Navratra 2024 Information | शारदीय नवरात्र 2024 माहिती

Navratra 2024 Information | शारदीय नवरात्र 2024 माहिती 

हिंदू धर्मात श्रावण महिना चालू झाल्यापासून ते दिवाळी पर्यन्त प्रत्येक महिन्यात वेगवेगळे सण असतात. श्रावण महिन्यात नागपंचमी,गोपाळकाला,रक्षाबंधन तर भाद्रपद महिन्यात गणपती उत्सव हे सण साजरे केले जातात. अनंत चतुर्दशीनंतर येणारे 15 दिवस हिंदू धर्मात पितृपक्ष असतो. त्यानंतर सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार सण म्हणजे शारदीय नवरात्र (navratra information).ह्या वर्षी नवरात्र उत्सव म्हणजेच घटस्थापना 3 ऑक्टोबर 2024 रोजी आहे तसेच 12 ऑक्टोबर 2024 रोजी दसरा अर्थात विजयादशमी आहे.(navratra information).

नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.घटस्थापना ते दसरा हे दिवस हिंदू धारमाप्रमाणे अतिशय शुभ मानले गेले आहेत. आश्विन महिन्यात घटामद्धे देवीची स्थापना करून दिवा लावून देवीची मनोभावे सेवा व प्रार्थना केली जाते,ह्या दिवसांत देवीचे नामस्मरण करणे,उपासना करणे,पूजा करणे हे अतिशय पुण्याचे मानले आहे. नवरात्र म्हणजेच नऊ दिवस व दहा रात्री असा हा चालणारा उत्सव आहे.(navratra information). नावरात्रीशी संबंधित आख्यायिका अशी आहे की देवी दुर्गा आणि शक्तिशाली राक्षस महिषासुर ह्यांच्यात झालेले यूद्ध. नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा देवी दुर्गाच्या अवताराची महिषासुरवर झालेला विजय ह्यासाथी साजरा केला जातो. दूष्टावर चांगल्याचा विजय ह्यासाथी हा दिवस साजरा केला जातो.(शारदीय नवरात्र माहिती)

आणखी वाचा  : Benefits of eating Rice| भात खाण्याचे फायदे

देवीची नऊ रुपे :

  • दिवस पहिला : 3 ऑक्टोबर ,गुरवार ,घटस्थापना शैलपुत्री पूजा 

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा करतात.शैलपुत्री हा महाकालीचा अवतार समजला जातो. ही देवी सतीचा पुनर्जन्म आहे असे  मानले जाते आणि तिला हेमावती म्हणून देखील ओळखतात.(शारदीय नवरात्र माहिती)

  • दिवस दूसरा : 4 ऑक्टोबर शुक्रवार , ब्रम्हचारिणी पूजा 

ब्रम्हचारिणी म्हणजेच तपचारिणी. पार्वतीचा अजून एक अवतार असलेली ही देवी आनंद व शांततेच प्रतीक आहेहिच्या पूजनाने मोक्ष तसेच शांती प्राप्त होते असे म्हणतात. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हीचे पूजन केले जाते.

  • दिवस तिसरा : 5 ऑक्टोबर, शनिवार ,चंद्रघंटा पूजा 

भगवान शिवशी लग्न केल्यावर अर्धचंद्र लावणारी देवी ही कल्याण करणारी देवी म्हणून चंद्रघंटेची पूजा केली जाते,हिच्या पूजनाने सर्व कष्टातून मुक्ती होते असा समज आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी हिची पूजा केली जाते.

  • दिवस चौथा : 6 ऑक्टोबर , रविवार , कुष्मांडा पूजा 

कुष्मांडा देवीचे रूप अष्टभुजा स्वरूप आहे,हिच्या पूजनाने सर्व रोग नष्ट होतात असे मानतात. कुष्मांडा देवीला कोहल्याचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे . चवथ्या दिवशी हिचे पूजन करतात.

  • दिवस पाचवा : 7 ऑक्टोबर , सोमवार , स्कंदमाता 

स्कंदची माता असलेली देवीचे चार भुजाचे स्वरूप आहे. ह्या देवीचा वर्ण शुभ्र असतो व कमळावर विराजमान असते. नवरात्रीच्या हिची पाचव्या दिवशी पूजा करतात.

  • दिवस सहा :  8 ऑक्टोबर , मंगळवार , कात्यायनी  

कत नावाच्या ऋषींच्या कुळात व कात्रक गोत्रात उत्पन्न झालेली देवी म्हणून कात्यायनी देवी म्हणले जाते.ही दुर्गेचा अवतार मानली जाते देवीच्या सगळ्या रूपांपैकी कात्यायनी देवी सगळ्यात हिंसक मानली आहे. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी हिची  पूजा करतात.

  • दिवस सात : 9 ऑक्टोबर , बुधवार ,कालरात्री 

काळे शरीर व तीन डोळे असलेली तसेच खड्ग धरण केलेली असे हीचे रूप असते.असे मानले जाते की पार्वतीने सुंभ आणि निसुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची फिकट त्वचा काढली होती. कालरात्री देवी लाल रंगाच्या पोशाखात किंवा वाघाच्या कातडीत दिसते आणि तिच्या अग्निमय डोळ्यांमध्ये खूप क्रोध आहे आणि तिची त्वचा काळी पडते. नवरात्रीच्या सातव्या दिवशी हिची  पूजा करतात.

