मूर्तीकाराची गोष्ट मराठी | Moral Stories in Marathi

मूर्तीकाराची गोष्ट मराठी | Moral Stories in Marathi

Moral stories

 

एकदा एक गावात एक मूर्तिकार असतो. त्याने नुकतेच मूर्ती घडवायचे काम शिकलेले असते. एकदा तो एक जंगलातून जात असतो. त्याला एक मोठा दगड तिथे दिसतो,त्याला तो दगड खूपच आवडतो. तो विचार करतो ‘ह्या दगडापासून आपण मूर्ती बनवू शकलो तर’! त्याला ती कल्पना आवडते. व तो ठरवतो की ह्याची मूर्ती बनवायची.
तो त्याच्या पिशवीतून हातोडी काढतो,व तो दगड घेऊन त्याला ठोकायला सुरवात करतो. जस तो त्या दगडावर हातोडी मारणार त्या दगडातून आवाज येतो “मला मारू नका मला दुखते आहे.”त्या मूर्तीकाराला काही कळत नाही आवाज कुठून येतो आहे,तो जंगलात आजूबाजूला बघतो. त्याला कोणीच दिसत नाही. त्याला वाटते आपल्याला भ्रम झाला असेल. असे म्हणून तो परत हातोडी घेऊन दगडावर वार करायला जातो,तर त्याला परत आवाज येतो “मला मारू नका मला दुखते आहे.” मूर्तिकार आता घाबरतो व तो दगड तिथेच सोडून तिकडून पुढे जातो.
पुढे गेल्यावर त्याला अजून एक मोठा व सुंदर दगड दिसतो तो विचार करतो आता ह्या दगडाची आपण सुंदर मूर्ती बनवूया. तो परत त्याच्या पिशवीतून हातोडी काढतो आणि दगडावर ठोकायला लागतो. ह्या दगडाला पण वेदना होत असतात. पण तो दगड त्या वेदना सहन करतो. थोड्यावेळातच तो मूर्तिकार त्या दगडापासून एक सुंदर देवीची मूर्ती तयार करतो. त्याला खूपच आनंद होतो त्याने केलेली मूर्ती पाहून.त्यानंतर तो मूर्तिकार तिथून पुढे जातो.

आणखी वाचा  : Moral Story for kids

 पुढे गेल्यावर त्याला एक गाव लागते,त्या गावात नुकतेच एक सुंदर मंदिर बांधलेले असते ,पण तिथे त्या गावात मूर्ती नसल्याने त्या गावात सगळी लोक जमून मूर्ती कुठून मिळवायची हा विचार करत असतात,तेवढ्यात तो मुरटीकेर तिथे येतो. मूर्तीकाराला जेव्हा हे समजत तेव्हा तो सांगतो की” मी जंगलात एक देवीची मूर्ती बनवली आहे ती तुम्ही घेऊन येऊ शकता”. हे ऐकल्यावर गावातले लोक खुश होतात. व पुढे त्या मूर्तीकाराला म्हणतात की “देवीच्या मूर्तीसमोर नारळ फोडायला आम्हाला तुम्ही एक दगड घडवून देऊ शकाल का?” मूर्तिकार त्यांना सांगतो मी जिथे देवीची मूर्ती बनवली आहे तिथून थोडेसे पुढे गेल्यावर अजून एक मोठा व सुंदर दगड आहे तो तुम्ही घेऊन या.
 गावातले लोक जंगलात जाऊन ती देवीची मूर्ती व नारळ फोडण्यासाठीचा दगड घेऊन येतात. त्या देवीची मूर्ती मंदिरात स्थापन करतात. रोज त्या देवीची पूजा होऊ लागते. व तो नारळ फोडण्यासाठी जो दगड आणलेला असतो तो बाहेर ठेवला जातो. तो दगड त्या मूर्तीला म्हणतो “मला खूप दुखते हे लोक माझ्या डोक्यावर नारळ फोडतात.” तेव्हा ती देवीची मूर्ती त्याला म्हणते “मला पण खूप दुखल होत जेव्हा त्या मूर्तीकाराने मला घडवले पण मी त्या वेळेस सहन केले ,जर तू ज्यावेळेस मूर्तिकार तुला घडवत होता तेव्हा सहन केले असतेस तर आज माझ्याजागी तू असतास आणि तुझी पूजा झाली असती “. 
मित्रानो ह्या गोष्टीवरून आपल्याला काय कळले की जीवनात थोडे फार संघर्ष हे करावेच लागतात,तो पर्यन्त संघर्ष करत नाही तो पर्यन्त आपल्याला त्या गोष्टीची किंमत कळत नाही.व जीवनात संघर्ष कोणालाच चुकलेला नाही.