What is Internet of Things (IoT)?| इंटरनेट ऑफ थिंग्ज बद्दल माहिती मराठी
Internet Of things (IOT) इंटरनेट ऑफ थिंग्ज ही एक नेटवर्क प्रणाली आहे ज्यात स्वतंत्र ओळख असलेली उपकरणे(Devices) आंतर्जलद्वारे (internet) एकमेकांशी संवाद साधू शकतात व इंटेरनेटद्वारे एकमेकांबरोबर माहितीचे आदान प्रदान करू शकतात.’इंटरनेट ऑफ थिंग्ज’ हा शब्द 1999 मध्ये संगणक शास्त्रज्ञ केविन ॲश्टन यांनी तयार केला होता. ही उपकरणे वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात जसे की स्मार्ट फोन,घरगुती उपकरणे,अनेक प्रकारचे सेन्सर ईत्यादी. आपण हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
उदाहरणार्थ तुम्ही ऑफिस ला गेला आहात आणि ऑफिस ला गेल्यावर तुम्हाला हे आठवत नाही की आपण घरातून बाहेर पडलो तेव्हा आपण घरातला ac बंद केला होता का नाही.अश्या वेळेस तुम्हाला परत घरी जाऊन हे बघायची गरज नाही जेव्हा तुम्ही इंटरनेट ऑफ थिंग्ज वापरता. इंटरनेट ऑफ थिंग्ज चा वापर करून तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन मधूनच तुमच्या घरातील सर्व उपकरणे जी त्या नेटवर्क मध्ये असतील ती हॅंडल करू शकता. म्हणजेच तुम्ही घरी न जाता तुमच्या स्मार्ट फोन वरूनच ac बंद करू शकता.
काही वर्ष पूर्वी इंटेरनेट चा वापर हा फक्त डेस्कटॉप,लपटॉप,आणि स्मार्ट फोन पुरताच मर्यादित होता परंतु अता इंटरनेट ऑफ थिंग्ज मुळे बहुतांश सगळी उपकरणे जसे की AC,टीव्ही,फॅन घरातील दिवे आपण इंटरनेट द्वारा कनेक्ट करून आपल्या स्मार्ट फोन वरुन ऑपरेट करू शकतो.इंटरनेट मुळे आपले आयुष्य सोपे झाले आहे.
इंटरनेट ऑफ थिंग्ज चा उद्देश :(internet of things )
- इंटरनेट ऑफ थिंग्ज चे प्रमुख उद्दीष्ट म्हणजे मानवी जीवनात सोई सुविधा आणणे आणि कार्यक्षमता वाढवणे. सध्याच्या गतिमान जीवनशैलीत प्रत्यक्षदर्शी गोष्टींना अतिशय महत्व आहे. IoT च्या मदतीने उपकरणे स्वयंचलित होऊ शकतात ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्मार्ट फोन वरुण घरातील उपकरणे हाताळता येतात.ह्याच्या मुळे ऊर्जेची बचत होऊ शकते आणि जीवन सोयीस्कर होऊ शकते.
- IoT मध्ये डेटा सातत्याने गोल केला जात असल्याने विविध उपकरणांचे कार्य नीट चालू आहेना तसेच भविष्यात त्यामध्ये सुधार करण्यासाठी लागणारी माहिती मिळू शकते.
- IoT च्या माध्यमातून विविध साधनांच्या स्थितीची रिअल-टाइम माहिती मिळवता येते. यामुळे तात्काळ समस्या ओळखून त्या सोडवता येतात.
इंटरनेट ऑफ थिंग्ज चा वापर कुठे कुठे होऊ शकतो ? (Applications of IoT)
- स्मार्ट होम : स्मार्ट फोन च्या मदतीने आपण IoT वापरुन घरगुती जीवन अधिक सुलभ व सुरक्षित बनवू शकतो. ह्याचे अजून एक उदाहरण म्हणजे आजकाल बऱ्याच घरांमध्ये डिजिटल लॉक सिस्टम असते. समजा आपल्या अनुपस्थितीत आपल्या घरातील कोणती वस्तु आपल्या नातेवाईकांना द्यायची असेल तर आपण जिथे असू तिथून आपण घराचे लॉक उघडू शकतो. बिटलॉक कंपनीच्या मोबाइल अॅपच्या द्वारे चावी शेअर करण्याचे सुविधा आहे.
