Moral Story for kids

मधासारखे गोड गवत |Moral Story for kids 

 

बनारसच्या राजाची बाग खूप सुंदर आणि भव्य होती. त्याने बगेची देखरेख करणाऱ्या दामूला आदेश दिला होता की जर बागेत एखादा वेगळा प्राणी आला,तर राजाला कळवावे. राजाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्या महालात ठेवणे खूप आवडत होते.

एके दिवशी दामूने राजाला सांगितले की त्यांच्या बागेत एक पवन हरीण चालायला येते. पवन हरिण अत्यंत लाजळू असते. जर त्याने कोणाला आपल्या आजूबाजूला पहिले तर ते पळून गायब होते. दामूने  त्या हरिणाला बागेतच थांबवावे अशी राजाची इच्छा होती,यासाठी दामूने एक योजना बनवली. त्याने हे काम करण्यासाठी राज्यकडे थोडा मध मागितला. राजाने लगेचच मधाची सोय करून दिली.

आणखी वाचा : हरतालिका व्रताची कहाणी | Hartalika Vrat Khani

जेव्हा पवन हरिण बागेत चरायला आले,तेव्हा त्याला गावताचा स्वाद खूपच गोड लागला. हरणाला तो स्वाद खूप आवडला. यानंतर तो दररोज मधसारखे गोड लागणारे गावत खायला तिथे येऊ लागला. बागेत गवत खाताना दामू जवळ असण्याची आता हरिणाला सवय झाली. तो रोज बागेत येऊ लागला. एके दिवशी दामू पवन हरिणाजवळ गेला. पवन हरिण आपल्याला घाबरते का ते त्याला पहायचे होते. पवन हरिण त्याला अजिबात घाबरले नाही ते आनंदाने गवत खात होते.दामुने बागेपासून महालपर्यंत कापडाच्या मदतीने एक मार्ग बनविला. कापडमुळे पवन हरिण घाबरले नाही हे बघून दमूने त्या कापडावर गोड गवत टाकण्यास सुरवात केली. हळू हळू हरिण गवत खाते हे बघून दामू त्याला महालपर्यंत घेऊन गेला.

राजा त्या हरिणाला बघून खुश झाला.त्याने याआधी असे हरिण कधीच पहिले नव्हते.पवन हरिण अतिशय लाजाळू होते,बाकीच्या लोकांना बघून ते घाबरून पळून जाईल अशी भीती राजाला वाटू लागली. इकडे पवन हरिण महालातील लोकांना बघून इकडे तिकडे पळू लागले. पवन हरिणसाठी महालातील सर्व काही नवीन होते. महालातील सगळे हरिणाला वेगवेगळे आवाज काढून बोलवत होते. पवन हरिणाला वाटले की हे सगळे जण मिळून त्याला मारून टाकणार आहेत. पवन हरिण आता महालात उदास राहू लागले. त्याने खाणे पिणे सोडून दिले. त्याची देखरेख करणाऱ्या सेवकाने राजाला सांगितले की असंच राहिले तर हरिण मरून जाईल .

पवन हरिणाची अवस्था बघून राजाला वाईट वाटले. त्यांनी सेवकला सांगितले की त्या हरिणाला परत जंगलात सोडून यावे. ह्या घटनेनंतर राजा आपल्या दारबाऱ्यांना महणाला ” ही घटना आपल्यासाठी एक शिकवण आहे. स्वत:वर संयम असला पाहिजे आणि कोणत्याही वस्तु मिळवण्यासाठी आंधळे होता कामा नये,नाहीतर आपली दशा सुद्धा ह्या हरिणसारखी होईल.”

तात्पर्य : कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी माणसाने संयम सोडू नये . विचार करून कृती करावी.