Maharashtra Information In Marathi | महाराष्ट्र राज्य माहिती मराठी
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे.महाराष्ट्र राज्याची सीमा ही गुजरात,मध्य प्रदेश ,छत्तीसगड ,गोवा, आंध्र प्रदेश,कर्नाटक ह्या प्रादेशांनी जोडली गेली आहे. महाराष्ट्रराज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० किलोमिटर ची किनारपट्टी आहे.महाराष्ट्रची राजधानी मुंबई आहे. महाराष्ट्रची लोकसंख्या जवळपास ११ कोटी आहे. नागपूर ही महाराष्टची उपराजधानी आहे.
आणखी वाचा : 12 ज्योतिर्लिंग माहिती इन मराठी | 12 jyotirling mahiti in marathi
महाराष्ट्र राज्य माहिती:
- स्थापना : 1 मे १९६०
- क्षेत्रफळ : ३,७,७१३ चौ. की. मी.
- लोकसंख्या : ११,२३,७२,९७२
- राजधानी : मुंबई
- मुख्यमंत्री : एकनाथ शिंदे
- मुख्य शहरे : मुंबई,पुणे, नागपुर,छत्रपती संभाजीनगर ,नाशिक , कोल्हापूर, सोलापूर,अमरावती,नांदेड
- अधिकृत भाषा : मराठी
- नृत्य प्रकार : लावणी
- गीत : जय जय महराष्ट्र माझा
- प्राणी : शेकरू
- फळ : आंबा
- खेळ : कबड्डी
- महाराष्ट्रातील अभयारण्ये : ताडोबा व्याघ्र प्रकल्प, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान , नागझरी वन्यजीव अभयारण्य
महाराष्ट्रातील सण :
दिवाळी,रंगपंचमी,गोकुळाष्टमी,गणेशोत्सव ,पाडवा,नागपंचमी,बैलपोळा,ईद, दसरा,पोंगल,मकरसंक्रांती,शिवजयंती असे अनेक सण महाराष्ट्रात साजरे केले जातात. विविधतेत एकता आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते. यांपैकी गणेशोत्सव हा सगळ्यात मोठा १० दिवसांचा उत्सव महाराष्ट्रात साजरा केला जातो. गणपतीची मूर्ती घरोघरी बसवून १० दिवस त्याची पूजा आरती करून अनंतचतुर्दशी च्या दिवशी त्या गणपती चे विसर्जन केले जाते.
महाराष्ट्रातील संत :
महाराष्ट्राला अनेक थोर संतांची परंपरा लाभलेली आहे. त्यामध्ये संत एकनाथ , संत तुकाराम, संत द्यानेश्वर, संत नामदेव ,संत मुकताबाई,संत जनाबाई अश्या कितीतरी महान संतांची अभंगे आणि गाणी आजही आपल्याला ऐकायला मिळतात.
महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे :
तुळजापूरची तुळजाभवानी,कोल्हापूरची अंबाबाई , अष्टविनायक गणपती , शेगावचे गजानन महाराज ,अक्कलकोटचे स्वामी समर्थ,शनि शिगणापुर , शिर्डी चे साईबाबा, पंढरपूर चे पांडुरंग मंदिर ,जेजूरी येथील खंडोबा मंदिर ,देहू , आळंदी अशी अनेक धार्मिक स्थळे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. दर वर्षी लाखों च्या संख्येने भाविक ह्या धार्मिक स्थळाना भेट देत असतात.
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे :
महाराष्ट्र हा भौगोलिक, ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या संपन्न आहे. येथे अनेक किल्ले जसे की राजगड,तोरणा,प्रतापगड,लोहगड ईत्यादी. तसेच अनेक लेणी,थंड हवेची ठिकाणे व कोकणचा समुद्र किनारा लाभला आहे ह्या सर्व स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसून येतात .
महाराष्ट्रातील खंदयासंस्कृती :
महाराष्ट्रातील खादयसंस्कृती भागानुसार बदलते. सर्व प्रकारच्या डाळी,धान्य,भाज्या,फळे, हे महाराष्ट्रात पिकत असल्याने येते समृद्ध खादयसंस्कृती उदयाला आलेली आहे. कोकणात भात व मासे हे प्रिय आहेत तर पूर्व भागात ज्वारी,तांदूळ,गहू,ह्यापासून विविध पदार्थ बनवले जातात. कांदे ,बटाटे, आले, लसूण, मिरची हे सर्रास महाराष्ट्रियन जेवणात वापरले जातात.
महाराष्ट्रातील संस्कृती :
महाराष्ट्रात अनेक जुनी मंदिरे आहेत. मंदिरांवर हिंदू,जैन,बौद्ध संस्कृतीचा प्रभाव आढळतो. महाराष्ट्रात अनेक थोर लेखक व कलावंत ह्यांची परंपरा आहे. ह्यामध्ये पू. ल. देशपांडे, व. पू. काळे ,शांताबाई शेळके ,प्र.के.अत्रे , ग. दी. माडगूळकर , असे अनेक थोर लेखक तसेच सचिन पिळगावकर , अशोक सराफ ,माधुरी दीक्षित , लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, व्ही शांताराम, असे थोर कलावंत ही लाभले आहेत. मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी लेखकांनी गाजवला. तो काळ संगीत नाटके आणि नाट्यसंगीताचा होता. याच काळात बालगंधर्व, केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर ,दीनानाथ मंगेशकर,लता मंगेशकर ,आशा भोसले, श्रीधर फडके या गायक-कलावंतानी रंगभूमीची सेवा केली.
महाराष्ट्र हे एक वैविध्यपूर्ण आणि गतिमान राज्य आहे जे भारताच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आर्थिक विकासाचा दाखला आहे.