- कृषि विभाग (अॅग्रिकल्चर) : IoT चा व्यापर करून स्मार्ट फारमिंग शक्य आहे. जसे की सेन्सॉर वापरुन जमिनीतील पाण्याची पातळी किती आहे हे सांगणे आणि त्यानुसार त्या भागात जिथे पाणी कमी असेल तिथे पाणी उपलब्ध करणे.र्ट फॉर्मिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांच्या वाढीसाठी आवश्यक माहिती मिळते, ज्यामुळे उत्पादन वाढते.
- वैदयकीय क्षेत्रात IoT उपकरणांचा वापर करून रुग्णांचे उपचार अधिक जलद गतीने करता येतील. तसेच मिळणाऱ्या डेटा च्या मार्फत डॉक्टर उपचाराची योग्य दिशा ठरवू शकतात.
- आौद्योगिक क्षेत्रात सुद्धा IoT मार्फत उत्पादन वाढवणे तसेच गुणवत्ता सुधारून येणारा खर्च सुद्धा कमी करणे हे काही उपयोग होऊ शकतात.
इंटरनेट ऑफ थिंग्ज मधीन आव्हाहने :
इंटरनेट ऑफ थिंग्ज सध्या अनेक शहरांमध्ये वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये खूप महत्वाची भूमिका साकारत आहे. परंतु, त्याच्या पुढे जाऊन मोठे आव्हान आहे ते म्हणजे संपूर्ण प्रणाली म्हणून एकापेक्षा अधिक घटकांसोबत एकत्रित सुसंवाद साधण्याचे.तसेच IoT मार्फत मोठ्या प्रमाणात डेटा गोळा केला जातो ज्यामध्ये संवेदनशील डेटा सुद्धा असू शकतो अश्या वेळेस डेटा बाबतीत गोपनीयता राखणे आणि संभाव्य सायबर सुरक्षा राखणे हे मोठे आव्हाहनात्मक असते. IoT मध्ये उपकरणे एकमेकांशी जोडलेली असतात असे असताना एकत्र काम करण्याची क्षमता ही फार महत्वाची आहे.ह्या उपकरणांमध्ये संवाद व समन्वंय नसेल तर तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता असते. तसेच या क्षेत्रात सारख्या नवनवीन कल्पना बाजारात येत असतात. या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कण्यासाठी त्यांचे महत्व आणि उपयोग माहिती असणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षा नियमांचे पालन करणेही गरजेचे आहे.
आणखी वाचा : What is AI? AI महणजे काय?
IoT चे फायदे आणि तोटे:
IoT चे फायदे :
- साधनांचा योग्य वापर : जर आपल्याला प्रत्येक उपकरण कसे काम करते हे माहीत असल्यास आपण नक्कीच IoT वापरुन अजून त्या साधनांचा योग्य वापर आपले दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी करू शकतो.
- मानवी श्रम कमी करणे : IoT उपकरणे एकमेकांशी संवाद साधतात आणि आपले कार्य करतात त्यामुळे मानवी श्रम कमी होण्यास मदत होते.
- वेळेची बचत : उपकर आपले काम करत असल्याने वेळेची नक्कीच बचत होते.
IoT चे तोटे :
- डेटा गोपनीयता : IoT प्रणाली एकमेकांशी जोडलेली असल्याने आणि नेटवर्कवर संवाद साधतात.अश्या वेळेस डेटा बाबतीत गोपनीयता राखणे आणि संभाव्य सायबर सुरक्षा राखणे हे मोठे आव्हाहनात्मक असते.
- क्लिष्टता: IoT प्रणालीसाठी मोठ्या तंत्रज्ञानाची रचना करणे, विकसित करणे आणि देखरेख करणे आणि सक्षम करणे खूप क्लिष्ट आहे.
-
ऊर्जा आवश्यकता : जगभरात सध्या वापरात असलेल्या अब्जावधी IoT उपकरणांना वीज पुरवण्यासाठी अब्जावधी बॅटरी किंवा पॉवर आउटलेटची आवश्यकता आहे. दीर्घकाळ टिकणाऱ्या, शक्तिशाली बॅटरी मदत करतात, परंतु त्यांना वारंवार चार्ज करणे आणि अधूनमधून बदलणे आवश्यक आहे. डायरेक्ट पॉवर सप्लायला बॅटरीपेक्षा कमी देखभालीची आवश्यकता असते परंतु इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता असते ज्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होऊ शकतो.
आणखी वाचा : UPI म्हणजे काय? what is UPI ?