कार्तिक पौर्णिमा माहिती 2024 | kartik pournima 2024
नुकतीच दिवाळी संपून भारतात सगळीकडे थंडीची चाहूल लागली आहे. दिवाळी संपल्यानंतर संगळ्यांना वेध लागतात ते तुळशी विविहाचे कारण त्यानंतर आपल्याकडे लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा किंवा काही ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जाते. हिंदू पुराणात कार्तिक महिन्यातील पौर्णिमेचे महत्व सांगितले आहे. ह्यावर्षी कार्तिक पौर्णिमा शुक्रवारी 15 नोव्हेंबर 2024 रोजी आहे. ह्या ब्लॉग मध्ये आपण कार्तिक पौर्णिमेबद्दल माहिती घेऊया.
कार्तिक पौर्णिमा महत्व :
कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणले जाते. ह्या दिवशी भगवान शिव ह्यांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता अशी कथा पुराणात सांगितली आहे. ह्याच दिवशी भगवान विष्णु ह्यांनी मत्स्य अवतार घेतला होता. तसेच गुरु नानक ह्यांचा जन्म सुद्धा ह्याच दिवशी जल होता,त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. असुरांवर देवांचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो. अशी मान्यता आहे की देव ह्या दिवशी गंगा नदीच्या काठावर एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात म्हणून ह्या दिवसाला देव दिवाळी सुद्धा म्हणले जाते. त्रिपुरी पौर्णिमेला गंगा स्नान आणि दीप दानाचे महत्व पुराणात सांगितले आहे.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशी विवाह सुद्धा केला जातो. आपल्या हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे. अशी मान्यता आहे की तुळशी मध्ये लक्ष्मीचा वास असतो. म्हणून आपल्याकडे प्रत्येक घरात तुळशीचे रोप असावे असते म्हणतात. असे मानले जाते की तुळशीचा जन्म कार्तिक महिन्यात झाला आहे त्यामुळे ह्या महिन्यात तुळशीची पूजेचे विशेष महत्व आहे. ह्या महिन्यात लवकर उठून स्नान करून तुळशीला तांब्याच्या भांड्यातून पाणी घातल्यास लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते. तसेच ह्या महिन्यात संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावावा असे म्हणतात.
कार्तिक महिन्यात कार्तिक स्नानाला अतिशय महत्व आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगा,गोदावरी,यमुनेत स्नान केल्याने आपली सगळी पापांचा नाश होतो अशी पुराणात माहिती आहे. त्यामुळे दरवर्षी भक्त गंगा स्नान करण्यास मोठया प्रमाणात गर्दी करतात.
कार्तिक पौर्णिमा कथा :
तारकासुर नावाचा एक राक्षस होता. त्याला तारकाक्ष,कमलाक्ष आणि विद्युतमालि असे तीन मुलगे होते. जेव्हा भगवान शिव ह्यांचा पुत्र कार्तिकेय ह्याने तारकासुरचा वध केला तेव्हा त्याचे तिन्ही मुलगे खूप दुःखी झाले. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी ब्रम्हदेवाची कठोर तपचर्या केली. त्यांच्यावर प्रसन्न होऊन ब्रम्ह देव प्रकट झाले व त्यांना म्हणले वर मागा. तिघांनी ब्रम्हदेवांना अमर होण्याचे वरदान मागितले. परंतु ब्रम्हदेवांनी त्यांना दुसरे वरदान मागावे असे सांगितले.त्या तिघांनी तीन शहरे बांधावी आणि ती तीन शहरे एकाच बाणानि एकाच वेळी नष्ट करता येतील असा वर तारकसुराच्या मुलांनी ब्रम्हदेवाकडे मागितला.त्या तिघांनी तीन शहरे बांधली. तारकाक्षसाठी सोन्याचे, कमलाक्षसाठी चांदीचे आणि विद्युतमालिसाठी लोखंडाचे अशी तीन शहरे बांधण्यात आली. वरदान मिळाल्याने तिघांनी सुद्धा सगळीकडे दहशत निर्माण केली. त्यांनी स्वर्गावर देखील आपला अधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. इंद्रदेव घाबरले आणि त्यांनी भगवान शंकरांचा आश्रय घेतला. इंद्रदेवांचे ऐकून भगवान शंकरांनी एक दिव्य बाण मारून तिन्ही शहरांचा एकाच वेळी नाश करून त्रिपुरसूरांचा वध केला. तेव्हापासून भगवान शिव ह्यांना त्रिपुरारी असेही म्हणतात. अशी ही कथा पौरणात सांगितली आहे.
