्धीकरण होते , त्वचा उजळते , तसेच हळद जंतुनाशकसुद्धा आहे. ही वनस्पती बारमाही आहे. आयुर्वेदात असे म्हणतात की हळद पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्याने हृदयाचे विकार ,मधुमेह,कर्करोग,मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो. पचनक्रिया सुधारते.
- जिरे :
“जिरा” संस्कृत भाषेतील “जिरक” ह्या शब्दापासून आला आहे. जिरे फोडणीमद्धे वापरले जाते. जिरे हे क्युमीनम सायमियम या वनस्पतीचे पक्व व सुकविलेले फळ आहे.जिरे पचनसंस्थेला मदत करते. जिऱ्यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते, जे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास, रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतं.अपचन आणि गॅसची समस्या कमी करते. यामध्ये अँटी-ऑक्सीडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे पचनक्रियेला चालना मिळते आणि प्रतिकारशक्ती वाढवली जाते.
- धणे :
धने ही कोरिअँड्रम सॅटायव्हम या वनस्पतीची हिरवी व सुकविलेली बी (धने). हा एक मसल्याचा पदार्थ आहे.धण्याचे बी पचनासाठी लाभदायक असते. यामध्ये अँटी-ऑक्सीडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. असे गुणधर्म रक्ताचे योग्य परिसंचरण, रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास आणि त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात.धणे कृमिनाशक असून लहान मुलांना जंत किंवा कृमी यांचा त्रास होत असल्यास त्यांना धणे व साखर खावी, त्याने पित्त शमते.धने,जिरे पाण्यात उकळून जर ते पाणी आपण प्यायले तर पंचनाचे त्रास कमी होतात.
- लवंग :
लवंगच्या तेलात दाहक विरोधी गुणधर्म असतात,जे दाह कमी करण्यास मदत करतात. लवंग खाल्ल्याने रोगप्रतिकरशक्ती वाढते. ऋतुबदल जेव्हा होतात तेव्हा लवंग खाण्याचा सल्ला दिल जातो कारण लवंगमध्ये शक्तिशाली अँटी-ऑक्सीडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.दातांच्या समस्यांमध्ये सुद्धा लवंग खायचा सल्ला देतात कारण हे दातांच्या वेदना कमी करण्यास मदत करतात तसेच सूज कमी करण्यास मदत करतात.काही वेळा तोंडाचा वास येत असेल तर लवंग खाण्याचा सल्ला दिल जातो. कारण लवंग हे नैसर्गिक माऊथ फ्रेशनेर आहे.
6 healthy habits to adopt this year
- काळे मिरे :
काळे मिरे अॅंटीऑक्सीडेन्ट ची खाण मानले जातात. काळ्या मिरांमध्ये ‘पिपेरिन’ नावाचं एक सक्रिय घटक असतो, जो पचन सुधारतो आणि अँटी-ऑक्सीडंट्सच्या स्रोतात येतो. हे इन्फेक्शन्स आणि सूज कमी करण्यात मदत करते.काळी मिरे मेंदुसाठी सुद्धा खूप फायदेशीर मानले जातात. काळी मिरे मधले पिपेरिनमुळे मेंदूचे कार्य सुधारते. काळी मिरे खाल्ल्याने कर्करोगाचा धोका सुद्धा कमी होतो,काळी मिरी मध्ये सक्रिय घटक असतात ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. काळी मिरी त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे. काळी मिरी वापरून बनवलेल्या तेलात असलेल्या अॅंटीऑक्सीडेन्ट मुळे त्वचेसाठी सुद्धा ते फायदेशीर असते.
- तीळ :
तीळामद्धे सेसमीन नावाचे अॅंटीऑक्सीडेन्ट असते. तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते जे आपल्या हाडांसाठी अतिशय पोषक असते. तिळात असलेल्या सेसमीनमुळे कर्करोगाच्या पेशी वाढेला आळा बसतो त्यामुळे फुफ्फुस, पोट, गर्भाशय, स्तन यांचे कॅन्सर होण्याची शक्यता कमीहोते .तिळाचे तेल त्वचेसाठी अतिशय उपयोगी असते. ज्यांना कोरड्या त्वचेची समस्या आहे त्यांनी तिळाचे तेल लावल्याने फायदा होतो फक्त ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी मात्र जपून वापरण्याचा सल्ला दिला जातो.
- गरम मसाला :
गरम मसाला हा भारतीय स्वयंपाकात सर्वात जास्त वापरला जातो. गरम मसाला हा लवंग,दालचीनी,कालीमिरे,तेजपत्ता ,वेलची धने,जिरे ह्या सगळ्यांचे मिश्रण असते. ह्या मासल्याचा वापर अन्नाची चव वाढवण्यासाठी केला जातो. गरम मसाला खाण्यात वापरल्याने पचनसंस्था निरोगी राहते. हा मसाला पोटात पचण्यास मदत करणारे रसाची निर्मिती करण्यात मदत करतो. या व्यतिरिक्त, ते आंबटपणा, सूज येणे, अपचन इत्यादी पाचन समस्या टाळण्यास मदत करते.चयापचय सुधारल्याने वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते.
- दालचीनी :
दालचीनी सुद्धा भारतीय मसाल्यांमद्धे बऱ्याच प्रमाणात वापरला जातो.दालचीनी ही मुख्यतः श्रीलंका आणि केरळ प्रांतात आढळतात. दालचीनी हे सदाहरित वृक्षात येते,त्याच्या खोडच्या सालीला दालचीनी म्हणतात व त्याच झाडाच्या पानांना तेजपत्ता म्हणून वापरतात. दालचीनी पावडर पाण्यातून घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते. शरीरातील साखर नियंत्रित ठेवण्यात सुद्धा दालचीनी चा फायदा होतो. इंसुलिन नियंत्रित करण्याचे काम दालचीनी करते. पिंपल्स कमी करण्यासाठी सुद्धा दालचीनी पावडरचा फायदा होतो. दालचीनी पावडर फेस पॅक मध्ये वापरल्याने पिंपल्स ची समस्या कमी होते.