Upcoming movies in August 2024

Table of Contents

Upcoming movies in August 2024 | जाणून घ्या ऑगस्ट महिन्यात कोणते पिक्चर प्रदर्शित होणार आहेत

बॉलीवुड हे भारतातील सिनेमा क्षेत्रातील मोठे नाव आहे. बॉलीवुड मूवीज ,गाणे हे सगळ्या जगात फेमस आहेत. तर आज जाणून घेऊया ह्या म्हणजेच ऑगस्ट महिन्यात कुठले कुठले मूवीज प्रदर्शित होत आहेत.
Ulajh :
Ulajh हा 2 ऑगस्ट 2024 रोजी रीलीज झालेला पिक्चर सध्या चर्चेत आहे. ह्या पिक्चर मधील जान्हवी कपूर च्या भूमिकेच सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे. जान्हवी कपूर पहिल्यांदाच फॉरेस्ट सर्विस ऑफिसर च्या भूमिकेत दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुधांशु सरिया ह्यांनी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जान्हवी कपूर शिवाय ह्या पिक्चर मध्ये गुलशन देवैया(Gulshan Devaiya ),रोशन मॅथू ( Roshan Matthew ) ह्यांची सुद्धा प्रमुख भूमिका आहे. षड्यंत्र ,कट आणि फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेली सुहाना ( जान्हवी कपूर ) कशी बाहेर पडते हे पहायच असेल तर नक्की थिएटर मध्ये जाऊन हा पिक्चर बघा.

हे बघा : Ulajh trailer

 

Stree 2 :
Stree 2 हा 15 ऑगस्ट 2024 रोजी रीलीज होणाऱ्या पिक्चर ची सगळ्यात उत्सुकता आहे. हा पिक्चर stree (स्त्री ) ह्या 2018 मध्ये आलेल्या सिक्वेल आहे. ह्या पिक्चर मध्ये श्रद्धा कपूर,राजकुमार राव,पंकज त्रिपाठी,आणि आपरशक्ती खुराना ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.हा पिक्चर अमर कौशिक ह्यांनी दिग्दर्शित केला आहे. स्त्री 2 ची कहाणी हॉरर कॉमेडी आहे. स्त्री मध्ये दाखवल्याप्रमाणे चंदेरी शहरात  परत एकदा भयानक घटना सुरू झाल्या आहेत. ह्या वेळेस एक भयानक प्राण्याद्वारे रहस्यमय अपहरण होते आणि मग विककी आणि त्याचे सगळे मित्र आपले शहर वाचवण्याची जबाबदारी घेतात .

हे बघा : Stree 2 trailer

Khel Khel Main   :
Khel Khel Main हा सुद्धा 15 ऑगस्ट रोजी येणारा मल्टीस्टारर पिक्चर आहे. ह्या पिक्चर मध्ये अक्षय कुमार,तापसी पन्नू,वाणी कपूर,प्रग्या जयस्वाल,फरदीन खान,आदित्य सील ह्यांच्या भूमिका आहेत. हा पिक्चर चे दिग्दर्शन मुदाससार आजिज ह्यांनी केले आहे. ह्या मध्ये सगळे मित्र जेवायला म्हणून भेटतात आणि कसे आपले सगळे सीक्रेट एकमेकांना सांगायला लागतात आणि त्यानंतर होणारा जो गोंधळ आहे तो कुठे जाऊन थांबतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

ही बघा : Khel Khel mein trailer

Vedaa : 
Vedaa हा पिक्चर 15 ऑगस्ट 2024 रोजी रीलीज होणार आहे. ह्या मध्ये प्रमुख भूमिकेत जॉन अब्राहम ,श्रवरी,अभिषेक बॅनर्जी ,तमाणणा भटिया ,आशीष विद्यार्थी ,कुमुद मिश्रा ह्यांच्या भूमिका आहेत. सत्य घटनांवर आधारित हा पिक्चर आहे. Vedaa चे दिग्दर्शन निखिल आडवाणी ह्यांनी केले आहे. हा पिक्चर कोलकता मधील मोहन बाग क्लब च्या मैदानावर झालेल्या मॅच मध्ये युरोपियन खेळाडूंना हरवून अभूतपूर्व विजय मिळलेली कहाणी आहे. जॉन अब्राहम त्या टीम च्या कॅप्टन च्या भूमिकेत दिसणार आहे.

हे बघा : Vedaa

A Wedding Story :
a wedding story हा पिक्चर 30 ऑगस्ट रोजी रीलीज होणार असून हयात मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी,मुक्ती मोहन,मोनिका चौधरी,अक्षय आनंद ह्यांच्या भूमिका आहेत. हा एक भयपट (horror) मूवी आहे.ह्याचे दिग्दर्शन अभिनव परीक ह्यांनी केले आहे.

हे बघा : A Wedding Story trailer

Pad Gaye Pange : 
Pad gaye pange हा पिक्चर सुद्धा 30 ऑगस्ट रोजी रीलीज होत आहे. कॉमेडी असणाऱ्या ह्या पिक्चर चे दिग्दर्शन संतोष कुमार ह्यांनी केले आहे. ह्या पिक्चर मध्ये राजपाल यादव,राजेश शर्मा,समर्पण सिंह ह्यांच्या भूमिका आहेत.

हे बघा : Pad Gaye Pange trailer