Monsoon Skin care tips | पावसाळ्यात घ्या अशी त्वचेची काळजी

Monsoon Skin care tips | पावसाळ्यात घ्या अशी त्वचेची काळजी 

पावसाळा म्हणल की मस्त गरम गरम वाफाळता चहा आणि भजी ! शिवाय अश्या पावसाळी वातावरणात मस्त खिडकी शी  बसून गरम गरम काहीतरी खायच आणि पुस्तक किंवा छान गाणी ऐकायची. पण पावसाळा म्हणलं की तेलकट त्वचा , ओपन पोर्स ,आणि त्वचेचे संसर्ग हे पण आलच. अश्या वेळेस खालील काही टिप्स वापरुन तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकतात.( पावसाळ्यात घ्या अशी त्वचेची काळजी ).

तेलकट त्वचा :

पवसाळ्यातील ओलावा आणि आर्द्रता ह्यामुळे त्वचेवर ह्याचा परिणाम होतो. त्वचेवर अतिरिक्त तेल दिसू लागते. त्यामुळे             मुरूमयांची समस्या सुद्धा वाढते.पावसाळ्यात चेहरा स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळ दिवसातून धुवावा. त्यामुळे त्वचेवरील घाण     निघून जण्यास मदत होते आणि तेलकट पणा सुद्धा कमी होतो.सौम्य फेस वॉश ने चेहरा धुवावा. यासाठी तुमच्या स्कीन टाइप च्या नुसार फेस वॉश निवडावा. मुलतानी मिट्टी आणि गुलबपाणी ह्यांचा फेस पॅक सुद्धा तेलकट पणा कमी करण्यासाठी वापरता येतो.फेस वॉश नंतर टोनर वापरावा. आजकाल बऱ्याच प्रकारचे टोनर उपलब्ध आहेत. जसे की गुलबपणी,टी थ्री.त्वचेचा तेलकट पणा कमी करण्यासाठी सीरम चा सुद्धा खूप उपयोग होतो.आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार बाजारात अनेक सीरम उपलब्ध आहेत.

मुरूम :

जर तुम्हाला मुरूमची समस्या असेल तर पावसाळा हा तुमचा मोठा शत्रू आहे. दमट हवा आर्द्रता ह्यामुळे त्वचेवर तेलाचे प्रमाण वाढून धूळ ,घाण ही वाढत जाते. आणि हे मुरूमांची समस्या आणखीन वाढवतात.त्वचेचे छिद्र ओपेन होऊन त्वचेच्या आत ही घाण जाऊन बसल्याने ब्लॅक हेडस(black head ) व्हाइट हेडस(white head) चे प्रमाण वाढते.अश्या वेळेस चेहरा दिवसातून 2-3 वेळा धुणे फायदेशीर ठरते.शिवाय चेहऱ्याला exfoliate करणे फायदेशीर ठरते जेणे करून त्वचेवरील मृत पेशी निघून जातील.चेहऱ्याला वाफ देऊन  ब्लॅक हेडस(black head ) काढावे. व फेस पॅक लावून चेहरा धुवावा.

ह्याशिवाय पावसाळ्यात खालील गोष्टी करू शकता :

सनस्क्रीन वापरणे :

सूर्याची अतिनील किरणे नसली तरी पावसाळ्यात सनस्क्रीन वापरणे खूप गरजेचे आहे,कारण घातक uv किरणे ढगांच्या मधून सुद्धा आपल्या त्वचेला हानी पोहचवू शकतात. त्यामुळे तुमचे स्कीन केयर रुटीन काहीही असले तरी त्यात सूनस्क्रीन नक्की लावावे. सनस्क्रीन कमीत कमी SPF 30 तरी असावे.

मोईस्टरायइझर वापरणे :

मोईस्टरायइझर हा आपल्या स्कीन केयर रुटीन मधला महत्वाचा घटक आहे.मोईस्टरायइझर मुळे आपल्या स्कीन मधला ओलावा टिकून राहतो. पावसाळ्यात शक्यतो हलके आणि तेलकट नसलेले मोईस्टरायइझर वापरणे उपूक्त ठरते. जेणेकरून आपल्या स्कीन ला ओलावा मिळेल पण त्वचा तेलकट होणार नाही. कोरफड,विटामीन ई असे घटक असलेले मोईस्टरायइझर निवडावे. हे घटक त्वचेला छिद्र न करता त्वचेचे उत्तम पोषण करतात.

अन्न आणि पाणी :

पावसाळा म्हणले की आपल्याला भजी,समोसे, वडे असे सगळे तेलकट पदार्थ खायची इच्छा होते. पण हे पदार्थ तुमच्या त्वचेसाठी चांगले नाहीत. तसेच पावसाळ्यात हवेत गारवा असल्याने आपल्याला पाणी प्यायची इच्छा कमी होते. व त्यामुळे पचनासंबंधी तक्रारी होऊ शकतात. हे सुद्धा चेहऱ्यावर मुरूम येण्याचे एक कारण असू शकते. त्यामुळे पावसाळ्यात त्वचेला बाहेरून तसेच आतून ओलावा मिळणे गरजेचे आहे.

  त्वचेचा संसर्ग (skin infections):

पावसाळ्यात बाहेर खूप प्रमाणात आर्द्रता असल्याने अनेक वेळ त्वचे संबंधी विकार होतात जसे की त्वचेला खाज सुटणे,फंगस येणे . पावसाळ्यात त्यामुळे शक्यतो हलके व पूर्णपणे कोरडे केलेले कपडे वापरावे.