कास पठार माहिती | Information About Kas Pathar

कास पठार माहिती | Information About Kas Pathar

पावसाळा सुरू झाला की निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणी असते. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या डोंगरावर छोटी रानफुले फुललेली बघता  येतात. अनेक धबधब्यांनी सह्याद्री नटलेला असतो. विविध रंगांची,जातीची फुले फुललेली असतात. सह्याद्रीची फुले म्हणले की आठवते ते कास पठार.कास पठार ज्यालाच व्हॅली ऑफ फ्लॉवर्स (valley of flowers) असेही म्हणतात. हे एक दशलक्ष फुलांचे पठार आहे ज्याला यूनेस्को ने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.कास पठार हे सतार पासून साधारण 22 किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणी पुरवतो.या पठारावर पावसाळा सुरू झाला की असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. फुलांच्या अनेक प्रकारच्या दुर्मिळ प्रजाती येथे सापडल्याने 2012 साली यूनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत ह्याचे नाव लिहिले. सातारा जिल्हयात असेलेले हे पठाराची ऊंची समुद्रापासून साधारण 1000 ते 1250 मीटर आहे व त्याचे क्षेत्रफळ 10 चौ. कीमी. एवढे आहे.

कास पठार जैवविविधता (kas pathar information)

साताऱ्याला निसर्गाचे वरदान आहे. कासचे पुष्प पठार, चाळकेवाडी पवनचक्कीचे पठार, पाचगणीचे टेबललॅड या पठारांना “सडा” असे संबोधितात.ह्या साड्यावर पावसाळ्यात गवत उगवते आणि त्यावर विविधरंगी फुले डोलू लागतात. येथे फारशी वस्ती नसल्याने गवत व फुले जोमाने वाढतात. फुलांचा हा विविधरंगी सोहळा जुलै ते सप्टेंबरपर्यंत या काळात पहायला मिळतो.

कास पठारावर  दुरंगी अतिबाला, जवस, रान-काळे तीळ, निसुर्डी, धामण, सुपारी फूल, अबोली, अंबाडी, काटे-कोरंटी, समुद्रवेल, मोतीचंच, गणेशवेल, जांभळी मंजिरी, विष्णू क्रांती, पान लवंग आदी ७० प्रकारच्या फुलझाडे आहेत.कास पुष्प पठारावर पाऊस पडायला लागल्यावर दर महिन्यात वेगवेगळी फुले येतात. कास पठारावर दुर्मिळ जातीची टोपली कारवी सात ते बारा वर्षात एकदाच येतात. पाऊस पडेल लागल्यावर पहिली हजेरी लावतात ती कुसुमची फुले,त्यानंतर काळी मुसळीची चांदणीसारखी दिसणारी पिवळी फुले हजेरी लावतात. मात्र त्याच्यात असलेल्या  औषधी गुणधर्मामुळे मूळापासून वापरत येते . मग येते आषाढ आमरी. आमरी म्हणजे इंग्रजीत ऑर्किड. ती येते तेव्हा गवत जास्त वाढलेले नसते, त्यामुळे त्याची पांढरी सुंदर फुले त्या हिरव्या गालिच्यावर उठून दिसतात.आणि ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तेरडय़ाची फुले आणि सोनकीने सह्य़ाद्रीची पठारे झाकली जातात.

Maharashtra Information In Marathi | महाराष्ट्र माहिती मराठी

कास पाठरला जायचे कसे व कधी :

कास पाठरला जाताना नियोजन अतिशय महत्वाचे आहे. कारण ह्या फुलांचा हंगाम फक्त जुलै ते सेप्टेंबर असतो त्यामुळे त्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी बघायला मिळते.आता कास पठारचे बूकिंग हे ऑनलाइन पद्धतीने करता येते त्यामुळे पर्यटकांना गर्दीत थांबून तिकीट घ्यायची गरज नाही.कास पठार ऑनलाइन बूकिंग ह्या आधुकरुत वेबसाइट वरुन तुम्ही बूकिंग करू शकता. शनिवार रविवार व जोडून आलेली  सुट्टी हयादरम्यान कास पठार ल जायचे असल्यास आधीच बूकिंग करणे इष्ट ठरते. एथे प्रती व्यक्ति 150 रु. एवढे शुल्क आकरले जाते ह्याशिवाय सायकल राईड व गाईड सुविधा सुद्धा सशुल्क उपलब्ध आहे.

कसे जायचे ? 

By Road :

कास पठार हे साताऱ्याहून 30 की. मी. आहे. पुणे ते कासपठार हे अंतर  136 की. मी. आहे. पुणे येथून  NH48 हायवे घेऊन सातारा येते पोहचावे. व सातारा – सांमबरवाडी – लंवघर – अटाली – कास पठार असा रास्ता घ्यावा. तसेच मुंबई ते सातारा हे अंतर 280 की. मी. आहे.मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणांहून, तुम्हाला NH4 वर सातारा पर्यंत गाडी चालवत यावे लागेल. साताऱ्यापासून आणखी 22 किमी पुढे रस्ता बदलून जावे .हा रस्ता प्रवास तुम्हाला एक वेगळाच रोड ट्रिपचा अनुभव देऊन जाईल. जर तुम्ही बस ने जाण्याचे ठरवले तुमच्या  बजेट नुसार मुंबई ते सातारा रात्रभर असंख्य बस मिळतात.

By Train :

जर तुम्ही ट्रेन नी जायचं ठरवत असाल तर सगळ्यात जवळचे स्टेशन सातारा हे आहे. स्टेशन पासून कास पठारला  जाण्यासाठी अनेक रिक्शा बस उपलब्ध असतात.

दैनंदिन वेळा:-

 सकाळी 9 ते संध्याकाळी 6

 सकाळी 7.00 ते 11.00 – 1000 पर्यटक

 सकाळी 11.00 ते 3.00 – 1000 पर्यटक

  दुपारी    3.00 ते संध्याकाळी 6.00 – 1000 पर्यटक (या फेरी साठी, अहवाल देण्याची वेळ दुपारी 3.00 ते 4.00 पर्यंत अनिवार्य केली आहे)

जर तुम्ही कास पठारावर राहणार असला तर तिथे लक्झरी हॉटेल्सचा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे. तिथ्य हॉटेल्स मध्ये राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तिथून दिसणारे मनमोहक फुलांचे दृश्य. तुमच्या सोयीनुसार तुम्ही उपलब्ध हॉटेल मध्ये आधी बूकिंग करू शकता.

कास पठाराला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केल्यानंतर कास पठारावर पर्यटकांची गर्दी खूपच वाढली आहे. निसर्गाची मुक्त उधळण असेलेल्या ह्या पठाराला तुम्ही नक्कीच भेट द्या.

Ganesh chaturthi 2024 | गणेश चतुर्थी माहिती मराठी