किचन साठी काही उपयुक्त टिप्स |kitchen tips and tricks Marathi
स्वयंपाघर हे कुठल्याही गृहिणी साठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. ह्याच स्वयंपाघरात आपण अनेक पदार्थ अगदी आवडीने बनवतो आणि खाऊ घालतो. त्यामुळे ह्या स्वयंपाघराची काळजी घेणे अतिशय आवश्यक असते. स्वयंपाघर नीटनेटके असेल तर अनेक आजारपासून आपले संरक्षण होते. हेच स्वयंपाघर कसे छान ठेवायचे ह्याबाबत काही टिप्स खाली दिलेल्या आहेत.
किचन टिप्स : kitchen tips and tricks
- स्वयंपाघरात कुठलेही काम करायच्या आधी आपले हात स्वच्छ धुतलेले आहेत का नाही हे जरूर पहावे.
- शक्यतो ताजे आणि गरम अन्न खावे.
- जेवायला शक्यतो हात पाय धुवून बसावे.
- स्वयंपाघरात वापरायची भांडी शक्यतो स्वच्छ व कोरडी केलेली असावी म्हणजे तेलाची फोडणी करताना तेल आपल्या अंगावर उडत नाही.
- तेलाच्या भांड्याखाली एखादा कागदाचा तुकडा कीव टिशू पेपर ठेवावा महणजे तेल घेतला थोडे खाली सांडले तरी ओटा तेलकट होत नाही.
- कांदा खूप वेळ कापून ठेवू नये तसे केल्याने पोत बिघडू शकते.
- बटाटा चिरल्यावर तो लगेच पाण्यात घालावा असे केल्याने तो काळा पडत नाही.
- हिरवी मिरची आले लसूण मिक्सर मध्ये वाटताना त्यात थोडे मीठ घालावे महणजे अगदी बारीक वाटले जाते.
- भाज्या करताना आपल्या शेजारी एखादी ताटली कीव बक्षी ठेवावी महणजे भाजीतला चमचा त्यावर ठेवता येतो आणि ओटा खराब होत नाही.
- पावसाळ्याच्या दिवसात घरात डेटॉल टाकून फारशी पुसावी त्यामुळे माशी,डास,चिलटे घरात येत नाहीत.
- पावसाळ्याच्या दिवसात दही लावायचे असल्यास विरजण दूधला लावून ते casrol च्या भांड्यात ठेववते महणजे पटकन लागते.
- पुरणाच्या पोळ्या करताना हरभरा डाळीबरोबर थोडी तूर डाळ घालावी महणजे डाळ घट्ट शिजते.
- इडली डोसा पीठ करताना त्यात तांदूळ आणि डाळी बरोबर थोडे मेथीचे दाणे घालावे. मेथी दाण्याने पीठ आंबायला मदत होते.
- इडली दुसऱ्या दिवशी राहिली असेल तर त्याचा इडली उपमा करावा. कढई खालच्या बाजूने काली झाली असेल तर त्यावर थोडा बेकिंग सोडा व लिंबू घालून ठेवावे व थोड्यावेळानी गरम पाण्यानी धुवून घ्यावे. एकदम साफ निघते.
- पुलाव,जिरा राइस करायच्या असताना त्यात पाणी उकल्यावर थोडा लिबाचा रस पिळावा महणजे भात एकदम पांढरा शुभ्र होतो
- बटाटे नेहमी हवा येत असेल अश्या ठिकाणी ठेवावे महणजे त्याला मोड येत नाहीत.
- मटकी कीव मुगाला मोड आणताना ते नीट भिजवून चाळणीत ठेवावे व वरुन एखादे कापड टाकावे व थोड्या दमट जागेत ठेवावे महणजे मोड अगदी छान येतात.
- फ्रीज मध्ये वास येत असल्यात ब्रेड चा एक तुकडा ठेवावा त्यांनी वास जाण्यात मदत होते.
- टोमॅटो फ्रीज मध्ये ठेवताना नेहमी देठाची बाजू खाली करून ठेवल्याने टोमॅटो पटकन पिकून खराब हॉट नाहीत.
- कोथिंबीर ,मिरच्या फ्रीज मध्ये ठेवताना त्यात खाली व वरती टिशू पेपर ठेवावा. असे केल्याने त्यातील पाणी टिपले जाते व लवकर खराब होत नाही.
- बदामाची साले पटकन निघवीत ह्यासाठी थोड्यावेल ते पाण्यात भिजवून ठेवावे.
- किचन टॉवेल आठवड्यातून एकदा तरी गरम पाण्यातून धुवून ठेवल्याने त्याला वास येत नाही व चिकट पणा पण निघून जातो.
- कुठलीही भाजी धुताना त्यात तोडे मीठ घालावे महणजे ती चांगली स्वच्छ धुतली जाते व केमिकल्स निघून जाण्यास मदत होते.
- भाजी चिरल्यावर कधीही धुवू नये त्यातील जीवनसत्व पाण्याबरोबर निघून जाते.
- भाजी चिरून झाल्यावर साले फेकून देण्यापेक्षा ती पाण्यात टाकून ते पाणी झाडाना घालावे.
- भेंडीची भाजी करताना ती चिकटत असेल तर त्यात थोडे आमसुल टाकावे.
- कांदा चिरताना डोळ्यातून खूप पाणी येत असेल तर कांदा थोड्यावेळ पाण्यात भिजवून मग चिरावा .
- कोणत्याही गोड पदार्थात कणीभर मीठ घातल्यास त्याची चव आणखी वाढते.
- दूध गरम करायच्या आधी थोडे पाणी तभांड्यात टाकल्याने दूध खाली लागत नाही.
- लोणी काढवताना शक्यतो लोखंडाची कढई वापरावी.
- लाल मिरची पावडर वर्षभर नीट राहावी ह्यासाठी ती काचेच्या बरणीत ठेवावी व थोडे थोडे मीठ मध्ये टाकावे.
- हाताला किंवा भांड्याना मासल्याचा वास येत असल्यात लिंबू चोळावे.
- पुरी करताना त्यात तोडे डाळीचे पीठ व साखर घाला त्याने पुऱ्याना रंग चयन येतो व खुसखुशीत होतात.
- कुठलेली तेलकट पदार्थ करताना तेलात थोडे मीठ टाकावे असे केल्याने पदार्थ तेल शोषून घेत नाही.
आणखी वाचा : https://marathipravah.com/पावसाळ्यात-आहार-कसा-असाव