श्रावण महिना 2024 |सणांची माहिती | Shravan Mahina mahiti 2024|Shravan mahina mahiti in Marathi
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे;
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे.
बालकवींची ही श्रावण महिन्याची कविता आपण सगळ्यांनी नक्कीच ऐकली आहे. तर ह्याच श्रावण महिन्याचे काय महत्व हिंदू धर्मात आहे ह्याची माहिती आपण आज बघूया. श्रावण महीना हा हिंदू धर्मातील पाचवा महिना आहे. ह्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र ‘श्रवण’ नक्षरात असतो म्हणून ह्या महिन्याला “श्रावण ” असे महणले जाते. देशातल्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतिनि श्रावण महिना साजरा केला जातो.श्रावण महिन्यात शंकराच्या उपासनेला फार महत्व आहे.
वेगवेगळ्या प्रदेशातील श्रावण (श्रावण महिना महिती):
भारतात वेगवेगळ्या प्रदेशात श्रावण महिना वेगवेगळ्या वेळी साजरा केला जातो. भारतीय दिनदर्शीकेत श्रावण महिना हा जुलै महिन्यातील पौर्णिमेला सुरू होऊन ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या उत्तरार्धात पुढील पौर्णिमेला संपतो. तमिळ लोकांमध्ये श्रावण महिन्याला “अवनी”असे महणले जाते. चंद्र धार्मिक दिनदर्शीकेत श्रावण अमावस्येपासून सुरू होतो आणि तो वर्षाचा पाचवा महिना असतो.बंगाली भाषेत श्रावण महिन्याला “श्राबोन “ असे म्हणले जाते. (श्रावण महिना महिती)
अधिक श्रावण :
8 11 किंवा क्वचित 11 वर्षानी अधिक श्रावण येतो. या महिन्यात येणाऱ्या शुक्ल व वद्य दोन्ही एकादश्याना “कमला एकादशी” हे नाव आहे.चतुर्मासात लग्न होत नसल्याने श्रावणात पण लग्न होत नाहीत.
अधिक श्रावण झालेली व येणारी काही वर्षे : इसवी सन १९०१, १९०९, १९२०, १९२८, १९३९, १९४७, १९५८, १९६६, १९७७, १९८५, २००४ आणि २०२३, २०४२, २०६१…वगैरे.
श्रावण महिन्यातील सण :
श्रावणी सोमवार:
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची आराधना केली जाते. ह्या दिवशी उपवास करून शंकराची पूजा केली जाते. नवीन विवाह झालेल्या तरुणी प्रत्येक सोमवारी तीळ,तांदूळ,मूग आणि जव असे शंकराच्या मंदिरात जाऊन “शिवमूठ “वाहून येण्याची पद्धत आहे.
नागपंचमी :(श्रावण महिना महिती)
नागपंचमी हा श्रावण महिन्यातील श्रावण शुद्ध पंचमी ह्यादिवशी साजरा केला जातो. ह्या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते. कालीया नागाचा पराभव केल्यावर भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले त्यादिवसापासून नागपंचमी साजरी केली जाते अशी मान्यता आहे. राजस्थान,गुजराथ,केरळ आणि महाराष्ट्र ह्या भागात प्रामुख्याने नागपंचमी साजरी केली जाते.
मंगळागौर पूजा :
मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. नवविवाहित महिलांनी लग्नानंतर पहिली पाच वर्षे हे व्रत करायचे असते. पार्वती देवीने भगवान शंकरसाठी केलेले हे व्रत आहे असे मानले जाते. ह्यादिवशी नवीन लग्न झालेल्या महिलांनी सकाळी स्नान करून आपल्या ओळखितल्या नववधू महिलांना बोलवून मंगळागौरीची पूजा मांडतात. शेजारी भगवान शंकराची पिंड सुद्धा करतात. शिव व पार्वती ह्यांचे पूजन करून आपला संसार पण सुखाचा व्हावा ह्यासाठी ही पूजा केली जाते. मग आरती करून प्रसाद वाटला जातो.वेगवेगळ्या झाडांची पत्री हयात वापरली जाते जसे की आघाडा,चमेली,जाई ,चाफा,बोर,माका,मोगरा ईत्यादी. पूजा करताना 16 प्रकारच्या पत्री अर्पण केल्या जातात.
संध्याकाळी सगळ्या बायका जमून आरती पूजा करून आपला उपास सोडतात. मंगळागौरीची रात्र जगवण्याची प्रथा आहे त्यामुळे जमलेल्या बायका मंगळागौरीचे खेळ खेळतात. खेळांमध्ये लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, अठूडं केलं गठूडं केलं आदी गाणे म्हणण्यात येतात. नऊवारी लुगडे नेसून पारंपरिक दागिने घालून हे व्रत करण्यात येते. गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा – इत्यादी. असे साधारणतः ११० प्रकारचे खेळ यात खेळले जातात.यात फुगड्या, आगोटा पागोट्याचे प्रकार असतात.मंगळागौर हे व्रत कष्टाचे, दमणुकीचे नसून चापल्य देणारे, चैतन्य देणारे व सामुहिक जीवनाचा आनंद देणारे आहे.
रक्षाबंधन :
रक्षाबंधन सण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. रक्षाबंधन ह्याचा शब्दशः संस्कृत अर्थ “संरक्षण, बंधन किंवा काळजी” ह्यादिवशी सर्व वयोगटातील बहिणी भावांना आकर्षक राखी बांधतात ही राखी हे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते. श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा नंतर असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला‘रक्षाबंधन’ म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो.
उत्तर भारतात राखी असे महणले जाते. राखी बांधून भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी प्रेमाने स्वीकारतो. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे.काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना, आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपले रक्षण करण्याचे वचन ह्यामर्फत घेतले जाते.
आणखी वाचा :Deep Amavasya mahiti | दीप अमावस्या माहिती मराठी
नारळी पौर्णिमा :(श्रावण महिना महिती)
नारळी पौर्णिमा ही श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. ह्या दिवशी समुद्र आणि वरुण देव ह्यांना नारळ,फुले,तांदूळ अर्पण केले जातात. महाराष्ट्रात कोंकणी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो. नारळी पौर्णिमेच्या वेळी भक्त वरुणाची पूजा करतात. भक्त वरुणाला नारळ अर्पण करतात आणि त्याचा आशीर्वाद मागतात. भक्त वरुणाची पूजा करतात आणि शांत पाणी मागतात आणि नैसर्गिक जल संकटे टाळतात
श्रीकृष्ण जन्माअष्टमी व गोपाळकाला :
भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी मध्यरात्री मथुरेत कृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. या दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते. मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मानंतर भक्तीगीत, उपवास, पूजा,रात्री जागरण आणि दुसऱ्या दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते. हा उत्सव भारतात सगळीकडे मोठ्याप्रमाणात साजरा होतो. गोकुळ,मथुरा,वृंदावन ,जगन्नाथ पुरी ह्या ठिकाणी वैष्णव संप्रदेची मंदिरे असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात जन्माअष्टमी साजरी होते.
उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या प्रसादाला गोपाळकाला असे म्हणतात. कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात दुसऱ्या दिवशी दहीकाला किंवा दहिदांडी होते व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. “गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥”असे गाणे गात दहीहांडी फोडायला पुरुष जातात.
असा हा श्रावण महिना जी एकी आणि चैतन्याचे प्रतीक आहे,तो सगळीकडे मोठा आनंदात उत्साहात साजरा केला जातो.