कार्तिक पूर्णिमा आणि दीपदान :
पुराणात कार्तिक पौर्णिमेला दीपदानाचे अतिशय महत्व सांगितले आहे. ह्या महिन्यात भगवान विष्णु दीर्घ काळाच्या योगनिद्रेनंतर जागे होतात असे पुराणात म्हणतात. ह्या महिन्यात भगवान विष्णु व देवी लक्ष्मीची पूजा केल्याने संपत्ति प्राप्त होते असे म्हणतात. तसेच ह्या महिन्यात दीप दान केल्याने पुण्य प्राप्त होते.
कार्तिक पौर्णिमा शुक्रवारी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजून 19 मिनिटांनी सुरू होऊन 16 नोव्हेंबर 2024 रोजी मध्यरात्री 2 वाजून 58 मिनिटांनी संपते आहे.
कार्तिक महिन्यात दीप दान केल्याने होणारे फायदे :
- पितरदोषापासून मुक्ती मिळावी ह्यासाठी दीपदान करावे.
- अकाली मृत्यू होऊ नये ह्यासाथी दीपदान करावे.
- आपल्या घरात लक्ष्मीचा चिरकाल वास राहावा ह्यासाथी दीपदान करावे.
- आपल्या घरातील पूर्वजांच्या उद्धरासाठीसुद्धा दीपदान केले जाते.
- आपल्या घरातील लोकांच्या आरोग्यासाठी करावे.
- नवग्रहांचा दोष दूर करायचा असल्यास दीपदान करावे.
कसे करावे दीपदान :
- सकाळी लवकर उठून स्नान करून तुळशीला पाणी घालावे.
- त्यानंतर भगवान शंकर आणि विष्णु ह्यांची पूजा करावी.
- भगवान विष्णुला फळे,सुगंधी फुले अर्पण करावी.
- मातीच्या दिव्यात तेल टाकून असा दिवा मंदिरात लावावा.
- कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी विशेष करून पिठाचा दिवा बनवून तो वडाच्या पानावर ठेवून नदीत सोडावा.
- संध्याकाळी घरातील सगळे दिवे लावून तुळशिजवळ तेलाचा दिवा लावावा.
आणखी वाचा : kitchen tips and tricks
Frequently Asked Questions :
- ह्या वर्षी कार्तिक पौर्णिमा कधी आहे?
कार्तिक पौर्णिमा शुक्रवारी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजून 19 मिनिटांनी सुरू होऊन 16 नोव्हेंबर 2024 रोजी मध्यरात्री 2 वाजून 58 मिनिटांनी संपते आहे.
- कार्तिक पौर्णिमा का साजरी केली जाते?
कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणले जाते. ह्या दिवशी भगवान शिव ह्यांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता,म्हणून देव ह्या दिवशी गंगा नदीच्या काठावर एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात म्हणून ह्या दिवसाला देव दिवाळी सुद्धा म्हणले जाते.
- कार्तिक पौर्णिमेदिवशी कोणाची पूजा करतात?
कार्तिक पौर्णिमेला भागवान विष्णु तसेच लक्ष्मी देवीची पूजा केली जाते.
- कार्तिक पौर्णिमेला दीपदान का करावे?
- पितरदोषापासून मुक्ती मिळावी ह्यासाठी दीपदान करावे.
- अकाली मृत्यू होऊ नये ह्यासाथी दीपदान करावे.
- आपल्या घरात लक्ष्मीचा चिरकाल वास राहावा ह्यासाथी दीपदान करावे.
- आपल्या घरातील पूर्वजांच्या उद्धरासाठीसुद्धा दीपदान केले जाते.
- आपल्या घरातील लोकांच्या आरोग्यासाठी करावे.
- नवग्रहांचा दोष दूर करायचा असल्यास दीपदान करावे.
आणखी वाचा : तणाव कमी करण्यासाठी 5 टिप्स | 5 stress management tips