UPI म्हणजे काय? what is UPI ?

Table of Contents

UPI म्हणजे काय? what is UPI ?

आजकाल भारतात सगळीकडे सगळ्यांच्या सोईचा असलेला पेमेंट मोड म्हणजेच UPI पेमेंट.आजपासून साधारण दहा वर्षापूर्वी लोक कॅश किंवा कार्ड पद्धतीने पैसे देत असत. परंतु आज आपण सगळेच UPI द्वारे पैसे देतो. आज आपण ह्या लेखात UPI म्हणजेच काय ते जाणून घेऊया.

UPI म्हणजे काय ? ते कोणी सुरू केले ?

 UPI  म्हणजेच यूनिफाईड पेमेंट इंटरफेस (Unified payment interface) किंवा एकात्मिक भरणा पद्धत.ही एक अतिशय सोपी,तात्काळ,व सुरक्षित पैसे चुकते करणारी प्रणाली आहे.यूनिफाईड पेमेंट इंटरफेस हे भारतीय रिजर्व बँक(रबी ) आणि इंडियन बँक असोसिएशन (iba) यांनी स्थापन केलेल्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे विकसित केले गेले.ही सुविधा वापरून एकावेळी किमान रु. १० व कमाल एक लाख रुपये इतका भरणा तत्काळ करता येतो.upi मधून पैसे पाठवताना कुठल्याही लॉगिन किंवा बँक डिटेल्स ची गरज नाही. आपल्या मोबाइल मध्ये असलेल्या अॅप्लिकेशन द्वारे आपल्याला हे पेमेंट कोणालाही करता येते.

UPI चा फायदा काय ?

  • UPI ही एक जलद व सुरक्षित पैसे पाठवण्याची प्रणाली आहे. तसेच ही सेवा 24/7उपलब्ध आहे.
  • 24/7 उपलब्धता: UPI सेवा चोवीस तास उपलब्ध आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांना बँकेचे कामकाजाचे तास किंवा सुट्टीची पर्वा न करता कधीही व्यवहार करता येतात.
  •  UPI रिअल-टाइम फंड ट्रान्सफर सक्षम करते, ते NEFT, RTGS किंवा IMPS सारख्या पारंपारिक पद्धतींपेक्षा जलद आणि अधिक कार्यक्षम बनवते .
  • UPI ही एकमेव अशी प्रणाली आहे ज्यात आपण बँकेत ऑनलाइन मेसेजद्वारा करून पैसे पाठवू शकतो. NEFT & IMPS मध्ये अशी सुविधा नसल्याने त्यात वेळ जातो.
  • UPI पेमेंट वापरुन आपण छोट्यात छोटी रक्कम उदा. 5रु. सुद्धा पाठवू शकतो. त्यामुळे आजकाल सगळे व्यवहार करण्यासाठी लोक UPI वापरतात.
  • UPI मुळे आता कॅशलेस व्यवहार वाढले आहेत.
  • UPI पेमेंट वापरुन आपण आपली महिन्याची बिले सुद्धा घरी बसल्या अॅप्लिकेशन मधून करू शकतो.
  •  बॅंकेत जाऊन पैसे काढणे किंवा भरणे ,एखाद्याला पैसे पाठवणे ह्यासाठी खर्च होणार वेळ UPI मुळे वाचतो.
  • चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम यांचा वापर कमी होते.

UPI वापरण्याच्या आधी खालील गोष्टीची काळजी घ्यावी :

  1. UPI वापरताना आपल्या जवळ स्मार्ट फोन असणे गरजेचे आहे,तसेच त्या स्मार्टफोन मध्ये UPI सपोर्ट महणजेच (UPI वापरण्यासाठीचे अॅप्लिकेशन ) असणे गरजेचे आहे.
  2. तुमच्याकडे बँक अकाऊंट असून तुमची बँक UPI पेमेंट सपोर्ट करत असणे गरजेचे आहे.
  3. तुमचा मोबाइल फोन नंबर  तुमच्या बँक अकाऊंट शी जोडलेला आहे का नाही हे बघणे.
  4. त्याशिवाय तुमच्या फोन वर इंटरनेट कनेक्शन (WiFi or mobile network) असणे गरजेचे आहे.

UPI कसे वापरायचे ?