  • दिवस आठ : 10 ऑक्टोबर , गुरुवार , महागौरी 

गोरा रंग,दागिने व पांढरे वस्त्र असे हीचे रूप असते. नवरात्रीच्या आठव्या दिवशी हिची  पूजा करतात.

  • दिवस नऊ : 11 ऑक्टोबर , शुक्रवार , सिद्धीदात्री 

नावाप्रमाणे सर्व सिद्धी देणारी देवी म्हणून मान्यता आहे.सिद्धिदात्री ही भगवान शिवाची पत्नी पार्वती आहे. सिद्धिदात्री ही देवी  शिव आणि शक्तीचे अर्धनारीश्वर रूप म्हणूनही ओळखली जाते. नवरात्रीच्या नवव्या दिवशी हिची  पूजा करतात.

नवरात्रोत्सव आणि व्रत :

शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव असून देवीची पूजा व आराधना ह्या नऊ दिवसात केली जाते. ह्या उत्सवाची सुरवात घटस्थापनेपासून सुरू होते. श्रावण महिन्यानंतर येणाऱ्या ह्या उत्सवात पावसाळा संपून ऋतु बदल होत असतो त्याचे प्रतीक म्हणून घटस्थापनेला टोपलीत माती मध्ये नऊ प्रकारचे धान्य पुरण्यात येते. टोपलीच्या मधोमध मातीचा घट ठेवण्यात येतो व पूजा करण्यात येते. रोज झेंडूच्या फुलांची माळ,तसेच अखंड नंदादीप व आरती करून नैवेद्य दाखवला जातो. बहुतेक ठिकाणी सप्तशतीचे पाठ करण्याची प्रथा आहे.नवरात्रात काही ठिकाणी महिला नऊ दिवसांचे उपास करतात तर काही ठिकाणी पहिल्या व शेवटच्या दिवशी उपास करायची प्रथा आहे.नवरात्रात देवीची नवी साडी,खण नारळ देऊन ओटी भरायची सुद्धा प्रथा आहे.

कुमारिका ह्या दुर्गेचे रूप मानतात त्यामुळे ह्या दिवसांत कुमारिका पूजन केले जाते. शारदीय नवरात्रात काही प्रांतात देवीचा गोंधळ घालायची प्रथा आहे. भगवान परशुराम यांनी बेटासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याचे शीर धडापासून वेगळे केले. त्याच्या शिराच्या तंतूंना ओवून त्यापासून एक वाद्य तयार केले आणि आपली माता रेणुका हिच्यासमोर हे वाद्य वाजवून त्यांनी आपल्या आईला वंदन केले. त्यावेळेपासून गोंधळ परंपरा सुरू झाली असे मानले जाते.प्रत्येक प्रांतातील कुलधर्मप्रमाणे नवरात्रीची पूजा वेगवेगळी केली जाते. अष्टमीला तांदुळाच्या पिठाचा मुखवटा असलेली देवी उभी करून तिची पूजा केली जाते व तो मुखवटा काजल कुंकवाने रेखटण्याची प्रथा आहे. मंगलागौरी प्रमाणे हे व्रत केले जाते सर्व बायका एकत्र येऊन पूजा व आरती करतात त्या नंतर घागरी फुंकण्याचा कार्यक्रम असतो. घागर उदाच्या धूपाने भरतात व  पाच वेळा फुंकतात. यामुळे श्वसन मार्ग शुद्ध होतो असे मानले जाते.

 

विविध प्रांतातील नवरात्र : 

नावरात्रीचा उत्सव हा भारतभर साजरा केला जात असला तरी  महाराष्ट्र , गुजराथ तसेच बंगाल मध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.नवरात्रीच्या काळात महाराष्ट्रात मुली संध्याकाळी भोंडला खेळतात. गुजराथमध्ये या काळात रात्री गरबा खेळतात. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी भोंडला खेळतात. नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्र असल्याने  हत्तीची प्रतिमा काढून पाटावर  मध्ये  ठेवली जाते आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात. व भोंडल्याची गाणी म्हणतात . बंगालमध्ये घागरी फुंकण्याची मोठी प्रथा आहे.तर गुजराथ मध्ये गरबा खूप आनंदाने खेळला जातो.

अश्विनशुद्ध विजयादशमी किंवा दसरा ह्या दिवशी चामुंडा देविने म्हैशसुर राक्षसाचा वध केला अशी पौराणिक कथा आहे,त्याला नावरात्रीचा समाप्ती दिवस असेही म्हणतात. या दिवशी शमीपूजान,सीमोल्लंघन,शस्त्रपूजा केली जाते. रामाने नऊ दिवस देवीची आराधना करून शक्ति प्राप्त केली व त्यामुळे रावणाचा वध झाला अशी मान्यता आहे. म्हणून भारतात वेगवेगळ्या प्रांतात रावणदहन केले जाते .

घटस्थापना मुहूर्त

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. या वर्षी मुहूर्त ३ ऑक्टोबरला सकाळी ६:१५ पासून ते ७:२२ मिनिटांपर्यंत असेल. घटस्थापनेसाठी मुहूर्त सकाळी ११:४६ मिनिटे ते दुपारी १२:३३ मिनिटांपर्यंत असेल.

आणखी वाचा : kitchen tips and tricks | किचन टिप्स इन मराठी |kitchen tips and tricks Marathi