  1. तुम्ही तुमच्या स्मार्टफोन च्या play store मध्ये जाऊन UPI वापरण्यासाठीचे अॅप्लिकेशन डाउनलोड करा.उदा SBI UPI, Axis UPI, ICICI UPI, PhonePe, Google pay.
  2. रजिस्ट्रेशन आणि व्हेरीफीकेशन :UPI वापरण्यासाठीचे अॅप्लिकेशन डाउनलोड केल्यावर तुम्हाला तिथे तुमचा मोबाइल नंबर रजिस्ट्रर करावा लागेल. तुमचे नाव, आभासी (व्हर्च्युअल) आयडी, पासवर्ड यासारखी माहिती देऊन त्याचे प्रोफाईल तयार करावे.
  3. “Add/Link/Manage Bank Account” पर्याय निवडावे  आणि बँक आणि खाते क्रमांक व्हर्च्युअल आयडीशी जोडावे.
  4. ज्या बँक खात्यावरून व्यवहार करायचा आहे ते बँक खाते आपण निवडावे.
  5.  गरजेची माहिती भरली द्यावी जसे की  ‘डेबिट कार्डचे शेवटचे ६ अंक’ आणि ‘समाप्तीचा दिनांक’
  6. त्यानंतर  बँकेकडून आलेला ओटीपी घेऊन ४-६ अंकी एम-पीन (पिन नंबर ) तयार केले जाते.
  7. ओटीपी व्हेरीफीकेशन झाल्यावर तुमचा पिन सेट करा. हाच पिन दर वेळेस तुम्हाला पैसे पाठवताना वापरायला लागेल त्यामुळे तप पिन काळजीपूर्वक सेट कर व शक्यतो कोणालाही सांगू नका.
  8. यानंतर तुमचा VPA निवडा. तुमचं नावच असलं पाहीजे असं नाही. तुम्हाला लक्षात ठेवता येईल असे नाव निवडा. उदा. abc@okaxis .
  9. यानंतर तुम्हाला तुमची बँक निवडायला सांगितलं जाईल. आणि तुम्ही तुमची बँक निवडली की अकाऊंट तयार होते
  10. यानंतर तुमचे अकाऊंट सुरू झाले असेल. व तुम्ही पैसे पाठवू शकता.

पैसे कसे पाठवावे ?

पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला ज्याला पाठवायचे आहेत त्याचा नंबर किंवा त्याचा VPA सेट करा. त्यानंतर जी काही रक्कम तुम्हाला पाठवायची असेल ती नक्की करा. त्यानंतर तुमचा पिन नंबर (जो तुम्ही अकाऊंट बनवताना ठेवला असेल तोच) टाका व सेंड मनी बटन दाबा.
वरील स्टेप्स थोडक्यात सांगायच्या तर पैसे पाठवताना अॅप उघडा > Phone Number & पिन टाका > Send > VPA टाका Verify करा > रक्कम टाका > PIN टाका > झाले पैसे ट्रान्सफर !!!
हे बघा  : https://www.youtube.com/watch?v=bTEFzEfJRgI

 

FAQ – Frequently asked questions :

  1. UPI म्हणजे काय ?

युनिफाईड पेमेंट इंटरफेस Unified Payment Interface (UPI) ही एक अत्यंत सोपी, सुरक्षित व ज्यामार्फत लगेच पैसे देता येणारी सुविधा आहे. 

2. UPI च्या मर्यादा काय आहेत?

NPCI नुसार दररोज UPI व्यवहार मर्यादा रु. 1 लाख आहे .कमाल UPI दैनंदिन हस्तांतरण मर्यादा एका बँकेतून बँकेत रु. 25,000 ते रु. 1 लाख दरम्यान बदलू शकते.

3. UPI फक्त भारतातच आहे का ?

भारत आणि भूताननंतर फ्रान्सने 2 फेब्रुवारी 2024 रोजी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) स्वीकारले . NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड (NIPL) आणि Lyra ने फ्रान्समध्ये UPI दत्तक घेण्याची घोषणा केली. भारताच्या UPI ने भूतान, UAE, मलेशिया, सिंगापूर आणि इतर देशांत पुढाकार घेऊन जागतिक लोकप्रियता मिळवली आहे.

4. UPI पेमेंट मोफत किंवा शुल्कायोग्य आहे का?

UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही. अशा प्रकारे, वैयक्तिक व्यवहारांसाठी व्यक्तींद्वारे UPI पेमेंट विनामूल्य आहेत . तथापि, 2,000 रुपयांपेक्षा जास्त डिजिटल वॉलेट व्यवहारांवर शुल्क आकारले जाईल.

आणखी वाचा : what is Internet of things (IoT)?| Iot म्हणजे काय?